१६ मे दिनविशेष | 16 May Dinvishesh | 16 May day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, May 15, 2024

१६ मे दिनविशेष | 16 May Dinvishesh | 16 May day special in Marathi

१६ मे दिनविशेष

16 May Dinvishesh

16 May day special in Marathi

१६ मे दिनविशेष | 16 May Dinvishesh | 16 May day special in Marathi

            १६ मे दिनविशेष ( 16 May Dinvishesh | 16 May day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण १६ मे दिनविशेष ( 16 May Dinvishesh | 16 May day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

१६ मे दिनविशेष

16 May Dinvishesh

16 May day special in Marathi


आंतरराष्ट्रीय प्रकाश दिन [International Day of Light]

[१६६५]=> पुरंदर किल्ल्यास दिलेरखानाने घातलेला वेढा तोडण्याच्या प्रयत्‍नात मुरारबाजी यांचा मृत्यू.

[१८२५]=> आद्य गणिती, आधुनिक भास्कराचार्य केरुनाना लक्ष्मण छत्रे यांचा जन्म.

[१८३०]=> फ्रेन्च गणितज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ जोसेफ फोरियर यांचे निधन.

[१८३१]=> मायक्रोफोन चे सहसंशोधक डेव्हिड एडवर्ड ह्यूजेस यांचा जन्म.

[१८६६]=> अमेरिकेत पाच सेन्ट किंवा निकेल हे नाणे व्यवहारात आणले.

[१८९९]=> क्रांतिकारक बाळकृष्ण चाफेकर यांना फाशी.

[१९०५]=> अमेरिकन अभिनेते हेन्‍री फोंडा यांचा जन्म.

[१९२६]=> गायिका माणिक वर्मा यांचा जन्म.

[१९२९]=> हॉलिवूडच्या अ‍ॅकेडमी ऑफ मोशन पिक्चर, आर्ट्‌स अँड सायन्सेस या संस्थेतर्फे चित्रपटांतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल स्मृतिचिन्ह देण्याचा पहिला समारंभ झाला. याच पारितोषिकांना पुढे ऑस्कर असे नाव पडले.

[१९३१]=> भारतीय राजकारणी व परराष्ट्रमंत्री के. नटवर सिंह यांचा जन्म.

[१९५०]=> कोल्हापूर संस्थानचे दिवाण व शिक्षणमंत्री अण्णासाहेब लठ्ठे यांचे निधन.

[१९६९]=> सोविएत रशियाचे व्हेनेरा-५ हे मानवविरहित अंतराळयान शुक्रावर उतरले.

[१९७०]=> अर्जेंटिनाची टेनिस खेळाडू गॅब्रिएला सॅबातिनी यांचा जन्म.

[१९७५]=> जपानची जुंको तबेई ही माऊंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला बनली.

[१९७५]=> सिक्कीम भारतात विलीन झाले.


[१९७७]=> माली देशाचे पहिले अध्यक्ष मादीबो केएटा यांचे निधन.

[१९९०]=> द मपेट्स चे जनक जिम हेनसन यांचे निधन.

[१९९३]=> बचेन्द्री पालच्या नेतृत्वाखालील पहिल्या महिला भारतीय मोहिमेने सात मुलींसह अठरा गिर्यारोहकांना एव्हरेस्ट पादाक्रांत करण्याचा मान मिळवून दिला व नवा जागतिक विक्रम नोंदविला.

[१९९४]=> चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथा लेखक फणी मुजुमदार यांचे निधन.

[१९९४]=> साहित्य समीक्षक माधव मनोहर यांचे निधन.

[१९९६]=> भारताचे १० वे पंतप्रधान म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांनी सूत्रे हाती घेतली. मात्र आवश्यक पाठिंबा न मिळाल्यामुळे त्यांचे सरकार केवळ १३ दिवस टिकले.

[२०००]=> बॅडमिंटन अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी तसेच खेळांचे दूरचित्रवाणी प्रसारण सुलभ करण्यासाठी या खेळातील गेम १५ ऐवजी ७ गुणांचा करण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन महासंघाच्या क्‍वालालंपूर येथील बैठकीत घेण्यात आला. मात्र २००६ मधे हा नियम परत बदलला गेला.

[२००५]=> कुवेतमधे स्त्रियांना प्रथमच मतदानाचा हक्क प्राप्त झाला.

[२००७]=> निकोलाय सारकॉझी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष बनले.

[२००८]=> ओपस वन व्हाइनरी चे सहसंस्थापक रॉबर्ट मोन्डवी यांचे निधन.

[२०१४]=> टाटा स्टीलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रुसी मोदी यांचे निधन.

हे पण पहा :- विज्ञान दिन

            तुम्हाला १६ मे दिनविशेष | 16 May Dinvishesh | 16 May day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad