२० जून दिनविशेष | 20 June Dinvishesh | 20 June day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, June 19, 2024

२० जून दिनविशेष | 20 June Dinvishesh | 20 June day special in Marathi

२० जून दिनविशेष

20 June Dinvishesh

20 June day special in Marathi

२० जून दिनविशेष | 20 June Dinvishesh | 20 June day special in Marathi

            २० जून दिनविशेष ( 20 June Dinvishesh | 20 June day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण २० जून दिनविशेष ( 20 June Dinvishesh | 20 June day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

२० जून दिनविशेष

20 June Dinvishesh

20 June day special in Marathi


@ जागतिक निर्वासित दिन (आंतरराष्ट्रीय) [World Refugee Day (International)]

[१६६८]=> जर्मनीतील संस्कृत विद्वान आणि धर्मप्रसारक हेन्‍रिच रॉथ यांचे निधन.

[१८३७]=> इंग्लंडचा राजा विल्यम (चौथा) यांचे निधन.

[१८३७]=> इंग्लंडच्या राणीपदी व्हिक्टोरिया यजमान झाल्या.

[१८४०]=> सॅम्युअल मोर्स यांना टेलिग्राफ चा पेटंट मिळाला.

[१८६३]=> वेस्ट व्हर्जिनिया अमेरिकेचे ३५ वे राज्य बनले.

[१८६९]=> किर्लोस्कर उद्योग समूहाचे संस्थापक लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचा जन्म.

[१८७७]=> अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांनी कॅनडा मध्ये जगातील पहिल्या व्यावसायिक दूरध्वनी सेवेची सुरवात केली.

[१८८७]=> देशातील मुंबई येथील सर्वाधिक गर्दीचे स्टेशन व्हिक्टोरिया टर्मिनस (सध्याचे नाव सी. एस. टी.) सुरू झाले.

[१८९९]=> केंब्रिज विद्यापीठाच्या ट्रायपॉस या गणिताच्या अंतिम परीक्षेत रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे पहिल्या वर्गात पहिले आल्यामुळे त्यांना सिनिअर रॅंग्लर होण्याचा बहुमान मिळाला.

[१९१५]=> चिनी-इंग्लिश दिग्दर्शक आणि पटकथाकार टेरेन्स यंग यांचा जन्म.

[१९१७]=> अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ जेम्समेसन क्राफ्ट्स यांचे निधन.

[१९२०]=> लोकशाही पद्धतीने निवडण्यात आलेले नेपाळचे पहिले पंतप्रधान, कम्युनिस्ट नेते मनमोहन अधिकारी यांचा जन्म.

[१९२१]=> टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना झाली.


[१९३९]=> जलदगती गोलंदाज व राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष रमाकांत देसाई यांचा जन्म.

[१९४६]=> पूर्व तिमोरचे राष्ट्राध्यक्ष जनाना गुस्माव यांचा जन्म.

[१९४८]=> नौरूचे राष्ट्राध्यक्ष लुडविग स्कॉटी यांचा जन्म.

[१९५२]=> भारतीय लेखक आणि कवी विक्रम सेठ यांचा जन्म.

[१९५४]=> इंग्लिश क्रिकेटपटू अ‍ॅलन लॅम्ब यांचा जन्म.

[१९६०]=> महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची स्थापना झाली.

[१९७२]=> क्रिकेटपटू पारस म्हांब्रे यांचा जन्म.

[१९८७]=> जागतिक कीर्तीचे पक्षीतज्ञ, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे (BNHS) एक संस्थापक डॉ. सलीम अली यांचे निधन.

[१९८७]=> पद्मभूषण डॉं. सलिम अली यांचे निधन.

[१९९०]=> ७.४ मेगावॅटचा भूकंपात इराण मध्ये ५०,००० लोक ठार तर १,५०,००० पर्यंत जखमी झाले.

[१९९७]=> मराठीतले शायर भाऊसाहेब पाटणकर उर्फ जिंदादिल यांचे निधन.

[१९९७]=> महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे राज्यातील पहिली मुलींची सैनिकी शाळा पुण्याजवळ सुरू झाली.

[१९९७]=> राष्ट्रपती पुरस्कार मिळवणारे निर्माते व दिग्दर्शक बासू भट्टाचार्य यांचे निधन.

[२००१]=> परवेझ मुशर्रफ पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष झाले.

[२००८]=> अभिनेते चंद्रकांत गोखले यांचे निधन.

[२०१३]=> भारतीय पत्रकार डिकी रुतनागुर यांचे निधन.


            तुम्हाला २० जून दिनविशेष | 20 June Dinvishesh | 20 June day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad