१८ जून दिनविशेष | 18 June Dinvishesh | 18 June day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, June 17, 2024

१८ जून दिनविशेष | 18 June Dinvishesh | 18 June day special in Marathi

१८ जून दिनविशेष

18 June Dinvishesh

18 June day special in Marathi

१८ जून दिनविशेष | 18 June Dinvishesh | 18 June day special in Marathi

            १८ जून दिनविशेष ( 18 June Dinvishesh | 18 June day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण १८ जून दिनविशेष ( 18 June Dinvishesh | 18 June day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

१८ जून दिनविशेष

18 June Dinvishesh

18 June day special in Marathi


@ आंतरराष्ट्रीय सहल दिवस [International Picnic Day]

झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची पुण्यतिथी [ Death anniversary of Rani Lakshmibai of Jhansi ]

@ ऑटिस्टिक प्राइड डे [Autistic Pride Day]

[१८१५]=> वॉटर्लूच्या लढाईत नेपोलियनचा दारुण पराभव.

[१८३०]=> फ्रान्सने अल्जीरिया ताब्यात घेतले.

[१८५८]=> झाशीची राणी मणिकर्णिका तांबे ऊर्फ राणी लक्ष्मीबाई इंग्रजांचा पाठलाग टाळण्याच्या प्रयत्‍नात झालेल्या चकमकीत मृत्यूमुखी पडल्या.

[१८९९]=> स्वातंत्र्यसेनानी व समाजसुधारक शंकर त्रिंबक तथा दादा धर्माधिकारी यांचा जन्म.

[१९०१]=> मोचनगड या मराठीतील पहिल्या ऐतिहासिक कादंबरीचे लेखक आणि विविध ज्ञानविस्तार मासिकाचे संपादक रामचंद्र भिकाजी गुंजीकर यांचे निधन.

[१९०२]=> इंग्लिश लेखक सॅम्युअल बटलर यांचे निधन.

[१९०८]=> फिलीपाइन्स विश्वविद्यालाची (University of the Philippines) ची स्थापना झाली.

[१९११]=> पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ कमला सोहोनी यांचा जन्म.

[१९३०]=> चीनचा सम्राट डोवागर लोंग्यू याने देशातील सर्व परदेशी व्यक्तींना ठार करण्याचा हुकूम दिला.

[१९३१]=> प्रखर राष्ट्रवादी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ५ वे सरसंघचालक के. एस. सुदर्शन यांचा जन्म.

[१९३६]=> रशियन लेखक मॅक्झिम गॉर्की यांचे निधन.

[१९४२]=> दक्षिण अफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष थाबो म्बेकी यांचा जन्म.

[१९४२]=> संगीतकार, संगीतसंयोजक, वादक, गीतलेखक, बीटल्स चा सदस्य पॉल मॅकार्टनी यांचा जन्म.


[१९४६]=> डॉ. राममनोहर लोहिया यांनी गोव्याच्या मडगाव शहरातून गोवा मुक्तीचे रणशिंग फुंकले.

[१९५६]=> रँग्लर र. पु. परांजपे पुणे विद्यापीठाचे दुसरे कुलगुरू झाले.

[१९५८]=> इंग्लिश क्रिकेटपटू डग्लस जार्डिन यांचे निधन.

[१९६२]=> पुण्याच्या विधी महाविद्यालयाचे संस्थापक आणि प्राचार्य जे. आर. तथा नानासाहेब घारपुरे यांचे निधन.

[१९६५]=> सद्दाम हुसेन यांचा मुलगा उदय हुसेन यांचा जन्म.

[१९७४]=> स्वातंत्र्यसैनिक, लोकसभेचे हंगामी सभापती, साहित्यिक सेठ गोविंद दास यांचे निधन.

[१९८१]=> जनावरांमधे आढळणार्‍या लाळ्या-खुरकुत (Foot and Mouth Disease) रोगावरील पहिली जनुकीय लस विकसित झाली.

[१९८३]=> अंतराळवीर सैली राइड या अंतराळात प्रवास करणाऱ्या पहिल्या अमेरिकन महिला आहेत.

[१९९९]=> साहित्यिक, कथा आणि कादंबरीकार श्रीपाद रामकृष्ण काळे यांचे निधन.

[२००३]=> हिन्दी चित्रपटातील चरित्र अभिनेते जानकीदास यांचे निधन.

[२००५]=> भारतीय क्रिकेटपटू मुश्ताक अली यांचे निधन.

[२००९]=> मैहर घराण्याचे जागतिक कीर्तीचे सरोदवादक, पद्‌मविभूषण उस्ताद अली अकबर खाँ तथा खाँसाहेब यांचे निधन.

हे पण पहा :- क्रांती दिन

            तुम्हाला १८ जून दिनविशेष | 18 June Dinvishesh | 18 June day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad