५ मे दिनविशेष | 5 May Dinvishesh | 5 May day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, May 4, 2024

५ मे दिनविशेष | 5 May Dinvishesh | 5 May day special in Marathi

५ मे दिनविशेष

5 May Dinvishesh

5 May day special in Marathi

५ मे दिनविशेष | 5 May Dinvishesh | 5 May day special in Marathi

            ५ मे दिनविशेष ( 5 May Dinvishesh | 5 May day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण ५ मे दिनविशेष ( 5 May Dinvishesh | 5 May day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

५ मे दिनविशेष

5 May Dinvishesh

5 May day special in Marathi


@ आंतरराष्ट्रीय सुईणी दिन [International Midwives' Day]

[१२६०]=> कुबलाई खान हा मंगोलियाचा सम्राट बनला.

[१४७९]=> शिखांचे तिसरे गुरू गुरू अमर दास यांचा जन्म.

[१८१८]=> कार्ल मार्क्स साम्यवादी विश्वक्रांतीचा पुरस्कर्ते यांचा जन्म.

[१८२१]=> फ्रान्सचा सम्राट, असामान्य सेनापती आणि कर्तबगार प्रशासक नेपोलियन बोनापार्ट यांचे निधन.

[१८६४]=> निले ब्लाय उर्फ एलिझाबेथ जेन कोचरन शोध्पात्राकारितेच्या जनक यांचा पीट्सबर्ग येथे जन्म.

[१९०१]=> पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी लाहोर येथे गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली.

[१९११]=> भारतीय शिक्षक व कार्यकर्ते प्रितलाता वडेदार यांचा जन्म.

[१९१६]=> ग्यानी झॆलसिंग भारताचे माजी राष्ट्रपती यांचा जन्म.

[१९१८]=> त्र्यंबक बापूजी ठोमरे उर्फ बालकवी तथा निसर्गकवी यांचे निधन.


[१९३६]=> इटालियन सैन्याने इथिओपियातील आदिसअबाबा शहराचा ताबा घेतला.

[१९४३]=> गायक नट, गायनगुरु रामकृष्णबुवा वझे यांचे निधन.

[१९४५]=> पं. रामकृष्णबुवा वझे गायनाचार्य यांचा पुणे येथे निधन.

[१९५५]=> पश्चिम जर्मनीला सार्वभौमत्व प्राप्त झाले.

[१९६४]=> युरोप परिषदेने ५ मे हा युरोप दिन घोषित केला.

[१९८९]=> उद्योगपती, पद्मभूषण नवल होर्मुसजी टाटा यांचे निधन.

[१९८९]=> लक्ष्मी राय तमिळ अभिनेत्री यांचा जन्म.

[१९९७]=> जयदीप आमरे या साडेपाचवर्षीय बालकाने गोव्यातील मांडवी नदी पोहून पार केली. एवढ्या छोट्या बालकाने ही नदी पोहून पार करण्याची ही पहिलीच घटना आहे.

[१९९९]=> दक्षिण पाकिस्तानातील हडप्पा येथे केलेल्या उत्खननात पुरातत्त्ववेत्त्यांना सर्वात प्राचीन लिपीचे अवशेष मिळाले.

[२००६]=> नौशाद अली ज्येष्ठ संगीत दिगदर्शक यांचा मुंबई येथे निधन.

[२००७]=> लेसर चे निर्माते थिओडोर हेरॉल्ड मॅमन यांचे निधन.

[२००८]=> बास्किन-रॉबिन्स चे सहसंस्थापक इरब रोबिन्स यांचे निधन.

[२०१२]=> भारतीय क्रिकेटपटू सुरेंद्रनाथ यांचे निधन.

हे पण पहा :- विज्ञान दिन

            तुम्हाला ५ मे दिनविशेष | 5 May Dinvishesh | 5 May day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad