९ एप्रिल दिनविशेष | 9 April Dinvishesh | 9 April day special in Marathi | Today day special marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, April 8, 2024

९ एप्रिल दिनविशेष | 9 April Dinvishesh | 9 April day special in Marathi | Today day special marathi

९ एप्रिल दिनविशेष

9 April Dinvishesh

9 April day special in Marathi

Today day special marathi

९ एप्रिल दिनविशेष | 9 April Dinvishesh | 9 April day special in Marathi | Today day special marathi

            ९ एप्रिल दिनविशेष ( 9 April Dinvishesh | 9 April day special in Marathi | Today day special Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण ९ एप्रिल दिनविशेष ( 9 April Dinvishesh | 9 April day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

९ एप्रिल दिनविशेष

9 April Dinvishesh

9 April day special in Marathi


@ राष्ट्रीय ग्रंथालय कामगार दिन [National Library Workers Day]

[०५८५]=> ५८५ इ.स. पूर्व : जपानचा पहिला सम्राट सम्राट जिम्मू यांचे निधन.

[१३३६]=> मंगोल सरदार तैमूरलंग यांचा जन्म.

[१६२६]=> इंग्लिश तत्त्ववेत्ते व मुत्सद्दी सर फ्रँन्सिस बेकन यांचे निधन.

[१६९५]=> पंडितकवी वामनपंडित यांनी भोगाव येथे समाधी घेतली.

[१७७०]=> जर्मन भौतिकशास्त्रज्ञ थॉमस योहान सीबेक यांचा जन्म.

[१८२८]=> थोर समाजसुधारक गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका यांचा जन्म.

[१८६७]=> रशियाकडून अलास्का हा प्रांत खरेदी करण्याच्या प्रस्तावास अमेरिकेत एक मताने मंजुरी मिळाली.

[१८८७]=> पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक विष्णू गंगाधर तथा दादासाहेब केतकर यांचा जन्म.

[१८९३]=> बौद्धधर्माचे भाष्यकार आणि इतिहासकार राहुल सांकृत्यायन यांचा जन्म.

[१९२५]=> अमेरिकन ज्योतिषी व लेखिका लिंडा गुडमन यांचा जन्म.

[१९३०]=> अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ एफ. अल्बर्ट कॉटन यांचा जन्म.

[१९४०]=> दुसरे महायुद्ध – जर्मनीने नॉर्वे व डेन्मार्क पादाक्रांत केले.

[१९४८]=> हिंदी चित्रपट अभिनेत्री जया भादुरी यांचा जन्म.

[१९६७]=> बोइंग-७६७ या विमानाने पहिले उड्डाण केले.

[१९९४]=> सूक्ष्मजीवशास्त्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल शास्त्रज्ञ पी. एम. भार्गव यांना आर. डी. बिर्ला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

[१९९४]=> स्वातंत्र्यसैनिक, तेलंगणच्या लढ्याचे प्रवर्तक तसेच भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस चंद्र राजेश्वर राव यांचे निधन.

[१९९५]=> लता मंगेशकर यांना अवधरत्न आणि साहू सूरसन्मान प्रदान करण्यात आले.

[१९९८]=> महानुभाव पंथाचे अभ्यासक, विचारवंत व तत्त्वज्ञ, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विष्णू भिकाजी तथा वि. भि. कोलते यांचे निधन.

[२००१]=> दलित साहित्यिक तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू शंकरराव खरात यांचे निधन.

[२००१]=> पत्रकार आणि स्तंभलेखक बेहराम काँट्रॅक्टर ऊर्फ बिझी बी यांचे निधन.

[२००९]=> लोककलांचे अभ्यासक आणि गीतकार अशोकजी परांजपे यांचे निधन.

[२००९]=> हिंदी व बंगाली चित्रपट दिग्दर्शक निर्माते शक्ती सामंत यांचे निधन.


            तुम्हाला ९ एप्रिल दिनविशेष | 9 April Dinvishesh | 9 April day special in Marathi | Today day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad