१० मे दिनविशेष | 10 May Dinvishesh | 10 May day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, May 9, 2024

१० मे दिनविशेष | 10 May Dinvishesh | 10 May day special in Marathi

१० मे दिनविशेष

10 May Dinvishesh

10 May day special in Marathi

१० मे दिनविशेष | 10 May Dinvishesh | 10 May day special in Marathi

            १० मे दिनविशेष ( 10 May Dinvishesh | 10 May day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण १० मे दिनविशेष ( 10 May Dinvishesh | 10 May day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

१० मे दिनविशेष

10 May Dinvishesh

10 May day special in Marathi


@ जागतिक ल्युपस दिवस [World Lupus Day]

[१२६५]=> जपानचा सम्राट फुशिमी यांचा जन्म.

[१७७४]=> फ्रान्सचा राजा लुई (पंधरावा) यांचे निधन.

[१८१८]=> इंग्रज व मराठे यांच्यात तह होऊन रायगड किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.

[१८२४]=> लंडनमधील नॅशनल गॅलरी सर्वसाधारण लोकांसाठी खुली करण्यात आली.

[१८५५]=> भारतीय गुरु आणि शिक्षक युकतेश्वर गिरी यांचा जन्म.

[१८८९]=> स्वातंत्र्यवीर सावरकरांचे बंधू, कादंबरीकार नारायण दामोदर सावरकर यांचा जन्म.

[१८९९]=> रँड वधाच्या प्रकरणी द्रविड बंधूंची हत्या केल्याबद्दल महादेव विनायक रानडे यांना फाशी.

[१९०५]=> गायक व संगीतकार पंकज मलिक यांचा जन्म.

[१९०७]=> स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामाचा सुवर्णमहोत्सव लंडनमधे साजरा केला.

[१९०९]=> आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ग्रंथालयशास्त्रज्ञ, पद्मश्री, इंडियन नॅशनल सायंटिफिक डॉक्युमेंटेशन सेंटर चे पहिले संचालक बेल्लारी शामण्णा केशवन यांचा जन्म.

[१९१४]=> चित्रपट निर्माते ताराचंद बडजात्या यांचा जन्म.

[१९१८]=> रिसर्च अँड अ‍ॅनॅलेसिस विंग (RAW) या भारतीय गुप्तचर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रामेश्वरनाथ काओ यांचा जन्म. (मृत्यू: २० जानेवारी २००२)

[१९२७]=> भारतीय लेखिका नयनतारा सहगल यांचा जन्म.

[१९३१]=> ज्येष्ठ गीतकार जगदीश खेबूडकर यांचा जन्म.

[१९३७]=> आधुनिक मराठी कवी ग्रेस तथा माणिक गोडघाटे यांचा जन्म.

[१९३७]=> स्वातंत्र्यवीर सावरकर यांची रत्‍नागिरीच्या स्थानबद्धतेतून बिनशर्त मुक्तता.


[१९४०]=> दुसरे महायुद्ध – नेव्हिल चेम्बरलेनने राजीनामा दिल्यावर विन्स्टन चर्चिल युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधानपदी.

[१९४०]=> दुसरे महायुद्ध – हिटलरने हॉलंड, बेल्जिअम आणि फ्रान्सवर आक्रमण केले.

[१९४०]=> प्रसिद्धी पराङमुख गीतकार व कवी माणिकराव गोडघाटे ऊर्फ ग्रेस यांचा जन्म.

[१९६२]=> मार्वल कॉमिक्सने द इक्रीडिबल हल्क या मासिकाचा पहिला अंक प्रकाशित केला.

[१९७९]=> मायक्रोनेशिया प्रजासत्ताक बनले.

[१९८१]=> फ्रान्सवा मितराँ फ्रान्सचे अध्यक्ष बनले.

[१९८१]=> विनोदी लेखक प्राध्यापक विमादि तथा विनायक माधव दीक्षित पटवर्धन यांचे निधन.

[१९८६]=> बुद्धीबळपटू पेंड्याला हरिकृष्ण यांचा जन्म.

[१९९३]=> संतोष यादव हि दोनदा एव्हरेस्ट पर्वत सर करणारी पहिली भारतीय महिला ठरली.

[१९९४]=> दक्षिण आफ्रिकेचे पहिले श्वेतवर्णीय राष्ट्राध्यक्ष नोबेल पारितोषिक विजेते नेल्सन मंडेला यांनी देशाची सूत्र हाती घेतली.

[१९९७]=> ७.३ मेगावॅट भूकंपाच्या तीव्र धक्क्याने इराण मधील सुमारे १५६७ लोक ठार, २३०० लोक जखमी आणि ५०००० लोक बेघर झाले.

[१९९८]=> पत्रकार, समाजसेवक, लेखक, चरित्रकार, साधना मासिकाचे संपादक यदुनाथ दत्तात्रय थत्ते यांचे निधन.

[२०००]=> कवी नागोराव घन:श्याम तथा ना. घ. देशपांडे यांचे निधन.

[२००१]=> महाराष्ट्राचे १३ वे मुख्यमंत्री, हिमाचल प्रदेशचे राज्यपाल सुधाकरराव नाईक यांचे निधन.

[२००२]=> गीतकार सय्यद अख्तर हुसेन रिझवी ऊर्फ कैफी आझमी यांचे निधन.

[२०१५]=> भारतीय इतिहासकार, लेखक निनाद बेडेकर यांचे निधन.

हे पण पहा :- विज्ञान दिन

            तुम्हाला १० मे दिनविशेष | 10 May Dinvishesh | 10 May day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad