२४ जून दिनविशेष | 24 June Dinvishesh | 24 June day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, June 23, 2024

२४ जून दिनविशेष | 24 June Dinvishesh | 24 June day special in Marathi

२४ जून दिनविशेष

24 June Dinvishesh

24 June day special in Marathi

२४ जून दिनविशेष | 24 June Dinvishesh | 24 June day special in Marathi

            २४ जून दिनविशेष ( 24 June Dinvishesh | 24 June day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण २४ जून दिनविशेष ( 24 June Dinvishesh | 24 June day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

२४ जून दिनविशेष

24 June Dinvishesh

24 June day special in Marathi


@ आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरी दिन [International Diplomacy Day]

[१४४१]=> इटन कॉलेजची स्थापना.

[१७९३]=> फ्रान्समधील पपहिल्या प्रजासत्ताक घटनेचा अवलंब केला गेला.

[१८६२]=> रविकिरण मंडळाचे संस्थापक श्रीधर बाळकृष्ण रानडे यांचा जन्म.

[१८७०]=> चार्ल्स रँड याची हत्या करणारे दामोदर हरी चाफेकर यांचा जन्म.

[१८८०]=> ओ कॅनडाचे हे गाणे कॅनडाचे राष्ट्रगीत म्हणून पहिल्यांदा गायले गेले.

[१८९३]=> द वॉल्ट डिस्नी कंपनी चे सह-संस्थापक रॉय ओ. डिस्नी यांचा जन्म.

[१८९७]=> ग्वाल्हेर घराण्यातील प्रसिद्ध संगीतकार पद्मश्री पंडीत औंकारनाथ ठाकूर यांचा जन्म.

[१८९९]=> मराठी रंगभूमीवरचे नटसम्राट नानासाहेब फाटक यांचा कोल्हापुर येथे जन्म.

[१९०८]=> अमेरिकेचे २२वे आणि २४वे अध्यक्ष ग्रोव्हर क्लीव्हलँड यांचे निधन.

[१९०८]=> कथकली नर्तक गुरूगोपीनाथ यांचा जन्म.

[१९१४]=> वासुदेव गणेश टेंबे उर्फ टेंबे स्वामी किंवा वासुदेवानंद सरस्वती यांचा गरुडेश्वर, बडोदा, गुजरात येथे निधन. (तारखेप्रमाणे)


[१९२७]=> तामिळ लेखक कवियरासू कन्नडासन यांचा जन्म.

[१९२८]=> महाराष्ट्रातील लोकनेत्या मृणाल केशव गोरे यांचा जन्म.

[१९३७]=> ज्येष्ठ लेखिका अनिता मुजूमदार देसाई यांचा मसुरी येथे जन्म.

[१९३९]=> सयामचे थायलंड असे नामकरण करण्यात आले.

[१९४०]=> दुसरे महायुद्ध – फ्रान्स व इटलीमधे शस्त्रसंधी झाली.

[१९८२]=> कर्नाटकातील सर्व शाळांत कन्नड शिकविण्याची सक्ती.

[१९९६]=> मायकेल जॉन्सनचा १९.६६ सेकंदांत २०० मीटर धावून विश्वविक्रम.

[१९९७]=> ओडिसी नर्तिका संयुक्ता पाणिग्रही यांचे निधन.

[१९९८]=> अभिनेते चंद्रकांत मांडरे यांना अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा चित्रभूषण पुरस्कार जाहीर.

[२००१]=> आय. एन. एस. विराट ही भारतीय नौदलाची एकमेव विमानवाहू नौका आधुनिकी करणानंतर पुन्हा नौदलात दाखल झाली.

[२०१०]=> जुलिया गिलार्ड यांनी ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला.

[२०१३]=> इटलीचे ४०वे पंतप्रधान एमिलियो कोलंबो यांचे निधन.


            तुम्हाला २४ जून दिनविशेष | 24 June Dinvishesh | 24 June day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad