९ जून दिनविशेष | 9 June Dinvishesh | 9 June day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, June 8, 2024

९ जून दिनविशेष | 9 June Dinvishesh | 9 June day special in Marathi

९ जून दिनविशेष

9 June Dinvishesh

9 June day special in Marathi

९ जून दिनविशेष | 9 June Dinvishesh | 9 June day special in Marathi

            ९ जून दिनविशेष ( 9 June Dinvishesh | 9 June day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण ९ जून दिनविशेष ( 9 June Dinvishesh | 9 June day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

९ जून दिनविशेष

9 June Dinvishesh

9 June day special in Marathi


[ई .पु ६८]=> रोमन सम्राट नीरो याने आत्महत्या केली.

[१६६५]=> मिर्झाराजे जयसिंग आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात पुरंदरचा तह झाला.

[१६७२]=> रशियाचा झार पीटर द ग्रेट (पहिला) यांचा जन्म.

[१६९६]=> छत्रपती राजाराम आणि महाराणी ताराबाई यांना तामिळनाडुतील जिंजी किल्ल्यावर पुत्ररत्‍न झाले. मुलाचे नाव शिवाजी असे ठेवले.

[१७००]=> दख्खन स्वारीवर असलेल्या औरंगजेबाने सज्जनगड जिंकला.

[१७१६]=> शिख सेनापती बंदा सिंग बहादूर यांचे निधन.

[१८३४]=> अर्वाचीन बंगाली व मराठी गद्यलेखनाचा पाया घालणारे धर्मप्रसारक पं. विल्यम केरी यांचे निधन.

[१८४५]=> भारताचे ३६वे गव्हर्नर-जनरल गिल्बर्ट इलियट-मरे-क्यंनमॉंड यांचा जन्म.

[१८६६]=> अलाहाबाद उच्च न्यायालयाची स्थापना.

[१८७०]=> इंग्लिश कादंबरीकार व लेखक चार्ल्स डिकन्स यांचे निधन.

[१८९७]=> क्रांतिकारक रामप्रसाद बिस्मिल यांचा जन्म.

[१९००]=> आदिवासी स्वातंत्र्यसैनिक बिरसा मुंडा यांचा ब्रिटिशांच्या कैदेत संशयास्पदरित्या मृत्यू.

[१९००]=> भारतीय राष्ट्रवादी बिरसा मुंडा यांचे ब्रिटिशांच्या तुरुंगात निधन झाले.

[१९०६]=> स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे लंडनला प्रयाण.

[१९०७]=> नॉर्धनम्प्टनशायर क्रिकेट संघ १२ धावांत सर्वबाद.

[१९१२]=> संगीतकार वसंत देसाई यांचा जन्म.

[१९२३]=> बल्गेरियात लष्करी उठाव झाला.

[१९३१]=> भारतीय लेखक व राजकारणी नंदिनी सत्पथी यांचा जन्म.

[१९३१]=> रॉबर्ट गोडार्ड या शास्त्रज्ञाला अंतराळ प्रक्षेपणासाठी वापरल्या जाणार्‍या रॉकेटचे पेटंट मिळाले.

[१९३४]=> डोनाल्ड डक पहिल्यांदा द व्हाइज लिटिल मर्न मध्ये दिसले.

[१९३५]=> एडविन आर्मस्ट्राँगने पहिल्यांदा एफ.एम. लहरींचे प्रसारण केले.

[१९४६]=> थायलँडचा राजा आनंद महिडोल तथा राम (सातवा) यांचे निधन.


[१९४६]=> राजे भूमिबोल अतुल्यतेज थायलंडच्या राजसिंहासनावर विराजमान झाले. कोणत्याही देशावर सर्वात दीर्घकाळ राज्य करणारे हे राजे आहेत.

[१९४९]=> सामाजिक कार्यकर्त्या व भारतातील पहिल्या महिला आय. पी. एस. अधिकारी किरण बेदी यांचा जन्म.

[१९६४]=> भारताचे दुसरे पंतप्रधान म्हणून लाल बहादुर शास्त्री यांनी सूत्रे हाती घेतली.

[१९७०]=> अ‍ॅनामे हेस, एलिझाबेथ पी. हॉइसिंग्टन या अमेरिकन सैन्यातील पहिल्या स्त्री जनरल झाल्या.

[१९७४]=> सोविएत रशिया आणि पोर्तुगाल यांच्यात राजनैतिक संबंध पुन्हा प्रस्थापित झाले.

[१९७५]=> ब्रिटनमधील लोकसभेच्या (House of Commons) कामकाजाचे दूरचित्रवाणीवरुन थेट प्रसारण सुरू झाले.

[१९७७]=> अभिनेत्री अमिशा पटेल यांचा जन्म.

[१९८१]=> इंग्लिश-भारतीय सतार वादक आणि संगीतकार अनुष्का शंकर यांचा जन्म.

[१९८५]=> अभिनेत्री सोनम कपूर यांचा जन्म.

[१९८८]=> अभिनेते गणेश भास्कर अभ्यंकर ऊर्फ विवेक यांचे निधन.

[१९९३]=> बंगाली व हिन्दी चित्रपट दिग्दर्शक व पटकथालेखक सत्येन बोस यांचे निधन.

[१९९५]=> स्वातंत्र्यसैनिक, संसदपटू, शेतकरी चळवळीतील नेते प्रा. गोगिनेनी रंगा नायकुलू ऊर्फ एन. जी. रंगा यांचे निधन.

[१९९७]=> इंग्लिश खाडी पोहून जाणारे पहिले भारतीय मिहिर सेन यांचे निधन.

[१९९७]=> सुखोई-३० के ही रशियन बनावटीची विमाने भारतीय हवाई दलात दाखल.

[२०००]=> कॉँग्रेस नेता केंद्रीय मंत्री राजेश पायलट यांचे निधन.

[२००१]=> भारताच्या लिअँडर पेस व महेश भूपतीने फ्रेन्च टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरी गटाचे विजेतेपद मिळवले.

[२००४]=> कॅसिनी-हायगेन्सअंतराळयान शनिचा उपग्रह फीबी जवळून गेले.

[२००६]=> १८ वी फुटबॉल विश्वकरंडक स्पर्धा जर्मनीच्या म्युनिक शहरात सुरू झाली.

[२००७]=> बांगलादेशातील चितगावमध्ये भूस्खलनामुळे १३० लोक ठार झाले.

[२०११]=> चित्रकार व दिग्दर्शक मकबूल फिदा हुसेन यांचे निधन.


            तुम्हाला ९ जून दिनविशेष | 9 June Dinvishesh | 9 June day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad