२ मे दिनविशेष | 2 May Dinvishesh | 2 May day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, May 1, 2024

२ मे दिनविशेष | 2 May Dinvishesh | 2 May day special in Marathi

२ मे दिनविशेष

2 May Dinvishesh

2 May day special in Marathi

२ मे दिनविशेष | 2 May Dinvishesh | 2 May day special in Marathi

            २ मे दिनविशेष ( 2 May Dinvishesh | 2 May day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण २ मे दिनविशेष ( 2 May Dinvishesh | 2 May day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

२ मे दिनविशेष

2 May Dinvishesh

2 May day special in Marathi


@ लिओनार्डो दा विंची यांचे निधन. [Death of Leonardo da Vinci.]

[१५१९]=> इटालियन चित्रकार, संशोधक, गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ लिओनार्डो दा विंची यांचे निधन.

[१६८३]=> शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरुन राज्यव्यवहारकोश तयार करणारे मुत्सद्दी रघुनाथ नारायण हणमंते तथा रघुनाथपंडित यांचे निधन.

[१८९९]=> मराठी चित्रपटसृष्टी चे चित्रमहर्षी भालजी पेंढारकर यांचा जन्म.

[१९०८]=> स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लंडनमधे प्रथमच शिवजयंती उत्सव साजरा केला.

[१९१८]=> जनरल मोटर्सने शेवरले मोटर कंपनी विकत घेतली.

[१९२०]=> शास्त्रीय व नाट्यसंगीत गायक डॉ. वसंतराव देशपांडे यांचा जन्म.

[१९२१]=> ख्यातनाम चित्रपट निर्माते व दिग्दर्शक आणि भारतरत्‍न तसेच विशेष ऑस्कर पुरस्कार विजेते सत्यजित रे यांचा जन्म.

[१९२१]=> स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे बंधू बाबाराव व तात्याराव यांची अंदमानातुन हिन्दुस्थानात पाठवणी केली.

[१९२९]=> भूतानचे राजे जिग्मे दोरजी वांगचुकयांचा जन्म.

[१९४५]=> दुसरे महायुद्ध – सोविएत सैन्याने बर्लिनचा पाडाव केला.

[१९६३]=> महाराष्ट्रातील जादूगारांचे आचार्य डॉ. के. बी. लेले यांचे निधन.

[१९६९]=> वेस्ट इंडीजचा क्रिकेटपटू ब्रायन लारा यांचा जन्म.

[१९७२]=> स्काईप सॉफ्टवेअर चे सहनिर्माते अहटी हेनला यांचा जन्म.

[१९७३]=> लेखक, तत्त्वचिंतक व समीक्षक दिनकर केशव तथा दि. के. बेडेकर यांचे निधन.

[१९७५]=> चित्रपट दिग्दर्शक, लेखक, कवी व गीतकार शांताराम आठवले यांचे निधन.

[१९९४]=> नगर जिल्ह्यातील रामदास ढमाले या अपंग युवकाने पुण्यातील टिळक तलावात सलग ३७ तास ४५ मिनिटे पोहून एक नवा विक्रम प्रस्थापित केला.

[१९९४]=> बँक ऑफ कराड चे बँक ऑफ इंडिया मधे विलिनीकरण झाले.

[१९९७]=> टोनी ब्लेअर इंग्लंडचे पंतप्रधान बनले.


[१९९७]=> राष्ट्रीय अ बुद्धीबळ अजिंक्यपद स्पर्धेत पुण्याच्या अभिजित कुंटेने इंटरनॅशनल मास्टर किताबासाठीचे निकष पूर्ण केले.

[१९९८]=> गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, काँग्रेसचे नेते, ५व्या लोकसभेचे सदस्य पुरुषोत्तम काकोडकर यांचे निधन.

[१९९९]=> कोल्हापूर येथील शर्वरी मानसिंग पवार या तीन वर्षे चार महिन्याच्या बालिकेने ५१.१ कि. मी. अंतर न थांबता स्केटिंग करुन ३ तास ५१ मिनिटांत पार केले.

[१९९९]=> जयपूर-अत्रौली घराण्याचे शास्त्रीय गायक पं. सुधाकरबुवा डिग्रजकर यांचे निधन.

[१९९९]=> मीरा मोस्कोसो पनामा देशाच्या अध्यक्ष म्हणून निवडलेल्या पहिल्या महिला ठरल्या.

[२००४]=> एस. राजेन्द्रबाबू यांनी भारताचे ३४वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

[२०११]=> अमेरिकन सैन्याच्या Navy Seals 6 या विशेष तुकडीने ओसामा बिन लादेन याची पाकिस्तानातील अ‍ॅबोटाबाद येथे हत्या केली.

[२०११]=> अल कायदा चे संस्थापक ओसामा बिन लादेन अमेरिकन सैन्याने ठार मारले.

[२०१२]=> नॉर्वेजियन चित्रकार एडवर्ड माँच यांचे द स्क्रीम हे चित्र लिलावात १२० मिलियन डॉलर्सला विकले गेले. हा एक नवा जागतिक विक्रम बनला.


            तुम्हाला २ मे दिनविशेष | 2 May Dinvishesh | 2 May day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad