६ मे दिनविशेष | 6 May Dinvishesh | 6 May day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, May 5, 2024

६ मे दिनविशेष | 6 May Dinvishesh | 6 May day special in Marathi

६ मे दिनविशेष

6 May Dinvishesh

6 May day special in Marathi

६ मे दिनविशेष | 6 May Dinvishesh | 6 May day special in Marathi

            ६ मे दिनविशेष ( 6 May Dinvishesh | 6 May day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण ६ मे दिनविशेष ( 6 May Dinvishesh | 6 May day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

६ मे दिनविशेष

6 May Dinvishesh

6 May day special in Marathi


@ आंतरराष्ट्रीय आहार नाही दिवस [International No Diet Day]

[१५४२]=> सेंट फ्रान्सिस झेव्हिअर तत्कालीन पोर्तुगीज गोव्याची राजधानी ओल्ड गोवा येथे पोहोचला.

[१५८९]=> अकबराच्या दरबारातील एक नवरत्‍न रामतनू पांडे ऊर्फ मोहमाद आट्टा खान तथा संगीतसम्राट तानसेन येथे निधन.

[१६३२]=> शहाजहान बादशहा व आदिलशहा यांच्यामधे शहाजीला पराभूत करण्याबद्दल तह झाला.

[१८१८]=> राजधानी रायगड लढवत असताना शेवटच्या बाजीरावाची पत्‍नी वाराणशीबाई इंग्रजांकडून पराभूत झाली.

[१८४०]=> पेनी ब्लॅक नावाचे जगातील पहिले टपाल तिकीट प्रसारित झाले.

[१८५६]=> ऑस्ट्रियन मानसशास्त्रज्ञ, आधुनिक मानसशास्त्राचे जनक सिग्मंड फ्रॉइड यांचा जन्म.

[१८६१]=> मोतीलाल गंगाधर नेहरु भारतीय राजनीतीज्ञ यांचा जन्म.

[१८६२]=> अमेरिकन लेखक व विचारवंत हेन्‍री थोरो येथे निधन.

[१८८९]=> पॅरिसमधील आयफेल टॉवरचे उद्‍घाटन झाले.

[१९२०]=> जुन्या पिढीतील संगीतकार गायक बुलो सी. रानी यांचा जन्म.

[१९२२]=> सामाजिक सुधारणांचे कृतिशील पुरस्कर्ते छत्रपती शाहू महाराज यांचे निधन.

[१९४०]=> प्रसिद्ध महिला तबलावादक, गायिका आणि संगीतज्ञ अबन मिस्त्री यांचा जन्म.

[१९४३]=> लेखिका वीणा चंद्रकांत गावाणकर यांचा जन्म.

[१९४६]=> भुलाभाई देसाई राजनीतीज्ञ यांचे निधन.

[१९४९]=> ईडीएसएसी पहिले इलेक्ट्रॉनिक डिजिटल संचयित संगणक सॉफ्टवेअर सुरु झाले.


[१९५१]=> भरतनाट्यम नर्तिका, नृत्यदिग्दर्शिका लीला सॅमसन यांचा जन्म.

[१९५२]=> इटालियन डॉक्टर शिक्षणतज्ञ मारिया माँटेसरी यांचे निधन.

[१९५३]=> ब्रिटनचे पंतप्रधान आणि मजूर पक्षाचे अध्यक्ष टोनी ब्लेअर यांचा जन्म.

[१९५४]=> रॉजर बॅनिस्टर हे १ मैल चार मिनिटांच्या आत धावणारे पाहिले व्यक्ती ठरले.

[१९६६]=> उदारमतवादी समाजसुधारक, नेमस्त पुढारी आणि शिक्षणज्ज्ञ रँगलर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे यांचे निधन.

[१९८३]=> अडोल्फ हिटलर यांच्या डायरीचा लबाडी म्हणून खुलासा केला गेला.

[१९९४]=> इंग्लिश खाडी खालून जाण‍ाऱ्या आणि इंग्लंड फ्रान्स यांना जोडण‍ाऱ्या युरो टनेलचे इंग्लंडची राणी एलिझाबेथ (दुसरी) आणि फ्रान्सचे अध्यक्ष फ्रँकॉइस मित्राँ यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले.

[१९९५]=> प्रवचनकार, संत वाङ्‍मयाचे गाढे अभ्यासक, हैदराबाद मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक आचार्य गोविंदराव गोसावी येथे निधन.

[१९९७]=> बँक ऑफ इंग्लंड ला स्वायत्तता देण्यात आली.

[१९९९]=> पुणे विद्यापीठातील जयकर ग्रंथालयाचे पहिले ग्रंथपाल व संस्थापक सदस्य कृष्णाजी शंकर हिंगवे येथे निधन.

[१९९९]=> महाराष्ट्र राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांत महिलांसाठी तीस टक्के आरक्षणाचा निर्णय घेण्यात आला.

[२००१]=> पोप जॉन पॉल (दुसरे) यांनी सिरीयातील एका मशिदीस भेट दिली. मशिदीस भेट देणारे ते पहिलेच पोप होत.

[२००१]=> विख्यात मराठी कादंबरीकार, लेखिका मालतीबाई बेडेकर यांचे पुणे येथे निधन.

[२००२]=> भूपिंदर नाथ किरपाल यांनी भारताचे ३१ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

[२०१५]=> सलमान खान यांना सदोष मनुष्यवधाच्या आरोपास दोषी ठरवून ५ वर्ष्याच्या कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच सलमान खान यांची हायकोर्टात अपील दाखल करून, जामिनावर सुटका.

हे पण पहा :- विज्ञान दिन

            तुम्हाला ६ मे दिनविशेष | 6 May Dinvishesh | 6 May day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad