२६ मे दिनविशेष | 26 May Dinvishesh | 26 May day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, May 25, 2024

२६ मे दिनविशेष | 26 May Dinvishesh | 26 May day special in Marathi

२६ मे दिनविशेष

26 May Dinvishesh

26 May day special in Marathi

२६ मे दिनविशेष | 26 May Dinvishesh | 26 May day special in Marathi

            २६ मे दिनविशेष ( 26 May Dinvishesh | 26 May day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण २६ मे दिनविशेष ( 26 May Dinvishesh | 26 May day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

२६ मे दिनविशेष

26 May Dinvishesh

26 May day special in Marathi


[१६६७]=> फ्रेन्च गणिती अब्राहम डी. मुआव्हर यांचा जन्म.

[१७०३]=> विख्यात इंग्रजी रोजनिशीकार व कुशल प्रशासक सॅम्युअल पेपिस यांचे निधन.

[१८८५]=> नाटककार, कवी व विनोदी लेखक राम गणेश गडकरी यांचा जन्म.

[१८९६]=> निकोलस (दुसरा) रशियाचा झार बनला.

[१९०२]=> अमेरिकन संशोधक अल्मोन स्ट्राउजर यांचे निधन.

[१९०२]=> नाटककार व साहित्यिक सदाशिव अनंत शुक्ल ऊर्फ कुमुदबांधव यांचा जन्म.

[१९०६]=> आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय कृषी संशोधक बेन्जामिन पिअरी पाल यांचा जन्म.

[१९०८]=> अहमदिया पंथाचे संस्थापक मिर्झा गुलाम अहमद यांचे निधन.

[१९३०]=> भारतीय-ईराणी भाषेतील शब्दलेखक आणि समीक्षक करीम इमामी यांचा जन्म.


[१९३७]=> भारतीय अभिनेत्री आणि गायक मनोरमा यांचा जन्म.

[१९३८]=> भारतीय दिग्दर्शक आणि निर्माता बी. बिक्रम सिंग यांचा जन्म.

[१९४५]=> महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय अवजड उद्योग मंत्री विलासराव देशमुख यांचा जन्म.

[१९६१]=> भारतीय-अमेरिकन दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथालेखक तारसेम सिंग यांचा जन्म.

[१९६६]=> दक्षिण अफ्रिकेची धावपटू झोला बड यांचा जन्म.

[१९७१]=> बांगलादेशातील सिल्हेट येथे पाकिस्तानी सैन्याने ७१ हिंदूंची कत्तल केली.

[१९८६]=> युरोपियन समुदायाने (EU) नवीन ध्वज अंगीकारला.

[१९८९]=> मुंबईजवळच्या न्हावा-शेवा बंदराचे उद्‍घाटन झाले.

[१९९९]=> श्रीहरिकोटा येथून पी. एस. एल. व्ही. – सी. २ या धृवीय उपग्रहवाहकाने भारताचा आय. एस. एस. पी. ४ (ओशनसॅट), कोरियाचा किटसॅट व जर्मनीचा डी. एल. आर. – टबसॅट या तीन उपग्रहांना त्यांच्या कक्षेत यशस्वीरीत्या पोहोचवले.

[२०००]=> अर्थतज्ञ व लेखक, मराठी भाषेतील पहिल्या अर्थविषयक नियतकालिकाचे संपादक श्रीपाद वामन काळे यांचे निधन.

[२०००]=>चित्रकार प्रभाकर शिरुर यांचे निधन.

[२०१४]=> नरेंद्र मोदी यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून सूत्रे हाती घेतली.

हे पण पहा :- विज्ञान दिन

            तुम्हाला २६ मे दिनविशेष | 26 May Dinvishesh | 26 May day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad