२३ मे दिनविशेष | 23 May Dinvishesh | 23 May day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, May 22, 2024

२३ मे दिनविशेष | 23 May Dinvishesh | 23 May day special in Marathi

२३ मे दिनविशेष

23 May Dinvishesh

23 May day special in Marathi

२३ मे दिनविशेष | 23 May Dinvishesh | 23 May day special in Marathi

            २३ मे दिनविशेष ( 23 May Dinvishesh | 23 May day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण २३ मे दिनविशेष ( 23 May Dinvishesh | 23 May day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

२३ मे दिनविशेष

23 May Dinvishesh

23 May day special in Marathi


[१०५२]=> फ्रान्सचा राजा फिलिप (पहिला) यांचा जन्म.
[१७०७]=> स्वीडीश वनस्पतीतज्ञ कार्ल लिनिअस यांचा जन्म.
[१७३७]=> पोर्तुगीजांकडुन जिंकल्यानंतर पेशव्यांनी अर्नाळा किल्ला परत बांधून घेतला.
[१८२९]=> सिरील डेमियनला अ‍ॅकॉर्डियन या वाद्याचे पेटंट मिळाले.
[१८५७]=> फ्रेन्च गणितज्ञ ऑगस्टिन कॉशी यांचे निधन.
[१८७५]=> अमेरिकन उद्योगपती आल्फ्रेड पी. स्लोन यांचा जन्म. 
[१८९६]=> गायक, अभिनेते, संगीत समीक्षक, संगीत रचनाकार, संगीत दिग्दर्शक व लेखक केशवराव भोळे यांचा जन्म.
[१९०६]=> नॉर्वेजियन नाटककार, दिग्दर्शक आणि कवी हेन्‍रिक इब्सेन यांचे निधन.
[१९१८]=> इंग्लिश क्रिकेटपटू डेनिस कॉम्पटन यांचा जन्म.
[१९१९]=> जयपूरच्या राजमाता महाराणी गायत्रीदेवी यांचा जन्म.
[१९२६]=> भारतीय बिशप बॅसिल साळदादोर डिसोझा यांचा जन्म.
[१९२६]=> मार्क्सवादी कम्युनिस्ट नेते पी. गोविंद पिल्लई यांचा जन्म. 
[१९३३]=> मुद्रितशोधन तज्ञ मोहन वेल्हाळ यांचा जन्म.


[१९३७]=> रॉकफेलर घराण्यातील पहिले उद्योगपती, स्टँडर्ड ऑईल उद्योगसमूह व अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील पहिल्या तेल उद्योगाचे संस्थापक जॉन डेव्हिसन रॉकफेलर यांचे निधन. 
[१९४३]=> पटकथालेखक आणि दिग्दर्शक कोवेलमूडी राघवेंद्र राव यांचा जन्म.
[१९४५]=> भारतीय दिग्दर्शक, पटकथालेखक आणि लेखक पद्मराजन यांचा जन्म.
[१९४९]=> पश्चिम जर्मनी हे राष्ट्र अस्तित्त्वात आले.
[१९५१]=> तिबेट देशाने चीनबरोबर तिबेटच्या शांततेत मुक्तीसाठी सतरा बिंदू करार केला.
[१९५१]=> रशियन बुद्धीबळपटू अनातोली कार्पोव्ह यांचा जन्म.
[१९५६]=> आयुर्विमा व्यवसायाचे राष्ट्रीयीकरण करण्यासंबंधीचे विधेयक मंजूर झाले.
[१९६०]=> निऑन लाईट चे निर्माते जॉर्ज क्लोडे यांचे निधन.
[१९६५]=> क्रिकेटपटू वूर्केरी रमण यांचा जन्म.
[१९८४]=> बचेन्द्री पालने दुपारी १:०९ वाजता (भारतीय प्रमाण वेळ) माऊंट एव्हरेस्ट शिखर सर केले. हे शिखर सर करणारी ती पहिली भारतीय महिला आहे.
[१९९५]=> जावा प्रोग्रामिंग लँग्वेज ची पहिली आवृत्ती प्रकाशीत केली गेली.
[१९९७]=> माऊंट एव्हरेस्ट हे सर्वोच्‍च शिखर सर्वप्रथम सर करणार्‍या तेनसिंग नोर्गे यांचे नातू ताशी तेनसिंग यांनी माऊंट एव्हरेस्ट सर केले.
[२०१४]=> भारतीय क्रिकेटर माधव मंत्री यांचे निधन.
[२०१४]=> भारतीय संगीतकार आणि दिग्दर्शक आनंद मोडक यांचे निधन. 

हे पण पहा :- विज्ञान दिन

            तुम्हाला २३ मे दिनविशेष | 23 May Dinvishesh | 23 May day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad