२५ मे दिनविशेष | 25 May Dinvishesh | 25 May day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, May 24, 2024

२५ मे दिनविशेष | 25 May Dinvishesh | 25 May day special in Marathi

२५ मे दिनविशेष

25 May Dinvishesh

25 May day special in Marathi

२५ मे दिनविशेष | 25 May Dinvishesh | 25 May day special in Marathi

            २५ मे दिनविशेष ( 25 May Dinvishesh | 25 May day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण २५ मे दिनविशेष ( 25 May Dinvishesh | 25 May day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

२५ मे दिनविशेष

25 May Dinvishesh

25 May day special in Marathi


@ ऑफ्रींकन मुक्ती दिन [African Liberation Day]
[१६६६]=> शिवाजी महाराज आग्रा येथे नजरकैदेत.
[१८०३]=> अमेरिकन लेखक व तत्वज्ञ राल्फ वाल्डो इमर्सन यांचा जन्म.
[१८३१]=> ब्रिटिश हवामानशास्त्रज्ञ सर जॉन इलियट यांचा जन्म.
[१८८६]=> क्रांतिकारक रास बिहारी घोष यांचा जन्म.
[१८९५]=> इतिहासकार व लेखक त्र्यंबक शंकर शेजवलकर यांचा जन्म.
[१८९९]=> स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारक, बंगाली कवी काझी नझरुल इस्लाम यांचा जन्म.
[१९२७]=> अमेरिकन लेखक रॉबर्ट लुडलुम यांचा जन्म.
[१९३६]=> क्रिकेटपटू रुसी सुरती यांचा जन्म.
[१९५३]=> अमेरिकेतील पहिले सार्वजनिक टेलिव्हिजन स्टेशन वरून अधिकृत पाने प्रसारण सुरू झाले.
[१९५४]=> आधुनिक भारतीय व्यायामविद्येचे प्रवर्तक, कन्या आरोग्य मंदिरा चे संस्थापक गजानन यशवंत ताम्हणे तथा माणिकराव यांचे निधन.
[१९५४]=> रतीय अभिनेता, निर्माता आणि राजकारणी मुरली यांचा जन्म.
[१९५५]=> कांचनगंगा हे जगातील तिसरे सर्वोच्‍च शिखर प्रथमच जो ब्राऊन आणि जॉर्ज बॅन्ड या ब्रिटिश गिर्यारोहकांनी सर केले.
[१९६१]=> अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांनी हे दशक संपण्यापुर्वी चंद्रावर मानव उतरवण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात येईल (Apollo Program) असे अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनात जाहीर केले.
[१९६३]=> इथिओपियातील आदिसाबाबा येथे ऑर्गनायझेशन ऑफ अफ्रिकन युनिटी (OAU) ची स्थापनाझाली.


[१९७२]=> भारतीय अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथालेखक करण जोहर यांचा जन्म.
[१९७७]=> चिनी सरकारने विल्यम शेक्सपिअरच्या साहित्यावरील बंदी उठवली. सुमारे १० वर्षे ही बंदी अमलात होती.
[१९८१]=> सौदी अरेबियातील रियाध येथे गल्फ कोऑपरेशन कौन्सिल (GCC) या संघटनेची स्थापना झाली. बहारिन, कुवेत, ओमान, कतार, सौदी अरेबिया आणि यू. ए. ई. हे या संघटनेचे सदस्य देश आहेत.
[१९८५]=> बांगलादेशात झालेल्या चक्रीवादळात अंदाजे १०,००० लोक ठार झाले.
[१९९२]=> विख्यात बंगाली साहित्यिक सुभाष मुखोपाध्याय यांना १९९१ चा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर.
[१९९८]=> लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीतील संगीतकार लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर यांचे निधन.
[१९९९]=> संशोधक, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे (NCL) संचालक बाळ दत्तात्रय तथा बी. डी. टिळक यांचे निधन.
[१९९९]=> सुमारे १०० वर्षांपासून पंढरपूरला येणार्‍या लाखो वारकर्‍यांची आणि नागरिकांची सेवा केलेल्या पंढरपूर-कुर्डुवाडी या नॅरोगेज रेल्वेला निरोप देण्यात आला.
[२००५]=> अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक व केंद्रीय मंत्री सुनील दत्त यांचे निधन.
[२०११]=> द ओपराह विन्फ्रे शो चा शेवट करण्यात आला. ओपराह विन्फ्रे यांनी हा शो पंचवीस वर्ष चालवला होता.
[२०१२]=> स्पेसएक्स ड्रॅगन हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकांसह यशस्वीरित्या एकत्र येणारे पहिले व्यावसायिक अंतराळयान ठरले.
[२०१३]=> भारतीय राजकारणी महेंद्र कर्मा यांचे निधन.

हे पण पहा :- विज्ञान दिन

            तुम्हाला २५ मे दिनविशेष | 25 May Dinvishesh | 25 May day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad