९ मे दिनविशेष | 9 May Dinvishesh | 9 May day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, May 8, 2024

९ मे दिनविशेष | 9 May Dinvishesh | 9 May day special in Marathi

९ मे दिनविशेष

9 May Dinvishesh

9 May day special in Marathi

९ मे दिनविशेष | 9 May Dinvishesh | 9 May day special in Marathi

            ९ मे दिनविशेष ( 9 May Dinvishesh | 9 May day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण ९ मे दिनविशेष ( 9 May Dinvishesh | 9 May day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

९ मे दिनविशेष

9 May Dinvishesh

9 May day special in Marathi


@ महाराणा प्रताप यांची जयंती. [Birth anniversary of Maharana Pratap]

[१३३८]=> भगवद्‍भक्त चोखा मेळा हा मंगळवेढे येथील गावकुस बांधत असताना कोसळणार्‍या कुसबाखाली सापडला.

[१५४०]=> मेवाड चे सम्राट महाराणा प्रताप यांचा जन्म.

[१८१४]=> अव्वल इंग्रजीतील मराठी व्याकणकार दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचा जन्म.

[१८६६]=> थोर समाजसेवक गोपाल कृष्ण गोखले यांचा कातळूक, रत्नागिरी येथे जन्म.

[१८७४]=> मुंबईत घोड्यांनी ओढल्या जाणार्‍या ट्राम सुरू झाल्या.

[१८७७]=> पेरू देशाच्या किनारपट्टीवरील झालेल्या ८.८ तीव्रतेच्या भूकंपामुळे २५४१ लोक ठार झाले.

[१८८६]=> स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक प्रमुख नेते, शेतकरी कामगार पक्षाचे एक संस्थापक केशवराव मारुतराव जेधे यांचा जन्म.

[१९०४]=> वाफेवर चालणारे सिटी ट्रुरो हे इंजिन १६० किमी / ताशी पेक्षा जास्त वेगाने धावणारे यूरोपमधील पहिले इंजिन बनले.

[१९१७]=> डॉक्टर, कवी व शास्त्रज्ञ कान्होबा रणझोडदास यांचे निधन.

[१९१९]=> रेव्हरंड नारायण वामन टिळक यांचे निधन.

[१९२८]=> समाजवादी कामगारनेते, लेखक व समाजवादाचे अभ्यासक वसंत नीलकंठ गुप्ते यांचा जन्म.

[१९३१]=> वर्णपटाद्वारे प्रकाशाच्या मापनासंबंधीच्या शोधासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे जर्मन-अमेरिकन पदार्थवैज्ञानिक अल्बर्ट मायकेलसन यांचे निधन.

[१९३६]=> इटलीने इथिओपिया देश बळकावला.


[१९५५]=> पश्चिम जर्मनी देशाचा नाटो (NATO) मधे प्रवेश.

[१९५९]=> थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे निधन.

[१९८६]=> एवरेस्ट शिखर सर करणारा शेरपा तेलसिंग नोर्गे यांचे निधन.

[१९९५]=> दिग्दर्शक अनंत माने यांचे निधन.

[१९९८]=> पार्श्वगायक व अभिनेता, गझलचे बादशहा तलत महमूद यांचे निधन.

[१९९९]=> अटलांटा ग्रांप्री नेमबाजी स्पर्धेत भारताच्या रुपी उन्नीकृष्णनने प्रोन गटात रौप्यपदक पटकाविले.

[१९९९]=> उद्योगपती करमसीभाई जेठाभाई सोमय्या यांचे निधन.

[१९९९]=> ग्वाटेमालाच्या ज्युलिओ मार्टिनेझ याने ग्रॅन्ड प्रिक्स स्पर्धेतील वीस किलोमीटर चालण्याची शर्यत १ तास १७ मिनिटे व ४६ सेकंदात पूर्ण करुन नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला.

[२००८]=> किराणा घराण्याचे शास्त्रीय गायक पं. फिरोझ दस्तूर यांचे निधन.

[२०१४]=> भारतीय राजकारणी नेदुरुमल्ली जनार्दन रेड्डी यांचे निधन.

हे पण पहा :- विज्ञान दिन

            तुम्हाला ९ मे दिनविशेष | 9 May Dinvishesh | 9 May day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad