१५ जून दिनविशेष | 15 June Dinvishesh | 15 June day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, June 14, 2024

१५ जून दिनविशेष | 15 June Dinvishesh | 15 June day special in Marathi

१५ जून दिनविशेष

15 June Dinvishesh

15 June day special in Marathi

१५ जून दिनविशेष | 15 June Dinvishesh | 15 June day special in Marathi

            १५ जून दिनविशेष ( 15 June Dinvishesh | 15 June day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण १५ जून दिनविशेष ( 15 June Dinvishesh | 15 June day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

१५ जून दिनविशेष

15 June Dinvishesh

15 June day special in Marathi


@ जागतिक पवन दिवस [World Wind Day]

@ जागतिक वृद्ध अत्याचार जागरूकता दिवस [World Elder Abuse Awareness Day]

@ जागतिक पितृदिन (जूनचा तिसरा रविवार) [World Father’s Day(3rd Sunday of June)]

[१५३४]=> योगी चैतन्य महाप्रभू यांचे निधन.

[१६६७]=> वैद्यकीय इतिहासात प्रथमच जॉं बाप्तिस्ते डेनिस या डॉक्टरने १५ वर्षे वयाच्या एका फ्रेंच मुलाच्या शरीरात कोकराचे रक्त टोचले.

[१८४४]=> चार्ल्स गुडइयरने रबराच्या व्हल्कनायझेशनचे पेटंट घेतले.

[१८६९]=> महाराष्ट्रातील पहिला विधवा विवाह साजरा झाला.

[१८७८]=> भारतीय-अमेरिकन गोल्फर मार्गारेट अॅबॉट यांचा जन्म.

[१८९८]=> पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक गजानन श्रीपत तथा अण्णासाहेब खेर यांचा जन्म.

[१९०७]=> स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील नेते आणि समाजवादी विचारवंत ना. ग. गोरे यांचा जन्म.

[१९१७]=> संगीतकार मेंडोलीनवादक सज्जाद हुसेन यांचा जन्म.

[१९१९]=> कॅप्टन जॉन अलकॉक, लेफ्टनंट आर्थर ब्राऊन यांनी विमानातून सर्वप्रथम अटलांटिक महासागर पार केला.

[१९२३]=> साहित्यिक केशवजगन्नाथ पुरोहित ऊर्फ शांताराम यांचा जन्म.

[१९२७]=> भारतीय-पाकिस्तानी कवी आणि लेखक इब्न-ए-इनशा यांचा जन्म.

[१९२८]=> साहित्यिक शंकर वैद्य यांचा जन्म.


[१९२९]=> गायिका व अभिनेत्री सुरैय्या जमाल शेख ऊर्फ सुरैय्या यांचा जन्म.

[१९३१]=> अर्वाचीन मराठीतील सुलभ लेखन शैलीचे प्रवर्तक, संदेशकार अच्युत बळवंत कोल्हटकर 
यांचे निधन.

[१९३२]=> धृपद गायक झिया फरिदुद्दीन डागर यांचा जन्म.

[१९३३]=> लेखिका सरोजिनी वैद्य यांचा जन्म.

[१९३७]=> लोकपाल बिलासाठी आग्रह धरणारे समाजसेवक अण्णा हजारे यांचा जन्म.

[१९४७]=> साहित्यिक आणि नाटककार प्रेमानंद गज्वी यांचा जन्म.

[१९७०]=> बा. पां. आपटे पुणे विद्यापीठाचे आठवे कुलगुरू झाले.

[१९७९]=> कवी गीतकार सूर्यकांत रामचंद्र खांडेकर यांचे निधन.

[१९८३]=> साहित्य अकादमी पुरस्कार विजेते तेलुगू कवी गीतकार श्रीरंगम श्रीनिवास राव ऊर्फ श्री श्री यांचे निधन.

[१९९३]=> संपूर्ण देशी बनावटीच्या सहा ‘अर्जुन’ रणगाड्यांची पहिली तुकडी लष्कराकडे सुपूर्द करण्यात आली.

[१९९४]=> इस्त्रायल व व्हॅटिकन सिटी यांमधे पूर्ण राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.

[१९९७]=> अजामीनपात्र गुन्ह्याचा आरोप असलेली व्यक्ती फरारी असेल, तर तिच्यावर आरोपपत्र दाखल नसतानाही न्यायमूर्ती अटक वॉरंट जारी करू शकतात असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला.

[२००१]=> ग्रँडमास्टर विजयालक्ष्मी सुब्रह्मण्यम यांनी राष्ट्रीय अ बुद्धिबळ स्पर्धा विक्रमी पाचव्यांदा जिंकली.

[२००८]=> लेहमन ब्रदर्स या वित्तसंस्थेने दिवाळखोरी जाहीर केली.


            तुम्हाला १५ जून दिनविशेष | 15 June Dinvishesh | 15 June day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad