३१ मे दिनविशेष | 31 May Dinvishesh | 31 May day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, May 30, 2024

३१ मे दिनविशेष | 31 May Dinvishesh | 31 May day special in Marathi

३१ मे दिनविशेष

31 May Dinvishesh

31 May day special in Marathi

३१ मे दिनविशेष | 31 May Dinvishesh | 31 May day special in Marathi

            ३१ मे दिनविशेष ( 31 May Dinvishesh | 31 May day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण ३१ मे दिनविशेष ( 31 May Dinvishesh | 31 May day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

३१ मे दिनविशेष

31 May Dinvishesh

31 May day special in Marathi


@ तंबाखू विरोधी दिन [Anti-Tobacco Day]
[ई .पु. ४५५]=> रोमन सम्राट पेट्रोनस मॅक्झिमस याला संतप्त जमावाने दगडांनी ठेचून ठार केले.
[१६८३]=> सेल्सियस थर्मामीटरचे शोध लावणारे जीन पियरे क्रिस्टिन यांचे जन्म.
[१७२५]=> महाराणी अहिल्याबाई होळकर यांचा जन्म.
[१८७४]=> प्राच्यविद्या पंडित, पुरातत्त्वज्ञ रामकृष्ण विठ्ठल तथा भाऊ दाजी लाड यांचे निधन.
[१९१०]=> दक्षिण अफ्रिकेला स्वातंत्र्य मिळाले.
[१९१०]=> बालसाहित्यकार, विज्ञानकथाकार भास्कर रामचंद्र तथा भा. रा. भागवत यांचा जन्म.
[१९१०]=> वैद्यकशास्त्रातील पहिली महिला पदवीधर डॉ. एलिझाबेथ ब्लॅकवेल यांचे निधन.
[१९२१]=> आधुनिक गुजराथीतील प्रसिद्ध कवी सुरेश हरिप्रसाद जोशी यांचा जन्म.
[१९२८]=> क्रिकेटपटू पंकज रॉय यांचा जन्म.
[१९३०]=> अमेरिकन अभिनेता व दिग्दर्शक क्लिंट इस्टवूड यांचा जन्म.
[१९३५]=> पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील क्‍वेट्टा येथे झालेल्या ७.७ रिच्टर तीव्रतेच्या भूकंपात ५६,००० लोक ठार झाले.
[१९३८]=> नाट्यसमीक्षक विश्वनाथ भालचंद्र तथा वि. भा. देशपांडे यांचा जन्म.
[१९४२]=> दुसरे महायुद्ध – जपानी पाणबुड्यांनी सिडनी शहरावर हल्ल्यांचे सत्र सुरू केले.
[१९५२]=> संगीत नाटक अकादमी ची स्थापना.
[१९६१]=> दक्षिण अफ्रिका प्रजासत्ताक बनले.
[१९६६]=> श्रीलंकेचा क्रिकेटपटू रोशन महानामा यांचा जन्म.
[१९७०]=> पेरू देशातील ७.९ तीव्रतेच्या भूकंपामुळे ७०,००० च्या दरम्यान मारले गेले आणि ५०,००० जण जखमी झाले.
[१९७३]=> कथालेखक दिवाकर कृष्ण केळकर तथा दिवाकर कृष्ण यांचे निधन.
[१९९०]=> नेल्सन मंडेला यांना लेनिन आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार जाहीर.
[१९९२]=> प्रख्यात गुजराती कवी हरिंद्र दवे यांना १९९१ चा कबीर सन्मान मध्य प्रदेश सरकारकडून जाहीर.
[१९९४]=> बनारस घराण्याचे नामवंत तबलावादक पंडित सामताप्रसाद यांचे निधन.
[२००२]=> लेग स्पिनर सुभाष गुप्ते यांचे निधन.
[२००३]=> प्रतिभासंपन्न संगीतकार अनिल बिस्वास यांचे निधन.

हे पण पहा :- विज्ञान दिन

            तुम्हाला ३१ मे दिनविशेष | 31 May Dinvishesh | 31 May day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad