२० मे दिनविशेष | 20 May Dinvishesh | 20 May day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, May 19, 2024

२० मे दिनविशेष | 20 May Dinvishesh | 20 May day special in Marathi

२० मे दिनविशेष

20 May Dinvishesh

20 May day special in Marathi

२० मे दिनविशेष | 20 May Dinvishesh | 20 May day special in Marathi

            २० मे दिनविशेष ( 20 May Dinvishesh | 20 May day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण २० मे दिनविशेष ( 20 May Dinvishesh | 20 May day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

२० मे दिनविशेष

20 May Dinvishesh

20 May day special in Marathi


@ जागातिक हवामान विज्ञान दिन [Space Meteorological Science Day]

@ संत चोखामेळा यांची पुण्यतिथी [Death anniversary of Sant Chokhamela]

[०५२६]=> सिरीया आणि अँटोचियात झालेल्या एका भूकंपात सुमारे ३,००,००० लोकांचा मृत्यू.

[१४९८]=> पोर्तुगीज खलाशी वास्को-द-गामा हे भारताच्या कालिकत (कलकत्ता) बंदरात दाखल झाले.

[१५०६]=> इटालियन दर्यावर्दी व संशोधक ख्रिस्तोफर कोलंबस यांचे निधन.

[१५४०]=> छायाचित्रकार अब्राहम ऑरटेलियस यांनी थॅट्रम ऑरबिस टेरारम हा पहिला आधुनिक अॅटलास प्रकाशित केला.

[१५७१]=> राघवचैतन्यांचे विख्यात शिष्य व संत तुकारामांचे गुरु, केशवचैतन्य ऊर्फ बाबाचैतन्य यांनी जुन्‍नरजवळील ओतूर येथे समाधी घेतली.

[१७६६]=> इंदूरच्या राज्याचे संस्थापक, मराठेशाहीतील पराक्रमी सेनापती व मुत्सद्दी मल्हारराव होळकर यांचे निधन.

[१८१८]=> अमेरिकन एक्सप्रेस आणि वेल्स फार्गो कंपनी चे सहसंस्थापक विल्यम फार्गो यांचा जन्म. 

[१८५०]=> केसरी चे सहसंस्थापक विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचा जन्म.

[१८५१]=> ग्रामोफोन रेकॉर्ड चे शोधक एमिल बर्लिनर यांचा जन्म.

[१८६०]=> आंबवण्याच्या प्रक्रियेसंबंधी केलेल्या संशोधनाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे जर्मन रसायनशास्त्रज्ञ एडवर्ड बकनर यांचा जन्म.

[१८७३]=> लेव्ही स्ट्रॉस आणि जेकब डेव्हिस यांनी तांब्याची बटणे असलेल्या निळ्या जीन्स चे पेटंट घेतले.

[१८७८]=> समाजसुधारक व संस्कृत विद्वान कृष्णशास्त्री चिपळूणकर यांचे निधन.

[१८८४]=> प्राच्यविद्यासंशोधक, भाषाशास्त्रज्ञ व साहित्यसमीक्षक पांडुरंग दामोदर गुणे यांचा जन्म.

[१८९१]=> थॉमस एडीसन यांनी किनेटोस्कोप चे पहिला प्रोटोटाइप प्रदर्शित केले

[१९००]=> छायावादी विचारधारेतील हिन्दी कवी सुमित्रानंदन पंत यांचा जन्म.

[१९०२]=> क्यूबा देश अमेरिकेपासून स्वातंत्र्य झाला.


[१९१३]=> हेव्हलेट-पॅकार्ड चे सहसंस्थापक विल्यम रेडिंग्टन हेव्हलेट यांचा जन्म.

[१९१५]=> इस्त्रायलचे परराष्ट्रमंत्री, कृषीमंत्री आणि संरक्षणमंत्री, इस्रायली सेना प्रमुख मोशे दायान यांचा जन्म.

[१९३२]=> लाल-बाल-पाल या त्रयीतील स्वातंत्र्यसेनानी बिपिन चंद्र पाल यांचे निधन.

[१९४४]=> रेड बुल चे सहसंस्थापक डीट्रिख मत्थेकित्झ यांचा जन्म.

[१९४८]=> चिआंग काई शेक चीन गणराज्यचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवडून आले.

[१९५२]=> कॅमेरुनचा फूटबॉलपटू रॉजर मिला यांचा जन्म.

[१९६१]=> कम्युनिस्ट नेते व प्रभावी वक्ते भाई विष्णूपंत चितळे यांचे निधन.

[१९९२]=> सामाजिक कार्यकर्त्या डॉ. लीला मूळगांवकर यांचे निधन.

[१९९४]=> आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री के. ब्रम्हानंद रेड्डी यांचे निधन.

[१९९६]=> देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल माजी केंद्रीय अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांना ऑनेस्ट मॅन ऑफ द’इयर हा पुरस्कार जाहीर.

[१९९७]=> इंडियन एज्युकेशन सोसायटीचे (IES) विश्वस्त, शिक्षणक्षेत्रातील विश्वकर्मा माणिकराव लोटलीकर यांचे निधन.

[२०००]=> राष्ट्रकुल संसदीय संघटनेच्या आशिया विभागाच्या अध्यक्षपदी लोकसभेचे सभापती जी. एम. सी. बालयोगी यांची एकमताने निवड झाली.

[२००१]=> चित्रपट निर्माते व लेखक अण्णासाहेब देऊळगावकर यांना अखिल भारतीय चित्रपट महामंडळातर्फे चित्रभूषण पुरस्कार जाहीर.

[२०१२]=> भारतीय मानववंशशास्त्रज्ञ लीला दुबे यांचे निधन.

[२०१२]=> रिमोट कंट्रोल चे शोधक यूजीन पॉली यांचे निधन.

हे पण पहा :- विज्ञान दिन

            तुम्हाला २० मे दिनविशेष | 20 May Dinvishesh | 20 May day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad