१९ मे दिनविशेष | 19 May Dinvishesh | 19 May day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, May 18, 2024

१९ मे दिनविशेष | 19 May Dinvishesh | 19 May day special in Marathi

१९ मे दिनविशेष

19 May Dinvishesh

19 May day special in Marathi

१९ मे दिनविशेष | 19 May Dinvishesh | 19 May day special in Marathi

            १९ मे दिनविशेष ( 19 May Dinvishesh | 19 May day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण १९ मे दिनविशेष ( 19 May Dinvishesh | 19 May day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

१९ मे दिनविशेष

19 May Dinvishesh

19 May day special in Marathi


@ संत ज्ञानदेव यांची बहिण मुक्ताबाई यांनी एदलाबाद येथे समाधी घेतली. [Sant Gyandev's sister Muktabai took Samadhi at Edalabad]

[१२९७]=> संत ज्ञानदेव यांची बहिण मुक्ताबाई यांनी एदलाबाद येथे समाधी घेतली.

[१५३६]=> इंग्लंडचा राजा आठवा हेन्‍री यांची बायको अ‍ॅन बोलेन हिचा व्यभिचाराबद्दल शिरच्छेद करण्यात आला.

[१७४३]=> जीन पियरे क्रिस्टीन यांनी सेंटीग्रॅड तापमान पातळी विकसित केली.

[१८८१]=> तुर्कस्तानचे पहिले राष्ट्राध्यक्ष मुस्तफा कमाल अतातुर्क यांचा जन्म.

[१८९०]=> व्हिएतनामचे राष्ट्रपती हो ची मिन्ह यांचा जन्म.

[१९०४]=> आधुनिक औद्योगिक भारताचे शिल्पकार व टाटा उद्योग समुहाचे संस्थापक जमशेदजी नसरवानजी टाटा यांचे निधन.

[१९०५]=> भारतीय संगीत क्षेत्रातील अध्वर्यू गानहिरा हिराबाई बडोदेकर यांचा जन्म.

[१९०८]=> भारतीय लेखक, कवी आणि नाटककार माणिक बंदोपाध्याय यांचा जन्म.

[१९१०]=> नथुराम गोडसे यांचा जन्म.

[१९१०]=> हॅले धुमकेतुचे शेपूट पृथ्वीला चाटुन गेले.

[१९११]=> पार्कस कॅनडा ही जगातील पहिली राष्ट्रीय उद्यान सेवा सुरु झाली.

[१९१३]=> भारताचे ६ वे राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांचा जन्म.


[१९२५]=> कृष्णवर्णीयांच्या हक्कांसाठी लढणारे अमेरिकन नेते माल्कम एक्स यांचा जन्म.

[१९२५]=> ख्मेर रुज चे नेते पॉल पॉट यांचा जन्म.

[१९२६]=> आध्यात्मिक गुरू आणि लेखक स्वामी क्रियानंद यांचा जन्म.

[१९२८]=> लोटस कार कंपनी चे स्थापक कोलिन चॅपमन यांचा जन्म.

[१९३४]=> भारतीय लेखक आणि कवीरस्किन बाँड यांचा जन्म.

[१९३८]=> ज्ञानपीठ पुरस्कार विजेते अभिनेते व दिग्दर्शक गिरीश कर्नाड यांचा जन्म.

[१९५८]=> औरंगजेबाचे पाच खंडात विस्तृत चरित्र लिहिणारे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे इतिहासकार सर यदुनाथ सरकार यांचे

[१९६३]=> द न्यू यॉर्क पोस्ट संडे मॅगझीनने डॉ. मार्टिन लूथर किंग जूनियर यांचे बर्मिंगहॅम जेलमधील पत्र प्रकाशित केले.

[१९६४]=> तामिळ अभिनेता मुरली यांचा जन्म.

[१९६५]=> मालागासी येथील तुई मलिला या वयोवृद्ध कासवाचा मृत्यू.

[१९६९]=> इतिहास व पुराणसंशोधक पांडुरंग मार्तंड तथा आबा चांदोरकर यांचे निधन.

[१९९५]=> ग्वाल्हेर घराण्याचे संगीतज्ञ पं. विनयचंद्र मौदगल्य यांचे निधन.

[१९९७]=> बंगाली रंगभूमीवरील अभिनेते, दिग्दर्शक व नाटककार शंभू मित्रा यांचे निधन.

[१९९९]=> काव्य आणि संतवाङ्‌मयाचे गाढे अभ्यासक, कवी व समीक्षक प्रा. रमेश तेंडुलकर यांचे निधन.

[२००८]=> नाटककार, चित्रपटकथालेखक, पत्रकार व साहित्यिक विजय तेंडुलकर यांचे निधन.

हे पण पहा :- विज्ञान दिन

            तुम्हाला १९ मे दिनविशेष | 19 May Dinvishesh | 19 May day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad