२२ मे दिनविशेष | 22 May Dinvishesh | 22 May day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, May 21, 2024

२२ मे दिनविशेष | 22 May Dinvishesh | 22 May day special in Marathi

२२ मे दिनविशेष

22 May Dinvishesh

22 May day special in Marathi

२२ मे दिनविशेष | 22 May Dinvishesh | 22 May day special in Marathi

            २२ मे दिनविशेष ( 22 May Dinvishesh | 22 May day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण २२ मे दिनविशेष ( 22 May Dinvishesh | 22 May day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

२२ मे दिनविशेष

22 May Dinvishesh

22 May day special in Marathi


@ जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस [International Day for Biological Diversity]
[१४०८]=> हिंदू संत अन्नामचार्य यांचा जन्म.
[१५४५]=> भारतीय शासक शेरशाह सूरी यांचे निधन.
[१७६२]=> स्वीडन आणि प्रशियामधे हॅम्बुर्गचा तह झाला.
[१७७२]=> समाजसुधारक, धर्मसुधारक व ब्राम्हो समाजाचे संस्थापक राजा राम मोहन रॉय यांचा जन्म.
[१७८३]=> विद्युत चुंबक आणि विद्युत मोटर चे शोधक विल्यम स्टर्जन यांचा जन्म.
[१८०२]=> अमेरिकेची पहिली फर्स्ट लेडी मार्था वॉशिंग्टन यांचे निधन.
[१८१३]=> जर्मन संगीतकार, संगीतसंयोजक व दिग्दर्शक रिचर्ड वॅग्‍नर यांचा जन्म.
[१८५९]=> स्कॉटिश डॉक्टर व शेरलॉक होम्स या गुप्तहेरकथांचे लेखक सर आर्थर कॉनन डॉइल यांचा जन्म.
[१८७१]=> संस्कृत विद्वान, भाषांतरकार व शास्त्रसुधारक विष्णू वामन बापट यांचा जन्म.
[१८८५]=> जागतिक कीर्तीचे फ्रेन्च कादंबईकार, कवी आणि लेखक व्हिक्टर ह्यूगो यांचे निधन.
[१९०५]=> इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचे सहसंशोधक बोडो वॉन बोररी यांचा जन्म.
[१९०६]=> राईट बंधूंनी उडणाऱ्या यंत्राचे (Flying Machine) पेटंट घेतले.
[१९०७]=> ब्रिटिश अभिनेता, दिग्दर्शक व निर्माता सर लॉरेन्स ऑलिव्हिये यांचा जन्म.
[१९१५]=> स्कॉटलंडच्या ग्रेटना ग्रीन गावात ३ रेल्वेगाड्यांची टक्कर होऊन २२७ जण ठार आणि २४६ जण जखमी झाले.


[१९२७]=> चीनच्या झिनिंग जवळ झालेल्या ८.३ तीव्रतेच्या भूकंपात २,००,००० लोक ठार झाले.
[१९४०]=> भारतीय फिरकी गोलंदाज एरापल्ली अनंतराव श्रीनिवास प्रसन्ना यांचा जन्म.
[१९४२]=> दुसरे महायुद्ध – मेक्सिकोने दोस्त राष्ट्रांच्या बाजूने युद्धात उडी घेतली.
[१९४८]=> भारतीय अभिनेता आणि पटकथालेखक नेदुमुदी वेणू यांचा जन्म.
[१९५९]=> भारतीय राजकारणी मेहबूबा मुफ्ती यांचा जन्म.
[१९६०]=> ग्रेट चिलीयन भूकंप हा ९.५ तीव्रतेचा जगातील सर्वात शक्तिशाली भूकंप आहे.
[१९६१]=> हुंडाबंदी विधेयकाला राष्ट्रपतींची संमती मिळून हुंडाबंदी कायदा अस्तित्त्वात आला.
[१९७२]=> सिलोनने नवीन राज्यघटना स्वीकारुन ते प्रजासत्ताक बनले. त्या देशाचे श्रीलंका असे नामकरण झाले आणि त्याने राष्ट्रकुल देशांत प्रवेश केला.
[१९८४]=> फेसबुकचे सह-संस्थापक डस्टिन मॉस्कोविट्झ यांचा जन्म.
[१९८७]=> मेरठ जिल्ह्यात हाशिमपूरा हत्याकांड झाले.
[१९८७]=> सर्बियाचा टेनिस खेळाडू नोव्हान जोकोव्हिच यांचा जन्म.
[१९९१]=> भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक व कामगार पुढारी कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचे निधन.
[१९९५]=> चित्रकार व शिल्पकार रविंद्र बाबुराव मेस्त्री यांचे निधन.
[१९९८]=> लेखक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. मधुकर आष्टीकर यांचे निधन.
[२००४]=> भारताचे १३ वे पंतप्रधान म्हणून डॉ. मनमोहन सिंग सूत्रे हाती घेतली.
[२०१५]=> आयर्लंड देश सार्वजानिक जनमतदानंतर समलिंगी विवाहाला कायदेशीर ठरवण्यासाठी जगातील पहिला देश बनला.

हे पण पहा :- विज्ञान दिन

            तुम्हाला २२ मे दिनविशेष | 22 May Dinvishesh | 22 May day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad