१४ मे दिनविशेष | 14 May Dinvishesh | 14 May day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, May 13, 2024

१४ मे दिनविशेष | 14 May Dinvishesh | 14 May day special in Marathi

१४ मे दिनविशेष

14 May Dinvishesh

14 May day special in Marathi

१४ मे दिनविशेष | 14 May Dinvishesh | 14 May day special in Marathi

            १४ मे दिनविशेष ( 14 May Dinvishesh | 14 May day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण १४ मे दिनविशेष ( 14 May Dinvishesh | 14 May day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

१४ मे दिनविशेष

14 May Dinvishesh

14 May day special in Marathi


@ छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती. [Birth anniversary of Chhatrapati Sambhaji Maharaj]

[१६४३]=> फ्रान्सचा राजा लुई (तेरावा) यांचे निधन.

[१६५७]=> छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म.

[१७९६]=> इंग्लंडच्या ग्लूस्टर परगण्यातील बर्कले येथील जेम्स फिलीप या आठ वर्षाच्या मुलाला जगातील पहिली देवीची लस टोचण्यात आली.

[१९०७]=> फील्ड मार्शल आणि पाकिस्तानचे दुसरे राष्ट्राध्यक्ष आयुब खान यांचा जन्म.

[१९०९]=> विनोदसम्राट, कलागौरव पुरस्कार, चित्रभूषण पुरस्कार व बालगंधर्व पुरस्काराने सन्मानित वसंत शिंदे यांचा जन्म.

[१९२३]=> कायदेपंडित, समाजसुधारक सर नारायण गणेश चंदावरकर यांचे निधन.

[१९२३]=> दिग्दर्शक मृणाल सेन यांचा जन्म.

[१९२६]=> आनंदग्रामच्या संस्थापिका व थोर समाजसेविका डॉ. इंदुताई पटवर्धन यांचा जन्म.

[१९४०]=> दुसरे महायुद्ध – हॉलंडने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.

[१९५५]=> सोविएत रशिया, अल्बानिया, बल्गेरिया, झेकोस्लोव्हाकिया, हंगेरी, पोलंड, रुमानिया आणि पूर्व जर्मनी या कम्युनिस्ट राष्ट्रांचा वीस वर्षांचा परस्पर संरक्षणासाठीचा वॉर्सा करार पोलंडमधील वॉर्सा येथे झाला.


[१९६०]=> एअर इंडिया ची मुंबई – न्यूयॉर्क विमानसेवा सुरू झाली.

[१९६३]=> कुवेतचा संयुक्त राष्ट्रसंघात प्रवेश.

[१९६३]=> भाषाशास्त्रज्ञ, जनसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष, घटनासमितीचे सदस्य, राज्यसभा खासदार डॉ. रघू वीरा यांचे मोटार अपघातात निधन झाले.

[१९६५]=> चीनने सकाळी साडे सात वाजता (भारतीय वेळ) आपल्या दुसर्‍या अणुबॉम्बचा यशस्वी स्फोट केला.

[१९७८]=> नाटककार व लेखक जगदीश चंद्र माथूर यांचे निधन.

[१९८१]=> भारतीय संगणक शास्त्रज्ञ प्रणव मिस्त्री यांचा जन्म.

[१९९०]=> फेसबुकचे सहसंस्थापक मार्क झकरबर्ग यांचा जन्म.

[१९९७]=> देशातील आणि महाराष्ट्रातील पहिल्या महिला सहकारी साखर कारखान्याची साखर आयुक्त कार्यालयात सहकार कायदा कलम चारखाली नोंदणी झाली. इंदिरा गांधी भारतीय मिहिला विकास सहकारी साखर कारखाना असे त्याचे नाव आहे.

[१९९८]=> रसना च्या जाहिरातीतील बालकलाकार तरुणी सचदेव यांचा जन्म.

[१९९८]=> हॉलिवूड मधील अभिनेते व गायक फ्रँक सिनात्रा यांचे निधन.

[२०१२]=> रसनाच्या जाहिरातीतील बालकलाकार तरुणी सचदेव यांचे निधन.

[२०१३]=> भारतीय लेखक असगर अली इंजिनिअर यांचे निधन.

हे पण पहा :- विज्ञान दिन

            तुम्हाला १४ मे दिनविशेष | 14 May Dinvishesh | 14 May day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad