१२ मे दिनविशेष | 12 May Dinvishesh | 12 May day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, May 11, 2024

१२ मे दिनविशेष | 12 May Dinvishesh | 12 May day special in Marathi

१२ मे दिनविशेष

12 May Dinvishesh

12 May day special in Marathi

१२ मे दिनविशेष | 12 May Dinvishesh | 12 May day special in Marathi

            १२ मे दिनविशेष ( 12 May Dinvishesh | 12 May day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण १२ मे दिनविशेष ( 12 May Dinvishesh | 12 May day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

१२ मे दिनविशेष

12 May Dinvishesh

12 May day special in Marathi


@ आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन [International Nurses Day]

[१३६४]=> पोलंड देशातील सर्वात जुने विद्यापीठ जगीलीनियन विद्यापीठाची सुरवात झाली.

[१५५१]=> अमेरिकेतील सर्वात जुने विद्यापीठ सान मार्कोस राष्ट्रीय विद्यापीठाची सुरवात झाली.

[१६६६]=> आग्रा येथे शिवाजी महाराज व औरंगजेब यांची पहिली व शेवटची भेट झाली.

[१७९७]=> नेपोलिअनने व्हेनिस जिंकले.

[१८२०]=> परिचारिका आणि आधुनिक रुग्णपरिचर्या शास्त्राच्या जनक फ्लॉरेंन्स नाईटिगेल यांचा जन्म.

[१८९५]=> भारतीय तत्त्वज्ञ जे. कृष्णमूर्ती यांचा जन्म.

[१८९९]=> लाटव्हियाच्या योगशिक्षिका इंद्रा देवी यांचा जन्म.

[१९०५]=> कृतिशील विचारवंत, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज चे संस्थापक आत्माराम रावजी भट यांचा जन्म.

[१९०७]=> चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथालेखक विजयशंकर जग्नेश्वर तथा विजय भट यांचा जन्म.

[१९०७]=> हॉलिवूड अभिनेत्री कॅथरिन हेपबर्न यांचा जन्म.

[१९०९]=> सेवानंद बाळुकाका कानिटकर, डॉ. गजानन श्रीपत तथा अण्णासाहेब खेर आणि वि. ग. केतकर यांनी पुणे अनाथ विद्यार्थी गृहाची स्थापना केली.

[१९४१]=> बर्लिनमधील कोनराड झुझ यांनी जगातील पहिले पूर्णतः स्वयंचलित संगणक Z3 सादर केले.


[१९५२]=> प्रजासत्ताक भारताच्या संसदेचे पहिले अधिवेशन सुरू झाले.

[१९५५]=> दुसरे महायुद्ध – संपल्यावर ऑस्ट्रियाने दोस्त राष्ट्रांकडून स्वातंत्र्य मिळवले.

[१९६५]=> सोव्हिएट अंतराळ स्थानक लूना ५ चंद्रावर कोसळले.

[१९७०]=> नोबेल पुरस्कार विजेते जर्मन कवी आणि नाटककार नोली सॅच यांचे निधन.

[१९८७]=> ब्रिटीश रॉयल नेव्ही मधील एचएमएस हार्मिस हि युद्धनौका विकत घेऊन भारताने तीला आयएनएस विराट या नावाने दाखल केले.

[१९९८]=> केन्द्र सरकारी कर्मचार्‍यांचे निवृत्तीचे वय ५८ वर्षांवरुन वरुन ६० वर्षे करण्याचा केन्द्र सरकारचा निर्णय.

[१९९८]=> भाषातज्ज्ञ आणि वैदिक संस्कृतीचे अभ्यासक रामचंद्र नारायण दांडेकर यांना बिर्ला अ‍ॅकॅडमी ऑफ आर्ट अँड कल्चर या संस्थेचा जी. डी. बिर्ला आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर.

[२००८]=> चीनमध्ये ८.० पेक्षा जास्त तीव्रतेच्या भूकंपात ६९,००० पेक्षा जास्त लोक मारले गेले.

[२०१०]=> एस. एच. कपाडीया यांनी भारताचे ३८ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

[२०१०]=> लेखिका तारा वनारसे (रिचर्डस) यांचे निधन.

[२०१४]=> भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, आणि पटकथालेखक सरत पुजारी यांचे निधन.

हे पण पहा :- विज्ञान दिन

            तुम्हाला १२ मे दिनविशेष | 12 May Dinvishesh | 12 May day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad