२ जून दिनविशेष | 2 June Dinvishesh | 2 June day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, June 1, 2024

२ जून दिनविशेष | 2 June Dinvishesh | 2 June day special in Marathi

२ जून दिनविशेष

2 June Dinvishesh

2 June day special in Marathi

२ जून दिनविशेष | 2 June Dinvishesh | 2 June day special in Marathi

            २ जून दिनविशेष ( 2 June Dinvishesh | 2 June day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण २ जून दिनविशेष ( 2 June Dinvishesh | 2 June day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

२ जून दिनविशेष

2 June Dinvishesh

2 June day special in Marathi


@ इटलीचा प्रजासत्ताक दिन [Italy Republic Day]

@ आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिन [International Sex Workers' Day]

@ तेलंगणा निर्मिती दिवस [Telangana Formation Day]

[१७३१]=> अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांची पत्नी मार्था वॉशिंग्टन यांचा जन्म.

[१८००]=> कॅनडात जगातील सर्वप्रथम कांजिण्याची लस देण्यात आली.

[१८४०]=> इंग्लिश लेखक आणि कवी थॉमस हार्डी यांचा जन्म.

[१८९६]=> गुग्लियेमो मार्कोनीला रेडिअोसाठी पेटंट बहाल.

[१८९७]=> आपल्या मृत्यूचे वृत्त वर्तमानपत्रात वाचून मार्क ट्वेन म्हणाले, माझ्या मृत्यूचे वृत्त ही अतिशयोक्ती आहे.

[१९०७]=> मराठी नाटककार आणि लेखक विष्णू विनायक बोकील यांचा जन्म.

[१९३०]=> अमेरिकन अंतराळवीर पीट कॉनराड यांचा जन्म.

[१९४३]=> भारतीय संगीतकार इलय्या राजा यांचा जन्म.

[१९४६]=> राजा उंबेर्तो-२ ला हटवून इटलीने राजेशाही संपवली स्वतःला प्रजासत्ताक घोषित केले.

[१९४९]=> दक्षिण अफ्रिकेने गोरे सोडुन इतरांना दुय्यम नागरिक ठरवण्याचा कायदा केला.

[१९५३]=> इंग्लंडमध्ये राणी एलिझाबेथ दुसरीचा राज्याभिषेक.

[१९५५]=> इन्फोसिस चे सहसंस्थापक नंदन निलेकणी यांचा जन्म.

[१९५५]=> चित्रपट दिग्दर्शक मणिरत्नम यांचा जन्म.

[१९७९]=> पोप जॉन पॉल (दुसरे) यांनी (आपल्या मायदेशाला) पोलंडला भेट दिली. कम्युनिस्ट राष्ट्राला भेट देणारे ते पहिलेच पोप होत.

[१९९९]=> भूतानमध्ये दूरचित्रवाणी प्रसारण सुरू.

[२०००]=> लेखिका अमृता प्रीतम यांना दिल्ली सरकारचा अकरा लाख रुपयांचा सहस्रकातील कवयित्री हा पुरस्कार जाहीर.

[२०१४]=> तेलंगण भारताचे २९वे राज्य झाले.


            तुम्हाला २ जून दिनविशेष | 2 June Dinvishesh | 2 June day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad