१७ जून दिनविशेष | 17 June Dinvishesh | 17 June day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, June 16, 2024

१७ जून दिनविशेष | 17 June Dinvishesh | 17 June day special in Marathi

१७ जून दिनविशेष

17 June Dinvishesh

17 June day special in Marathi

१७ जून दिनविशेष | 17 June Dinvishesh | 17 June day special in Marathi

            १७ जून दिनविशेष ( 17 June Dinvishesh | 17 June day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण १७ जून दिनविशेष ( 17 June Dinvishesh | 17 June day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

१७ जून दिनविशेष

17 June Dinvishesh

17 June day special in Marathi


@ 
राजमाता जिजाबाई यांची पुण्यतिथी [Death anniversary of Rajmata Jijabai]

वाळवंटीकरण आणि दुष्काळाचा सामना करण्यासाठी जागतिक दिवस (आंतरराष्ट्रीय) [World Day to Combat Desertification and Drought (International)]

[१२३९]=> इंग्लंडचा राजा एडवर्ड (पहिला) यांचा जन्म.

[१२९७]=> ज्येष्ठ गुरु संत श्री निवृत्तीनाथ महाराज यांनी त्र्यंबकेश्वर येथे देह ठेवला.

[१६३१]=> ताजमहाल जिच्या साठी बांधला ती मुमताज बाळाला जन्म देताना मरण पावली.

[१६३१]=> शाहजहानची पत्नी मुमताज महल यांचे निधन.

[१६७४]=> राजमाता जिजाबाई यांचे निधन.

[१७०४]=> फ्लाइंग शटल चे शोधक जॉन के यांचा जन्म.

[१८६७]=> लघुलेखन पद्धतीचा शोधक जॉनरॉबर्ट ग्रेग यांचा जन्म.

[१८८५]=> न्यू यॉर्क बंदरमध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टी चे आगमन झाले.

[१८९३]=> भारताचे १४ वे राज्यपाल जनरल लॉर्ड विल्यम बेंटिंक यांचे निधन.

[१८९५]=> थोर समाजसुधारक गोपाल गणेश आगरकर यांचा दारिद्र्य आणि दमा या विकाराने मृत्यु.

[१८९८]=> जर्मन भौतिकशास्त्रज्ञ कार्ल हेर्मान यांचा जन्म.



[१९०३]=> चॉकोलेट चिप कुकी चे निर्माते रुथ ग्रेव्हस वेकफिल्ड यांचा जन्म.

[१९०३]=> संगीतशिक्षक बाबूराव विजापुरे यांचा जन्म.

[१९२०]=> नोबेल पारितोषिक विजेता फ्रेंच जीवशास्त्रज्ञ फ्रांस्वा जेकब यांचा जन्म.

[१९२८]=> ओरिसातील समाजसुधारक गोपबंधूदास तथा उत्कलमणी यांचे निधन.

[१९४०]=> दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी फ्रान्समधुन माघार घेण्यास सुरूवात केली.

[१९४४]=> आइसलँडने (डेन्मार्कपासून) स्वातंत्र्य घोषित केले आणि ते प्रजासत्ताक बनले.

[१९६३]=> अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने सार्वजनिक शाळांतून बायबलचे पठण करणे कायदेबाह्य ठरवले.

[१९६५]=> अभिनेते मोतीलाल राजवंश ऊर्फ मोतीलाल यांचे निधन.

[१९६७]=> चीनने पहिल्या हायड्रोजन बॉम्बचा स्फोट केला.

[१९७३]=> भारतीय टेनिसपटू लिएंडर पेस यांचा जन्म.

[१९८१]=> ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू शेन वॉटसन यांचा जन्म.

[१९८३]=> चित्रपट निर्माते, दिग्दर्शक शरद पिळगावकर यांचे निधन.

[१९९१]=> माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर.

[१९९६]=> राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांचे निधन.

[२००४]=> सामाजिक कार्यकर्त्या इंदुमती पारीख यांचे निधन.

[२०१३]=> भारताच्या उत्तराखंड राज्यात ढगफुटी होऊन एका दिवसात १३ इंच पाऊस पडला. शेकडो व्यक्ती मृत्युमुखी, हजारो यात्रेकरी अडकले.

हे पण पहा :- वाचनाचे फायदे

            तुम्हाला १७ जून दिनविशेष | 17 June Dinvishesh | 17 June day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad