१३ मे दिनविशेष | 13 May Dinvishesh | 13 May day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, May 12, 2024

१३ मे दिनविशेष | 13 May Dinvishesh | 13 May day special in Marathi

१३ मे दिनविशेष

13 May Dinvishesh

13 May day special in Marathi

१३ मे दिनविशेष | 13 May Dinvishesh | 13 May day special in Marathi

            १३ मे दिनविशेष ( 13 May Dinvishesh | 13 May day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण १३ मे दिनविशेष ( 13 May Dinvishesh | 13 May day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

१३ मे दिनविशेष

13 May Dinvishesh

13 May day special in Marathi


@ जागतिक ताणतणाव दिन [World Stress Day]

[१६२६]=> अहमदनगरच्या निजामशाहीतील प्रसिद्ध दिवाण मलिक अंबर यांचे निधन.

[१८५७]=> हिवतापाच्या जंतुंचा शोध लावल्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे ब्रिटिश डॉक्टर सर रोनाल्ड रॉस यांचा जन्म. 

[१८८०]=> थॉमस अल्वा एडिसनने मेन्लो पार्क, न्यू जर्सी येथे विजेवर चालणाऱ्या रेल्वेची चाचणी केली.

[१९०३]=> फिलिपिन्सचे पहिले पंतप्रधान अपोलिनेरियो माबिनी यांचे निधन.

[१९०५]=> भारताचे ५वे राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांचा जन्म. 

[१९१६]=> भारतीय ओरिया भाषेचे कवी सच्चिदानंद राऊत यांचा जन्म.

[१९१८]=> भरतनाट्यम नर्तिका तंजोर बालसरस्वती यांचा जन्म. 

[१९२५]=> दलित साहित्याचे मर्मग्राही समीक्षक डॉ. भालचंद्र दिनकर फडके यांचा जन्म.

[१९३९]=> अमेरिकेतील पहिले व्यावसायिक एफएम रेडियो स्टेशन सुरु झाले.

[१९५०]=> प्राचीन भारतीय इतिहासाचे व संस्कतीचे अभ्यासक आणि पुरतत्त्वज्ञ देवदत्त रामकृष्ण भांडारकर यांचे निधन. 

[१९५०]=> फॉर्म्युला वन वर्ल्ड चॅम्पियनशीपची पहिला रेस सिल्व्हरस्टोन येथे झाली.

[१९५१]=> भारतीय संगीतकार आणि दिग्दर्शक आनंद मोडक यांचा जन्म.

[१९५२]=> भारतातील राज्यसभेचे पहिले अधिवेशन भरले.

[१९५६]=> आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांचा जन्म.

[१९५६]=> भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांचा जन्म.

[१९६२]=> भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांना भारतरत्‍न.

[१९६७]=> डॉ. झाकिर हुसेन भारताचे तिसरे राष्ट्रपती बनले.


[१९७०]=> नृत्यदिग्दर्शिका सितारादेवी यांनी मुंबई येथील बिर्ला मातोश्री सभागृहात सलग ११ तास ४५ मिनिटे नृत्य करण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित केला.

[१९७३]=> गीतलेखक, कवी संदीप खरे यांचा जन्म.

[१९८४]=> भारतीय गायक बेनी दयाल यांचा जन्म.

[१९९५]=> ऑक्सिजन किंवा शेर्पा यांच्या मदतीशिवाय माउंट एव्हरेस्ट सर करणारी एलिसन हरग्रिव्हज ही पहिली महिला बनली.

[१९९६]=> ए. टी. पी. (ATP) महिला जागतिक क्रमवारीत तब्बल ३३२ आठवडे अव्वल क्रमांकावर राहण्याचा विक्रम जर्मनीच्या स्टेफी ग्राफने केला.

[१९९६]=> लघुपट निर्माते अरुण खोपकर यांनी दिग्दर्शित केलेल्या सोच समझ के या कुटुंब नियोजनावरील लघुपटाला कुटुंबकल्याण या विषयावरील सर्वोत्तम चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला.

[१९९८]=> भारताने दोन परमाणु शास्त्रांची तपासणी पोखरण येथे केली.

[२०००]=> उत्तर प्रदेश, बिहार व मध्यप्रदेश या राज्यांची फेररचना करुन अनुक्रमे उत्तराँचल, झारखंड व छत्तीसगढ ही राज्ये निर्माण करण्याच्या विधेयकांना केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

[२०००]=> भारताची प्रसिद्ध मॉडेल आणि मिस इंडिया लारा दत्ता हिने विश्वसुंदरी (Miss Universe) हा किताब पटकावला.

[२००१]=> लेखक रासीपुरम कृष्णस्वामी नारायणस्वामी तथा आर. के. नारायण यांचे निधन.

[२०१०]=> कवी आणि बालकुमार-साहित्यिक विनायक महादेव तथा वि. म. कुलकर्णी यांचे निधन.

[२०१३]=> भारतीय छायाचित्रकार जगदीश माळी यांचे निधन.

हे पण पहा :- विज्ञान दिन

            तुम्हाला १३ मे दिनविशेष | 13 May Dinvishesh | 13 May day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad