३० जून दिनविशेष | 30 June Dinvishesh | 30 June day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, June 29, 2024

३० जून दिनविशेष | 30 June Dinvishesh | 30 June day special in Marathi

३० जून दिनविशेष

30 June Dinvishesh

30 June day special in Marathi

३० जून दिनविशेष | 30 June Dinvishesh | 30 June day special in Marathi

            ३० जून दिनविशेष ( 30 June Dinvishesh | 30 June day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण ३० जून दिनविशेष ( 30 June Dinvishesh | 30 June day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

३० जून दिनविशेष

30 June Dinvishesh

30 June day special in Marathi


@ जागतिक लघुग्रह दिवस [World Asteroid Day ]

[१४७०]=> फ्रान्सचा राजा चार्ल्स-आठवा यांचा जन्म.

[१८५९]=> चार्ल्स ब्लांडिन यांनी नायगारा धबधबा एकादोरीबारून कसरत करीत पार केला.

[१९१७]=> भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक, ब्रिटिश संसदेचे सदस्यत्व मिळवणारे पहिले भारतीय दादाभाई नौरोजी यांचे निधन.

[१९१९]=> नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ जॉनविल्यम स्टूट रॅले यांचे निधन.

[१९१९]=> हॉट एअर बलूनचे निर्माते एड यॉस्ट यांचा जन्म:

[१९२८]=> कल्याणजी-आनंदजी या संगीतकार द्वयीतील ज्येष्ठ बंधू कल्याणजी वीरजी शहा यांचा जन्म.

[१९३४]=> भारतीय रसायनशास्त्रज्ञ चिंतामणी नागेश रामचंद्र राव यांचा जन्म.

[१९३७]=> जगातील पहिला तत्काळ दूरध्वनी क्रमांक ९९९ लंडनमध्ये सुरु करण्यात आला.

[१९४३]=> दिग्दर्शक आणि पटकथा लेखक सईद मिर्झा यांचा जन्म.

[१९४४]=> मुंबईच्या सेंट्रल सिनेमात प्रभातचा रामशास्त्री हा चित्रपट रिलीज झाला.

[१९५४]=> डॉमिनिकाचे पंतप्रधान पिएर चार्ल्स यांचा जन्म.

[१९५९]=> भारतीय-इंग्लिश उद्योगपती आणि राजकारणी संदीप वर्मा यांचा जन्म.

[१९६०]=> काँगोला बेल्जियमपासुन स्वातंत्र्य मिळाले.

[१९६५]=> भारत पाकिस्तानमध्ये कच्छचा करार झाला.

[१९६६]=> अमेरिकन मुष्टीयोद्धा माइक टायसन यांचा जन्म.

[१९६६]=> अमेरिकेची सर्वात मोठी स्त्रीवादी संस्था नॅशनल ऑरगनायझेशन फॉर वुमन ची स्थापना झाली.


[१९६६]=> कोकासुब्बा राव भारताचे वे सरन्यायाधीश झाले.

[१९६९]=> श्रीलंकेचा क्रिकेटपटू सनत जयसूर्या यांचा जन्म.

[१९७१]=> सोयुझ-११या रशियन अंतराळयानात बिघाड होऊन तीन अवकाशवीर ठार झाले.

[१९७३]=> भारतीय क्रिकेट खेळाडू दोड्डा गणेश यांचा जन्म.

[१९७८]=> अमेरिकेच्या संविधानात २६ वा बदल संमत झाला त्यामुळे मतदानाचे वय १८ वर्षे झाले.

[१९८६]=> केंद्रसरकार मिझो नॅशनल फ्रंट यांच्यात करार होऊन मिझोरामला राज्याचा दर्जा देण्याचे ठरले.

[१९९२]=> साहित्यिक, वक्ते समीक्षक डॉ. वसंत कृष्ण वऱ्हाडपांडे यांचे निधन.

[१९९४]=> नाटककार, अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक बाळ कोल्हटकर यांचे निधन.

[१९९७]=> ब्रिटनने चीन कडून ९९ वर्षांच्या भाडेपट्ट्याने घेतलेले हाँगकाँग मुदत संपल्याने ब्रिटनने हे बेट समारंभपूर्वक चीनला परत दिले.

[१९९७]=> शास्त्रोक्त व नाट्यसंगीत गायक राजाभाऊ साठे यांचे निधन.

[१९९९]=> मराठी काव्यसृष्टीतील कवी कृष्णाबळवंत तथा कृ. ब. निकुंब यांचे निधन.

[२००२]=> ब्राझीलने फुटबॉल विश्वकप जिंकला.

[२००७]=> दिल्लीचे चौथे मुख्यमंत्री साहिबसिंह वर्मा यांचे निधन.


            तुम्हाला ३० जून दिनविशेष | 30 June Dinvishesh | 30 June day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad