५ जून दिनविशेष | 5 June Dinvishesh | 5 June day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, June 4, 2024

५ जून दिनविशेष | 5 June Dinvishesh | 5 June day special in Marathi

५ जून दिनविशेष

5 June Dinvishesh

5 June day special in Marathi

५ जून दिनविशेष | 5 June Dinvishesh | 5 June day special in Marathi

            ५ जून दिनविशेष ( 5 June Dinvishesh | 5 June day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण ५ जून दिनविशेष ( 5 June Dinvishesh | 5 June day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

५ जून दिनविशेष

5 June Dinvishesh

5 June day special in Marathi


@ जागतिक पर्यावरण दिन [World Environment Day]

@ बेकायदेशीर, अहवाल न दिलेले आणि अनियंत्रित मासेमारी विरुद्धच्या लढ्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस [International Day for the Fight Against Illegal, Unreported and Unregulated Fishing]

[१७२३]=> स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि तत्त्ववेत्ता अ‍ॅडॅम स्मिथ यांचा जन्म.

[१८७९]=> भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक नारायण मल्हार जोशी यांचा जन्म.

[१८८१]=> हार्मोनियम वादक, अभिनेते व संगीतकार, नाट्यसंगीताचे पहिले शिल्पकार, पहिल्या बोलपटाचे संगीत दिग्दर्शक, संगीत क्षेत्रातील पहिले सौंदर्य मीमांसक, संगीतिकांचे प्रवर्तक गोविंदराव टेंबे यांचा जन्म.

[१८८३]=> ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ जॉन मायनार्ड केन्स यांचा जन्म.

[१९०८]=> कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया चे सहसंस्थापक रवि नारायण रेड्डी यांचा जन्म.

[१९१५]=> डेन्मार्कमधे महिलांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला.

[१९४६]=> विल्यम्स एफ१ टीम चे सहसंस्थापक पॅट्रिक हेड यांचा जन्म.

[१९५०]=> कुस्तीगीर व प्रशिक्षक हरिश्चंद्र बिराजदार यांचे निधन.

[१९५९]=> सिंगापूरमधील पहिल्या सरकारची स्थापना झाली.

[१९६१]=> भारतीय टेनिस खेळाडू आणि प्रशिक्षक रमेश कृष्णन यांचा जन्म.


[१९६८]=> अमेरिकेच्या अध्यक्षपदचे उमेदवार रॉबर्ट एफ. केनेडी यांचा गोळी मारण्यात आली, 
पुढील दिवशी केनेडी मरण पावले.

[१९७२]=> भारतीय पुजारी आणि राजकारणी योगी आदित्यनाथ यांचा जन्म.

[१९७३]=> राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर तथा श्री 
गुरूजी यांचे निधन.

[१९७४]=> जागतिक पर्यावरण दिन

[१९७५]=> सुएझ कालवा पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. १९६७ पासून ८ वर्षे हा कालवा वापरण्यास मनाई होती.

[१९७७]=> सेशेल्समधे उठाव झाला.

[१९८०]=> भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक व ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे (AITUC) एक संस्थापक नारायण मल्हार जोशी यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीटाचे अनावरण करण्यात आले.

[१९९४]=> वेस्ट इंडिजच्या ब्रायन लाराने इंग्लिश कौटी क्रिकेट स्पर्धेत वॉरविकशायरकडून खेळताना नाबाद ५०१ धावा करून प्रथम दर्जाच्या क्रिकेटमध्ये नवीन जागतिक विक्रम प्रस्थापित केला.

[१९९६]=> भारतीय कवि आणि विद्वान आचार्य कुबेर नाथ राय यांचे निधन.

[१९९९]=> राजमाता श्रीमंत छत्रपती सुमित्राराजे शाहूमहाराज भोसले यांचे निधन.

[२००३]=> पाकिस्तान आणि भारतामध्ये तीव्र उष्णतेची लाट आल्यामुळे तापमान ५० डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त झाले.

[२००४]=> अभिनेते आणि अमेरिकेचे ४० वे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांचे निधन.

हे पण पहा :- समानार्थी शब्द

            तुम्हाला ५ जून दिनविशेष | 5 June Dinvishesh | 5 June day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad