३ जून दिनविशेष | 3 June Dinvishesh | 3 June day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, June 2, 2024

३ जून दिनविशेष | 3 June Dinvishesh | 3 June day special in Marathi

३ जून दिनविशेष

3 June Dinvishesh

3 June day special in Marathi

३ जून दिनविशेष | 3 June Dinvishesh | 3 June day special in Marathi

            ३ जून दिनविशेष ( 3 June Dinvishesh | 3 June day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण ३ जून दिनविशेष ( 3 June Dinvishesh | 3 June day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

३ जून दिनविशेष

3 June Dinvishesh

3 June day special in Marathi


@ जागतिक सायकल दिन [World Bicycle Day]

[१६५७]=> मानवी शरीरातील रक्ताभिसरणाची क्रिया स्पष्ट करणारे इंग्लिश शरीरशास्त्रज्ञ विल्यम हार्वी यांचे निधन.

[१८१८]=> मराठेशाहीचा अस्त – शेवटचे पेशवे बाजीराव हे मध्यप्रदेशातील असीरगढजवळ ढोलकोट येथे जनरल माल्कम याच्या स्वाधीन झाले आणि त्यांनी मराठी राज्य इंग्रजांच्या कडे सोपवले . नंतर इंग्रजानी शनिवार वाड्या वर कब्जा केला आणि तिथे युनियन जॅक फडकला.

[१८६५]=> इंग्लंडचा राजा जॉर्ज (पाचवा) यांचा जन्म.

[१८८९]=> ट्रान्ससिटोनेंटल कॅनेडियन पॅसिफिक रेल्वेचे काम पूर्ण झाले.

[१८९०]=> चित्रपट निर्माता, दिग्दर्शक आणि चित्रकार बाबूराव पेंटर यांचा जन्म.

[१८९०]=> खान अब्दुल गफार खान तथा सरहद गांधी यांचा जन्म.

[१८९०]=> भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक बाबूराव पेंटर यांचा जन्म.

[१८९२]=> लेखिका तसेच बालसाहित्यिका आनंदीबाई शिर्के यांचा जन्म.

[१८९५]=> चीन, इजिप्त आणि फ्रान्समधील राजदूत के.एम. पण्णीक्कर यांचा जन्म.

[१९१६]=> महर्षी कर्वें यांनी भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना केली.

[१९२४]=> तामिळनाडूचे १५ वे मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांचा जन्म.

[१९३०]=> भारतीय पत्रकार आणि राजकारणी जॉर्ज फर्नांडिस यांचा जन्म.

[१९३२]=> उद्योगपती सर दोराबजी टाटा यांचे निधन.

[१९४०]=> डंकर्कची लढाई – जर्मनीचा विजय. दोस्त सैन्याने पळ काढला.

[१९४०]=> दुसरे महायुद्ध – जर्मन वायूदलाने पॅरिसवर बॉम्बवर्षाव केला.

[१९४७]=> हिन्दूस्तानच्या फाळणीची मांउंटबॅटन योजना जाहीर झाली.


[१९५०]=> मॉरिस हेर्झॉग आणि लुईस लॅचेनल यांनी अन्‍नपूर्णा या ८,०९१ मीटर उंच असलेल्या 
शिखरावर प्रथमच यशस्वी चढाई केली.

[१९५६]=> स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, राष्ट्रमत आणि स्वतंत्र हिन्दुस्तानचे संपादक, लेखक व नाटककार वामन गोपाळ तथा वीर वामनराव जोशी यांचे निधन.

[१९६६]=> पाकिस्तानी क्रिकेट कप्तान जलदगती गोलंदाज वासिम अक्रम यांचा जन्म.

[१९७७]=> नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश जीवरसायन शास्त्रज्ञ आर्चिबाल्ड विवियन हिल यांचे निधन.

[१९७९]=> मेक्सिकोच्याअखातात इहटॉक या खनिज तेलाच्या विहिरीला आग लागली. ६,००,००० टन तेल समुद्रात पसरले.

[१९८४]=> ऑपरेशन ब्ल्यू स्टार – भारतीय सैन्याने आत घुसलेल्या अतिरक्यांना हुसकावण्यासाठी अमृतसरच्या सुवर्णमंदिरावर हल्ला चढवला.

[१९८९]=> इराणी धर्मगुरू आणि राजकारणी रुहोलह खोमेनी यांचे निधन.

[१९८९]=> थ्येनआनमन चौकात सात आठवडे तळ ठोकलेल्या प्रदर्शकांना घालवण्यासाठी चीनने लष्कर पाठवले.

[१९९०]=> इंटेल कॉर्पोरेशन चे सहसंस्थापक रॉबर्ट नोयिस यांचे निधन.

[१९९७]=> चित्रपट व नाट्य अभिनेत्री मीनाक्षी शिरोडकर यांचे निधन.

[१९९८]=> जमिनीवरील हवेतील लक्ष्यावर मारा करणाऱ‍या त्रिशूल क्षेपणास्त्राची द्रोणाचार्य या युद्धनौकेवरून कोचीजवळ यशस्वी चाचणी झाली.

[२०१०]=> मराठी चित्रपटनिर्माते आणि दिग्दर्शक अजय सरपोतदार यांचे निधन.

[२०१३]=> जर्मन-भारतीय तंत्रज्ञ आणि पत्रकार अतुल चिटणीस यांचे निधन.

[२०१४]=> भारतीय राजकारणी, महाराष्ट्राचे तिसरे उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांचे निधन.

[२०१६]=> अमेरिकन बॉक्सर मुहम्मद अली यांचे निधन.


            तुम्हाला ३ जून दिनविशेष | 3 June Dinvishesh | 3 June day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad