२७ मे दिनविशेष | 27 May Dinvishesh | 27 May day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, May 26, 2024

२७ मे दिनविशेष | 27 May Dinvishesh | 27 May day special in Marathi

२७ मे दिनविशेष

27 May Dinvishesh

27 May day special in Marathi

२७ मे दिनविशेष | 27 May Dinvishesh | 27 May day special in Marathi

            २७ मे दिनविशेष ( 27 May Dinvishesh | 27 May day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण २७ मे दिनविशेष ( 27 May Dinvishesh | 27 May day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

२७ मे दिनविशेष

27 May Dinvishesh

27 May day special in Marathi


@ रमाबाई भीमराव आंबेडकर यांची पुण्यतिथी. [Death anniversary of Ramabai Bhimrao Ambedkar]

[१८८३]=> अलेक्झांडर (तिसरा) रशियाचा झार बनला.

[१९०६]=> महाराष्ट्र साहित्य परिषदेची स्थापना.

[१९१०]=> नोबेल पारितोषिक मिळालेले जर्मन डॉक्टर रॉबर्ट कोच यांचे निधन.

[१९१३]=> चित्रकार व नृत्यदिग्दर्शक कृष्णदेव मुळगुंद यांचा जन्म.

[१९१९]=> भारतीय लेखक कंधुकुरी वीरसासिंगम यांचे निधन.

[१९२३]=> अमेरिकेचे ५६ वे राष्ट्राध्यक्ष व नोबेल पारितोषिक विजेते हेन्‍री किसिंजर यांचा जन्म.

[१९३०]=> त्याकाळी सर्वात उंच (३१९ मीटर – १०४६ फूट) असलेल्या ख्रायसलर सेंटर या इमारतीचे 
न्यूयॉर्कमधे उद्‍घाटन झाले.

[१९३५]=> डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्‍नी रमाबाई भीमराव आंबेडकर यांचे निधन.

[१९३८]=> कादंबरीकार डॉ. भालचंद्र वनाजी नेमाडे यांचा जन्म.

[१९४१]=> दुसरे महायुद्ध – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट यांनी देशात आणीबाणी जाहीर केली.

[१९५१]=> मुंबई येथे तारापोरवाला मत्स्यालय सुरू झाले.

[१९५७]=> भारतीय वकील आणि राजकारणी नितीन गडकरी यांचा जन्म.


[१९६२]=> भारतीय क्रिकेटर रवी शास्त्री यांचा जन्म.

[१९६४]=> गुलजारीलाल नंदा यांनी भारताचे हंगामी पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारला.

[१९६४]=> भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांचे निधन.

[१९७५]=> ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मायकेल हसी यांचा जन्म.

[१९७७]=> श्रीलंकेचा क्रिकेटपटू महेला जयवर्धने यांचा जन्म.

[१९८६]=> भारतीय राजकारणी, पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री अजय मुखर्जी निधन.

[१९८६]=> संगीत समीक्षक आणि संस्कृतचे अभ्यासक अरविंद मंगरुळकर यांचे निधन.

[१९९४]=> विचारवंत लक्ष्मण बाळाजी तथा तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे निधन.

[१९९८]=> अर्थतज्ञ मिनोचर रुस्तुम तथा मिनू मसानी यांचे निधन.

[१९९८]=> ग्रँड प्रिन्सेस या जगातल्या (त्याकाळच्या) सर्वात मोठ्या व सर्वात महागड्या जहाजाने आपल्या पहिल्या सफरीला सुरुवात केली.

[१९९९]=> अमेरिकेचे डिस्कव्हरी हे अंतराळयान नव्या अंतराळस्थानकाकडे झेपावले.

[२००७]=> हॉट एअर बलून चे निर्माते एड यॉस्ट यांचे निधन.

[२०१६]=> हिरोशिमा पीस मेमोरियल पार्क आणि हिबाकुशाला भेट देणारे बराक ओबामा अमेरिकेचे पहिले राष्ट्रपती आहेत.

हे पण पहा :- विज्ञान दिन

            तुम्हाला २७ मे दिनविशेष | 27 May Dinvishesh | 27 May day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad