१ जुलै दिनविशेष | 1 July Dinvishesh | 1 July day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, June 30, 2024

१ जुलै दिनविशेष | 1 July Dinvishesh | 1 July day special in Marathi

१ जुलै दिनविशेष

1 July Dinvishesh

1 July day special in Marathi

१ जुलै दिनविशेष | 1 July Dinvishesh | 1 July day special in Marathi

            १ जुलै दिनविशेष ( 1 July Dinvishesh | 1 July day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण १ जुलै दिनविशेष ( 1 July Dinvishesh | 1 July day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

१ जुलै दिनविशेष

1 July Dinvishesh

1 July day special in Marathi


@ वसंतराव नाईक जयंती [Birth Anniversary of Vasantrao Naik]

@ राष्ट्रीय डॉक्टर दिन [National Doctor's Day]

[१६९३]=> संभाजीराजांच्या मृत्यूनंतर मोगलांकडे गेलेला सिंहगड नवजी बलकवडे यांनी पुन्हा स्वराज्यात आणला.

[१८३७]=> जन्म, मृत्यू व विवाह यांच्या सरकारी नोंदणीस इंग्लंडमधे सुरूवात झाली.

[१८६०]=> रबरावरील व्हल्कनायझेशन ही प्रक्रिया शोधणारे अमेरिकन संशोधक चार्ल्स गुडईयर यांचे निधन.

[१८७४]=> पहिले व्यावसायिक टंकलेखन यंत्र (टाइपराइटर) ची विक्री सुरु झाली.

[१८८१]=> जगातील पहिला टेलिफोन कॉल करण्यात आला.

[१८८२]=> भारतरत्न (१९६१), आंतरराष्ट्रीय कीर्तीचे निष्णात डॉक्टर आणि शिल्पकार डॉ. बिधनचंद्र रॉय यांचा जन्म.

[१८८७]=> कविवर्य एकनाथ पांडुरंग रेंदाळकर यांचा जन्म.

[१९०३]=> पहिल्या टूर डी फ्रान्स सायकल रेसची सुरवात झाली.

[१९०८]=> एसओएस (SOS) हे आंतरराष्ट्रीय तत्काळ चिन्ह म्हणून स्वीकारण्यात आले.

[१९०९]=> क्रांतिकार कमदनलाल धिंग्रा यांनी कर्नल विल्यम कर्झन वायली यांची गोळ्या झाडून हत्या केली.

[१९१३]=> महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, रोहयो योजनेचे जनक वसंतराव नाईक यांचा जन्म.

[१९१३]=> वसंतराव नाईक जयंती

[१९१९]=> कै. बाबूराव ठाकूर यांनी तरुणभारत वृत्तपत्राची सुरुवात.

[१९३३]=> नाट्यमन्वंतरच्या आंधळ्यांची शाळा नाटकाचा १ला प्रयोग झाला.

[१९३४]=> मानवी शरीराचे सर्वप्रथम छायाचित्र घेण्यात अमेरिकन डॉक्टरांना यश आले.

[१९३८]=> प्रख्यात कायदेपंडित, विद्वान दादासाहेब खापर्डे यांचे निधन.

[१९३८]=> प्रख्यात बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचा जन्म.

[१९४१]=> स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रागतिक पक्षाचे नेते व श्रेष्ठ वृत्तपत्रकार, पहिल्या गोलमेज परिषदेचे विशेष अतिथी, उत्तरप्रदेशचे शिक्षणमंत्री सर सी. वाय. चिंतामणी याचं निधन.

[१९४७]=> फिलिपाइन्सच्या वायूदलाची स्थापना झाली.

[१९४८]=> कायदेआझम मुहम्मद अली जीना यांच्या हस्ते स्टेट बँक ऑफ पाकिस्तान या पाकिस्तानच्या मध्यवर्ती बँकेचे उद्‍घाटन झाले.

[१९४८]=> बाजारपेठेतील व्यापार्‍यांचे नेतृत्त्व करणार्‍या पूना मर्चंट्स चेंबर या संस्थेची स्थापना झाली.

[१९४९]=> केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री आणि भाजपचे अध्यक्ष वेंकय्या नायडू यांचा जन्म.

[१९४९]=> त्रावणकोर आणि कोचीन ही संस्थाने एकत्र करून थिरुकोची संस्थान निर्माण झाले.

[१९५५]=> स्टेट बँक ऑफ इंडिया अ‍ॅक्ट १९५५ अन्वये स्टेट बँक ऑफ इंडिया अस्तित्वात आली. या आधी बँकचे नाव इंपिरिअल बँक होते.


[१९६०]=> रवांडा व बुरुंडी हे देश स्वतंत्र झाले.

[१९६१]=> भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर कल्पना चावला यांचा जन्म.

[१९६१]=> महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार पुणे विद्यापीठाचे चौथे कुलगुरू म्हणून सूत्रे हाती घेतले.

[१९६२]=> अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष पुरुषोत्तमदास टंडन यांचे निधन.

[१९६२]=> भारतरत्‍न, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे निष्णात डॉक्टर, आधुनिक बंगालचे शिल्पकार, पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री, काँग्रेसचे नेते, कलकत्ता विद्यापीठाचे कुलगुरु, ब्राम्हो समाजाचे सदस्य डॉ. बिधनचंद्र रॉय याचं निधन.

[१९६२]=> सोमालिया व घाना हे देश स्वतंत्र झाले.

[१९६३]=> अमेरिकेतील पत्रव्यवहारामध्ये झिप कोड वापराची सुरवात करण्यात आली.

[१९६४]=> न. वि. गाडगीळ पुणे विद्यापीठाचे पाचवे कुलगुरू झाले.

[१९६६]=> कॅनडा मधील पहिल्या रंगीत टेलिव्हिजन चे प्रक्षेपण टोरांटो येथून सुरु झाले.

[१९६६]=> रामपूर-साहसवान घराण्याचे शास्त्रीय गायक उस्ताद राशिद खान यांचा जन्म.

[१९६९]=> कीर्तनकार मुरलीधरबुवा निजामपूरकर यांचे निधन.

[१९७९]=> सोनी कंपनी ने व्हॅकमन प्रकाशित केला.

[१९८०]=> ओ कॅनडा हे अधिकृतपणे कॅनडाचे राष्ट्रागीत बनले.

[१९८९]=> कवी तसेच शिक्षणतज्ज्ञ प्राचार्यग. ह. पाटील यांचे निधन.

[१९९१]=> सोविएत रशिया, अल्बानिया, बल्गेरिया, झेकोस्लोव्हाकिया, हंगेरी, पोलंड, रुमानिया आणि पूर्व जर्मनी या कम्युनिस्ट राष्ट्रांत अस्तित्त्वात असलेला वॉर्सा करार संपुष्टात आला.

[१९९४]=> दिग्दर्शक, नेपथ्यकार, प्रकाशयोजक राजाभाऊ नातू यांचे निधन.

[१९९७]=> सर्वोत्कृष्ट वेटलिफ्टर्सच्या यादीत भारताची कुंजराणी देवी यांना स्थान मिळाले.

[१९९९]=> एम अँड एम चे संस्थापक फॉरेस्ट मार्स सीनियर यांचे निधन.

[२००१]=> फेरारी संघाच्या मायकेल शूमाकरने जागतिक फॉर्मुला वन मालिकेतील फ्रेन्च ग्रां. प्री. शर्यत जिंकून फॉर्मुला वन मालिकेतील ५० वे विजेतेपद पटकावले.

[२००२]=> आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयाची स्थापना झाली.

[२००७]=> इंग्लंड मध्ये सर्व सार्वजनिक स्थानांवर धूम्रपान करण्यास बंदी घालण्यात आली.

[२०१५]=> डिजिटल इंडिया या प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.


            तुम्हाला १ जुलै दिनविशेष | 1 July Dinvishesh | 1 July day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad