१४ जून दिनविशेष | 14 June Dinvishesh | 14 June day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, June 13, 2024

१४ जून दिनविशेष | 14 June Dinvishesh | 14 June day special in Marathi

१४ जून दिनविशेष

14 June Dinvishesh

14 June day special in Marathi

१४ जून दिनविशेष | 14 June Dinvishesh | 14 June day special in Marathi

            १४ जून दिनविशेष ( 14 June Dinvishesh | 14 June day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण १४ जून दिनविशेष ( 14 June Dinvishesh | 14 June day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

१४ जून दिनविशेष

14 June Dinvishesh

14 June day special in Marathi


@ जागतिक रक्तदाता दिन [World Blood Donor Day]

@ मिथुन संक्रांती [Mithuna Sankranti]

[११५८]=> इसार नदीच्या काठावर म्यूनिच शहर स्थापन केले.

[१४४४]=> भारतीय खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ निळकंथा सोमायाजी यांचा जन्म.

[१७०४]=> मुघलांच्या कैदेत असलेल्या संभाजीराजे यांच्या मुलाचे औरंगजेबाने लग्न लावून दिले.

[१७३६]=> फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ चार्ल्स कुलोम यांचा जन्म.

[१७७७]=> अमेरिकेने स्टार्स अँड स्ट्राइप्स या ध्वजाचा स्वीकार केला.

[१७८९]=> मक्यापासुन पहिल्यांदाच व्हिस्की तयार करण्यात आली. तिला बोर्बोन असे नाव देण्यात आले.

[१८२५]=> वॉशिंग्टन शहराचे रचनाकार फ्रेन्च अमेरिकन वास्तुविशारद आणि स्थापत्य अभियंता पिअर चार्ल्स एल्फांट यांचे निधन.

[१८६४]=> जर्मन मेंदुविकारतज्ञ अलॉइस अल्झायमर यांचा जन्म.

[१८६८]=> नोबेल पारितोषिक विजेते ऑस्ट्रियन जीवशास्त्रज्ञ कार्ल लॅन्ड्स्टायनर यांचा जन्म.

[१८९६]=> महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रम ही संस्था स्थापन केली.

[१९०७]=> नॉर्वेत स्त्रियांना मतदानाचा अधिकार.

[१९१६]=> मराठी नाटककार नाट्यदिग्दर्शक गोविंद बल्लाळ देवल यांचे निधन.

[१९२०]=> जर्मन अर्थशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ मॅक्स वेबर यांचे निधन.

[१९२२]=> हिंदी चित्रपट दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथा लेखक के. आसिफ यांचा जन्म.

[१९२६]=> ब्राझील लीग ऑफ नेशन्समधून बाहेर.


[१९३८]=> सुपरमॅनची चित्रपट कथा पहिल्यांदा प्रकाशित.

[१९४०]=> दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी पॅरिस जर्मनीच्या हवाली केले.

[१९४५]=> भारताला स्वायत्तता देण्यासंबंधीची वेव्हेल योजना जाहीर.

[१९४६]=> ब्रिटिश शास्त्रज्ञ, आद्य दूरचित्रवाणी संशोधक जॉन लोगी बेअर्ड यांचे निधन.

[१९५२]=> अमेरिकेने अणुशक्तीवर चालणारी पहिली पाणबुडी यू. एस. एस. नॉटिलस बांधण्यास सुरुवात केली.

[१९६२]=> पॅरिसमध्ये युरोपियन अंतराळ संशोधन संस्था स्थापन झाली – नंतर युरोपियन स्पेस एजंसी बनली.

[१९६७]=> चीनने पहिल्या हायड्रोजन बॉम्ब ची चाचणी केली.

[१९६७]=> मरिनर अंतराळ यान शुक्राकडे प्रक्षेपित.

[१९६९]=> प्रसिद्ध जर्मन टेनिस खेळाडू स्टेफी ग्राफ यांचा जन्म.

[१९७२]=> डी. डी. टी. या कीटकनाशकाच्या वापरावर अमेरिकेत बंदी घालण्यात आली.

[१९८९]=> मराठी अभिनेत्री संस्कृत पंडित सुहासिनी मुळगावकर यांचे निधन.

[१९९९]=> दक्षिण आफ्रिकेचे पहिले श्वेतवर्णीय राष्ट्राध्यक्ष नोबेल पारितोषिक विजेते नेल्सन मंडेला यांचा कायर्काळ संपला.

[२००१]=> ए. सी. किंवा डी. सी. यापैकी कोणत्याही विद्युतप्रवाहावर चालणार्‍या उपनगरी गाडीचा (Electric Multiple Unit EMU) शुभारंभ पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक वासुदेव गुप्ता यांच्या हस्ते झाले.

[२००७]=> संयुक्त राष्ट्रांचे चौथे सरचिटणीस कुर्त वाल्ढहाईम यांचे निधन.

[२०१०]=> इंग्रजी लेखक मनोहर माळगावकर यांचे निधन.


            तुम्हाला १४ जून दिनविशेष | 14 June Dinvishesh | 14 June day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad