१५ मे दिनविशेष | 15 May Dinvishesh | 15 May day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, May 14, 2024

१५ मे दिनविशेष | 15 May Dinvishesh | 15 May day special in Marathi

१५ मे दिनविशेष

15 May Dinvishesh

15 May day special in Marathi

१५ मे दिनविशेष | 15 May Dinvishesh | 15 May day special in Marathi

            १५ मे दिनविशेष ( 15 May Dinvishesh | 15 May day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण १५ मे दिनविशेष ( 15 May Dinvishesh | 15 May day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

१५ मे दिनविशेष

15 May Dinvishesh

15 May day special in Marathi


@ आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन [International Day of Families]

@ विश्व कुटुंबसंस्था दिन [World Family Organization Day]

@ भारतीय वृक्ष दिन [Indian Tree Day]

[१३५०]=> संत जनाबाई यांचे निधन.

[१७१८]=> जगातल्या पहिल्या मशीन गन बंदूकेचे पेटंट जेम्स पक्कल यांनी घेतले.

[१७२९]=> वैशाख व. १४, शके १६५१ मराठेशाहीच्या आपत्‌प्रसंगी पराक्रम गाजवणारे खंडेराव दाभाडे यांचे निधन.

[१७३०]=> रॉबर्ट वॉल्पोल युनायटेड किंग्डमचे पहिले पंतप्रधान झाले.

[१८११]=> पॅराग्वेला स्पेनकडून स्वातंत्र्य मिळाले.

[१८१७]=> भारतीय तत्त्ववेत्ते आणि लेखक देवेन्द्रनाथ टागोर यांचा जन्म.

[१८३६]=> सूर्यग्रहणातील खग्रास स्थितीपुर्वी दिसणार्‍या बेलीज बीड्‌सचे शास्त्रज्ञ फ्रॅन्सिस बेली यांनी सर्वप्रथम निरीक्षण केले.

[१८५९]=> नोबेल पारितोषिकविजेते फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ पिअर क्युरी यांचा जन्म.

[१९०३]=> साहित्य मीमांसक, कवी व विचारवंत रा. श्री. जोग यांचा जन्म.

[१९०७]=> क्रांतिकारक सुखदेव थापर यांचा जन्म.

[१९२८]=> मिकी माऊस कार्टून प्लेन क्रेजी या शो मधून पहिल्यांदा प्रसारित केले गेले.

[१९३५]=> मॉस्को शहरात भुयारी रेल्वेची सुरूवात झाली.

[१९४०]=> दुसरे महायुद्ध – हॉलंडने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.

[१९४०]=> सॅन बर्नाडिनो, कॅलिफोर्निया येथे मॅक्डोनाल्डस (McDonald’s) चे पहिले उपहारगृह सुरू झाले.


[१९५८]=> सोव्हिएत युनियनने स्पुतनिक ३ चे प्रक्षेपण केले.

[१९६०]=> सोव्हिएत युनियनने स्पुतनिक ४ चे प्रक्षेपण केले.

[१९६१]=> पुण्याच्या चतु:शृंगी वीजकेंद्रात प्रचंड स्फोट होऊन ९ जणांचा मृत्यू.

[१९६७]=> अभिनेत्री माधुरी दिक्षीत-नेने यांचा जन्म.

[१९९३]=> स्वतंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख फील्डमार्शल के. एम. करिअप्पा यांचे निधन.

[१९९४]=> चित्रकार व कॅलेंडर निर्मितीचे अध्वर्यू पी. सरदार यांचे निधन.

[१९९४]=> जागतिक हौशी स्‍नूकर अजिंक्यपद स्पर्धेतील एकमेव भारतीय विजेता ओम अग्रवाल यांचे निधन.

[२०००]=> जुन्या जमान्यातील चित्रपट व नाट्य अभिनेते सज्जन यांचे निधन.

[२०००]=> दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील मंडीपुरा येथे अतिरेक्यांनी पेरलेल्या भूसुरुंगाच्या स्फोटात जम्मू – काश्मीरचे ऊर्जा राज्यमंत्री गुलाम हसन बट यांच्यासह ५ जण ठार.

[२००७]=> लिबर्टी विद्यापीठाचे स्थापक जेरी फेलवेल यांचे निधन.

हे पण पहा :- विज्ञान दिन

            तुम्हाला १५ मे दिनविशेष | 15 May Dinvishesh | 15 May day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad