२४ मे दिनविशेष | 24 May Dinvishesh | 24 May day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, May 23, 2024

२४ मे दिनविशेष | 24 May Dinvishesh | 24 May day special in Marathi

२४ मे दिनविशेष

24 May Dinvishesh

24 May day special in Marathi

२४ मे दिनविशेष | 24 May Dinvishesh | 24 May day special in Marathi

            २४ मे दिनविशेष ( 24 May Dinvishesh | 24 May day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण २४ मे दिनविशेष ( 24 May Dinvishesh | 24 May day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

२४ मे दिनविशेष

24 May Dinvishesh

24 May day special in Marathi


[१५४३]=> पोलिश खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ निकोलस कोपर्निकस यांचे निधन.
[१६२६]=> पीटर मिन्युईटने स्थानिक लोकांकडून मॅनहटन बेट २४ डॉलरला विकत घेतले.
[१६८६]=> फॅरनहाइट तापमान प्रणाली चे जनक डॅनियल फॅरनहाइट यांचा जन्म.
[१८१९]=> इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया यांचा जन्म.
[१८४४]=> तारायंत्राचे संशोधक सॅम्युअल मोर्स यांनी स्वत: विकसित केलेल्या सांकेतिक भाषेत पहिला संदेश वॉशिंग्टन येथून बाल्टिमोर येथे पाठवला.
[१८८३]=> न्यूयॉर्क मधील ब्रूकलिन ब्रिज वाहतुकीस खुला झाला.
[१९२४]=> आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जादूगार रघुवीर भोपळे ऊर्फ जादूगार रघुवीर यांचा जन्म.
[१९३३]=> रणजी व कसोटी क्रिकेटपटू, कुशल क्रीडा संघटक हेमचंद्र तुकाराम तथा बाळ दाणी यांचा जन्म.
[१९४०]=> इगोर सिकोरसकी यांनी एका-रोटर हेलिकॉप्टर चे यशस्वी उड्डाण केले.
[१९४२]=> पर्यावरणतज्ञ माधव गाडगीळ यांचा जन्म.
[१९५०]=> भारताचे ४३वे गर्वनर जनरल आर्चिबाल्ड वावेल यांचे निधन.
[१९५५]=> संगीतकार राजेश रोशन यांचा जन्म.
[१९७३]=> भारतीय दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथालेखक शिरीष कुंदर यांचा जन्म.
[१९७६]=> ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणार्‍या काँकॉर्ड विमानाची लंडन ते न्यूयॉर्क अशी सेवा सुरू झाली.


[१९८४]=> डब्ल्यू.डब्ल्यू.ई. चे स्थापक विन्स मॅकमोहन सीनिय यांचे निधन.
[१९९१]=> एरिट्रियाला इथिओपियाकडून स्वातंत्र्य मिळाले.
[१९९३]=> जुन्या पिढीतील संगीतकार व गायक बुलो चंदीराम रामचंदानी ऊर्फ बुलो सी. रानी यांचे निधन.
[१९९४]=> २६ फेब्रुवारी १९९३ रोजी न्यूयॉर्क येथील वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणणार्‍या चार मुस्लीम दहशतवाद्यांना प्रत्येकी २४० वर्षे कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.
[१९९५]=> इंग्लंडचे पंतप्रधान हॅरॉल्ड विल्सन यांचे निधन.
[१९९९]=> पद्मश्री आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते कुस्ती प्रक्षिशक विजयपाल लालाराम तथा गुरू हनुमान यांचे निधन.
[२०००]=> दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते शायर, गीतकार आणि कवी मजरुह सुलतानपुरी यांचे निधन.
[२०००]=> भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (ISRO) विकसित केलेला इन्सॅट-३बी हा उपग्रह पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते राष्ट्राला अर्पण.
[२००१]=> १८ व्या वर्षी माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करणारा शेर्पा तेब्बा त्रेथी सर्वात लहान व्यक्ती ठरला.

हे पण पहा :- विज्ञान दिन

            तुम्हाला २४ मे दिनविशेष | 24 May Dinvishesh | 24 May day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad