८ जून दिनविशेष | 8 June Dinvishesh | 8 June day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, June 7, 2024

८ जून दिनविशेष | 8 June Dinvishesh | 8 June day special in Marathi

८ जून दिनविशेष

8 June Dinvishesh

8 June day special in Marathi

८ जून दिनविशेष | 8 June Dinvishesh | 8 June day special in Marathi

            ८ जून दिनविशेष ( 8 June Dinvishesh | 8 June day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण ८ जून दिनविशेष ( 8 June Dinvishesh | 8 June day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

८ जून दिनविशेष

8 June Dinvishesh

8 June day special in Marathi


@ जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस [World Brain Tumour Day]

@ जागतिक महासागर दिवस [World Oceans Day]

@ राष्ट्रीय सर्वोत्तम मित्र दिन [National Best Friend Day]

[ई.पु ०६३२]=> इस्लाम धर्माचे संस्थापक मोहंमद पैगंबर यांचे निधन.

[१६२४]=> पेरू येथे भूकंप.

[१६७०]=> पुरंदरच्या तहात गमावलेला रोहिडा किल्ला शिवाजी महाराजांनी परत जिंकून घेतला.

[१७०७]=> औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुअज्जम आणि आझमशाह या त्याच्या दोन मुलांमधे दिल्लीच्या तख्तासाठी युद्ध झाले. यात मुअज्जमने आझमशाहला ठार करुन दिल्लीची गादी बळकावली.

[१७१३]=> मुघलांनी १६८९ मधे जिंकलेला रायगड किल्ला पंतप्रतिनिधी यांनी सिद्दीकडुन राजकारणाने जिंकुन घेतला.

[१७८३]=> आईसलँड मधील लाकी ज्वालामुखीचा उद्रेक, हजार ठार.

[१७९५]=> फ्रान्सचा राजा लुई १७ वा यांचे निधन.

[१८०९]=> अमेरिकन विचारवंत राजकारणी थॉमस पेन यांचे निधन.

[१८४५]=> अमेरिकेचे ७वे राष्ट्राध्यक्ष अॅन्ड्रयू जॅक्सन यांचे निधन.

[१९०६]=> भारतीय क्रिकेट खेळाडू सैयद नझीर अली यांचा जन्म.

[१९१०]=> लेखक, तत्त्वचिंतक व समीक्षक दिनकर केशव तथा दि. के. बेडेकर यांचा जन्म.

[१९१२]=> कार्ल लेम्ले यांनी यूनिव्हर्सल पिक्चर्स या कंपनीची स्थापना केली.

[१९१५]=> भारतीय पत्रकार, लेखक, आणि कवी काययार सिंहनाथ राय यांचा जन्म.

[१९१५]=> लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात असताना लिहुन पूर्ण केलेल्या गीतारहस्य या ग्रंथाचे गायकवाडवाड्यात प्रकाशन झाले.


[१९१७]=> भावगीत गायक गजाननराव वाटवे यांचा जन्म.

[१९१८]=> नोव्हा अ‍ॅक्‍विला या सर्वाधिक तेजस्वी तेजोमेघाचा शोध.

[१९२१]=> इंडोनेशियाचे दुसरे राष्ट्राध्यक्ष सुहार्तो यांचा जन्म.

[१९२५]=> अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांची पत्नी बार्बरा बुश यांचा जन्म.

[१९३२]=> इंग्लिश क्रिकेटपटू रे इलिंगवर्थ यांचा जन्म.

[१९३६]=> नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन भैतिकशास्त्रज्ञ केनिथ गेडीज विल्सन यांचा जन्म.

[१९४१]=> दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी सीरीया व लेबानॉन पादाक्रांत केले.

[१९४८]=> एअर इंडिया ची मुंबई – लंडन विमानसेवा सुरू झाली.

[१९४८]=> जॉर्ज ऑर्वेलची १९८४ या नावाची कांदबरी प्रसिद्ध झाली.

[१९५३]=> कृष्णवर्णीयांना हॉटेलमधे सेवा नाकारण्यास अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली.

[१९५५]=> वर्ल्ड वाईड वेब चे जनक टिम बर्नर्स-ली यांचा जन्म.

[१९५७]=> चित्रपट अभिनेत्री डिंपल कपाडिया यांचा जन्म.

[१९६९]=> लष्करप्रमुख म्हणून सॅम माणेकशा यांची नियुक्ती.

[१९७५]=> भारतीय अभिनेत्री आणि निर्माता शिल्पा शेट्टी यांचा जन्म.

[१९९२]=> पहिल्यांदा जागतिक महासागर दिन साजरा केला गेला.

[१९९५]=> रंगभूमी कलावंत एकपात्री प्रयोगकार राम नगरकर यांचे निधन.

[१९९८]=> नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष सानी अबाचा यांचे निधन.

[२००४]=> आधुनिक काळातील शुक्राचे (सूर्यावरुन) पहिले अधिक्रमण झाले. याआधीचे अधिक्रमण १८८२ या वर्षी झाले होते.


            तुम्हाला ८ जून दिनविशेष | 8 June Dinvishesh | 8 June day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad