प्रयोग व त्याचे प्रकार | Prayog V Tyache Prakar - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, June 19, 2024

प्रयोग व त्याचे प्रकार | Prayog V Tyache Prakar

प्रयोग व त्याचे प्रकार

Prayog V Tyache Prakar in Marathi

प्रयोग व त्याचे प्रकार | Prayog V Tyache Prakar

प्रयोग ( Prayog ) हा शब्द संस्कृत मधील प्रयुज या शब्दापासून मराठीत आलेला आहे. प्र+युज (योग) या शब्दाचा अर्थ रचना, जुळणी किंवा ठेवणं असा आहे. प्रयोग या घटकाचा विचार करत असताना आपल्याला मराठी व्याकरणाच्या काही मूलभूत गोष्टी माहित असायला हव्यात त्यामध्ये वाक्याचा कर्ता, कर्म, क्रियापद व त्याचे लिंग, वचन व पुरुष.


कर्ता, कर्म व क्रियापद कसे ओळखावे?

कर्ता :- क्रियापदाला कोण ने प्रश्न विचारल्यास कर्ता मिळतो.
कर्म :- क्रियापदाला काय ने प्रश्न विचारल्यास कर्म मिळते.
क्रियापद :- क्रियापद बहुदा वाक्याच्या शेवटी असते तो एक क्रिया दर्शक शब्द असतो.

उदाहरणार्थ :-
वाक्य :- सुयश कविता गातो.
प्रश्न :- कोण कविता गातो?
उत्तर :- सुयश ( कर्ता )
प्रश्न :- काय गातो?
उत्तर :- कविता
शेवटचा क्रिया दर्शक शब्द गातो हे क्रियापद आहे.

कर्ता हा वाक्यातील प्रत्यक्ष क्रिया निर्माता किंवा क्रिया करणारा म्हणून ओळखला जातो. कर्ता व कर्म यांच्यात लिंग, वचन व पुरुष नुसार बदल केल्यास वाक्यातील क्रियापदात जो बदल होतो त्यालाच प्रयोग ( Prayog ) असे म्हणतात.

उदाहरणार्थ :-
    १) सुयश पत्र वाचतो.
    २) सुनीता पत्र वाचते.
    ३) मुले पत्र वाचतात.
    वरील वाक्यात कर्त्यात बदल केल्यामुळे क्रियापदात बदल झाला.

    १) सुयशने गाय बांधली.
    २) सुयशने बैल बांधला.
    ३) सुयशने वासरू बांधले.
    वरील वाक्यात कर्मात बदल केल्याने क्रियापदात बदल झाला.

तसेच कर्ता किंवा कर्मा ऐवजी सर्वांना वापरले तरी देखील क्रियापद बदलते.

उदाहरणार्थ :-
१) सुयश = तो ( पुल्लिंग )
२) सुनिता = ती ( स्त्रीलिंग)
३) वासरू = ते ( नपुसकलिंग )
४) गाय = ती ( स्त्रीलिंग)
५) बैल = तो ( पुल्लिंग )
    यावरून आपल्याला असे दिसून येते की कर्ता, कर्म व क्रियापद यांचा परस्परांशी निकटचा संबंध असतो यालाच प्रयोग ( Prayog ) असे म्हणतात.

हे पण पहा :- समानार्थी शब्द

प्रयोगाची व्याख्या :-

वाक्यामध्ये असलेल्या क्रियापदाचा वाक्यातील कर्ता व कर्म यांच्याशी जो संबंध असतो त्यालाच प्रयोग ( Prayog ) असे म्हणतात.

प्रयोगाचे प्रकार

प्रयोगाचे मुख्य तीन प्रकार आहेत.

अ क्रप्रयोगाचे मुख्य प्रकार
कर्तरी प्रयोग (Kartari Prayog)
कर्मणी प्रयोग (Karmani Prayog)
भावे प्रयोग (Bhave Prayog)


कर्तरी प्रयोगाचे उपप्रकार

अ क्रकर्तरीचे उपप्रकार
सकर्मक कर्तरी प्रयोग
अकर्मक कर्तरी प्रयोग


कर्मणी प्रयोगाचे प्रकार

अ क्रकर्मणीचे उपप्रकार
प्रधानकर्तृक कर्मणी प्रयोग
शक्य कर्मणी प्रयोग
प्राचीन किंवा पुराणकर्मणी प्रयोग
समापन कर्मणी प्रयोग
नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी प्रयोग


भावे प्रयोगाचे प्रकार

अ क्रभावेचे उपप्रकार
सकर्मक भावे प्रयोग
अकर्मक भावे प्रयोग
भाव कर्तरी प्रयोग


या प्रकारांव्यतिरिक्त इतरही काही प्रयोग आहेत.

मिश्र किंवा संकर प्रयोग

अ क्रमिश्र / संकर प्रयोग
कर्तृ-कर्म संकर प्रयोग
कर्म-भाव संकर प्रयोग
कर्तृ-भावकर्तरी प्रयोग
कर्तृ-भाव संकर प्रयोग

सकर्मक व अकर्मक म्हणजे काय?

सकर्मक म्हणजे ज्या वाक्यात कर्म आहे असे वाक्य.
➤ अकर्मक म्हणजे ज्या वाक्यात कर्म नाही असे वाक्य.
वाक्यातील कर्म, कर्ता व क्रियापद ओळखण्यासाठी तर वरती दिलेच आहे.

उदाहरणार्थ :-
१) सुयश पुस्तक वाचतो.
सुयशने पुस्तकावर वाचण्याची क्रिया केली म्हणून कर्ता = सुयश, पुस्तक = कर्म, क्रियापद = वाचतो.
येथे वाक्यात पुस्तक हे कर्म आहे म्हणून हे वाक्य सकर्मक आहे.

२) सुयश नाशिकला गेला.
क्रिया करणाऱ्या व ज्यावर क्रिया झाली ती व्यक्ती एकच आहे ती म्हणजे सुयश म्हणून येथे फक्त कर्ता = सुयश व क्रियापद = गेला आहे
येथे वाक्यात कर्म नाही म्हणून हे वाक्य अकर्मक आहे.

➤ सकर्मक वाक्य ओळखण्यासाठी कर्त्याला 'ने' हे प्रत्यय जोडल्यास वाक्य जर भूतकाळी होत असेल तर ते वाक्य सकर्मक असते.
उदाहरणार्थ :-
सुयश बैल पकडतो. (वर्तमान काळ)
सुयशने बैलाला पकडले (भूतकाळ)

➤ तसेच वाक्याचा काळ ओळखण्यासाठी क्रियापदाच्या प्रत्येक यांकडे लक्ष द्यावे.
वर्तमान काळ :- ता, ती, तो, ते (जाता, जाते, जातो) 
भूतकाळ :- ला, ली, लो, ले (पडला, पडली, पडलो, पडले)
भविष्यकाळ :- ईल (जाईल खाईल गाईल)


प्रयोगाचे प्रकार

१] कर्तरी प्रयोग ( Kartari Prayog )

क्रियापदाचे रूप कर्त्याच्या लिंग, वचन नुसार बदलत असेल तर त्याला कर्तरी प्रयोग ( Kartari Prayog ) असे म्हणतात. 

कर्तरी प्रयोग उदाहरणे:-

    १) सचिन पुस्तक वाचतो.
    २) तारा पुस्तक वाचते.
    ३) मुले पुस्तक वाचतात.
    ४) सुयश खेळतो.
    ५) राधा खेळते.
    ६) विद्यार्थी खेळतात.

कर्तरी प्रयोगाचे प्रकार

अ क्रकर्तरीचे प्रकार
सकर्मक कर्तरी प्रयोग
अकर्मक कर्तरी प्रयोग

अ] सकर्मक कर्तरी प्रयोग (Sakarmak Kartari Prayog) :-

कर्तरी प्रयोगामध्ये क्रियापद जेव्हा सकर्मक (कर्मासहित) असते तेव्हा त्याला सकर्मक कर्तरी प्रयोग (Sakarmak Kartari Prayog) असे म्हणतात.

सकर्मक कर्तरी प्रयोग उदाहरणे:-

१) गौतम क्रिकेट खेळतो.
२) राणी क्रिकेट खेळते.
३) विद्यार्थी क्रिकेट खेळतात.
४) आम्ही क्रिकेट खेळतो.
५) तुम्ही क्रिकेट खेळतात.
६) तो क्रिकेट खेळतो.

सकर्मक कर्तरी प्रयोग ओळखण्याचे नियम :-

१) कर्त्याला प्रत्यय नसतो.
२) कर्ता प्रथमेत असतो.
३) कर्माला प्रत्यय असतो किंवा नसतो.
४) वाक्य वर्तमान काळात असते.
५) कर्त्याचे लिंग, वचन बदलल्यास क्रियापदात बदल होतो.


ब] अकर्मक कर्तरी प्रयोग (Akarmak Kartari Prayog) :-

कर्तरी प्रयोगात क्रियापद जेव्हा अकर्मक ( कर्मरहित / कर्म नसते) असते तेव्हा त्याला अकर्मक कर्तरी प्रयोग (Akarmak Kartari Prayog) असे म्हणतात.

अकर्मक कर्तरी प्रयोग उदाहरणे:-

१) पक्षी उडाला.
२) बस गेली.
३) ती लिहिते.
४) सुयश झोपला.
५) मला चिंच आवडते.
६) पक्षी घरट्यात परतले.

अकर्मक कर्तरी प्रयोग ओळखण्याचे नियम :-

१) कर्त्याला प्रत्यय नसतो.
२) वाक्य तीनही काळात असते.
३) कर्म नसताना देखील वाक्य पूर्ण होते.


२] कर्मणी प्रयोग ( Karmani Prayog)

क्रियापदाचे रूप हे कर्माच्या लिंग, वचनानुसार बदलत असेल तर त्याला कर्मणी प्रयोग (Karmani Prayog) असे म्हणतात. 

कर्मणी प्रयोग उदाहरणे:-

१) सुयशने बैल बांधला.
२) सुयशने गाय बांधली.
३) सुयश ने वासरू बांधले.
४) सिताने पत्र लिहिले.
५) सीताने पत्रे लिहिली.
६) सीताने ग्रंथ लिहिला.

कर्मणी प्रयोगाचे नियम :-

१) क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंग, वचनानुसार बदलते.
२) कर्त्याला विभक्ती किंवा शब्दयोगी अव्यय जोडलेला असतो.
३) कर्माला प्रत्यय नसतो वाक्य भूतकाळी रूपात असते.

कर्मणी प्रयोगाचे प्रकार

अ क्रकर्मणीचे प्रकार
प्रधानकर्तृक कर्मणी प्रयोग
शक्य कर्मणी प्रयोग
प्राचीन किंवा पुराणकर्मणी प्रयोग
समापन कर्मणी प्रयोग
नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी प्रयोग

अ] प्रधान कर्तृत्व कर्मणी प्रयोग ( Pradhan Kartrutv Karmani Prayog)  :-

कर्मणी प्रयोगात क्रियापदे कर्माच्या लिंग, वचनानुसार बदलत असेल तरी बहुदा त्या वाक्यामध्ये कर्ताच महत्त्वाचा ( प्रधान ) असतो तेव्हा त्या प्रयोगाला प्रधान कर्तृत्व कर्मणी प्रयोग ( Pradhan Kartrutv Karmani Prayog) असे म्हणतात.

प्रधान कर्तृत्व कर्मणी प्रयोगाची उदाहरणे :-

१) त्याने काम केले.
२) त्याने पत्र लिहिले.
३) रावनाने सीतेला पळविले.
४) तिने गाणे गायले.
५) राजुने आंबे खाल्ले.

प्रधान कर्तृत्व कर्मणी प्रयोग ओळखण्याचे नियम :-

१) कर्माच्या लिंग वचनानुसार क्रियापद बदलते.
२) कर्ता प्रधान असतो.
३) दैनंदिन जीवनातील साधे वाक्य असतात.
४) कर्त्याला प्रत्यय असतो.
५) कर्माला प्रत्यय नसतो.


ब] शक्य कर्मणी प्रयोग ( Shakya Karmani Prayog ):-

क्रियापदाचा अर्थ हा क्रिया करण्याची शक्यता, सामर्थ्य, अपेक्षा, इच्छा असा असतो तेव्हा त्या प्रयोगाला शक्य कर्मणी प्रयोग (Shakya Karmani Prayog) असे म्हणतात.

शक्य प्रयोग उदाहरणे:-

१) बाबांच्याने शेती करवते.
२) मला एवढा गृहपाठ करता येईल.
३) मामाला एवढे आंबे खाता येतील.
४) आईच्याने एवढे घर साफ होईल.
५) रामच्याने कुस्ती जिंकता येईल.

शक्य कर्मणी प्रयोगाचे नियम :-

१) वाक्यात शक्यता, सामर्थ्य, आदेश, इच्छा क्रिया करण्याची शक्यता सुचवते.
२) कर्त्याला प्रत्यय असतो.
३) कर्माला प्रत्यय नसतो.

क] प्राचीन किंवा पुराण कर्मणी प्रयोग (Prachin Kiva Puran Karmani Prayog) :-

हा प्रयोग मूळ संस्कृत कर्मणी प्रयोगापासून आलेला असून त्याचा प्राचीन मराठी काव्यातील सकर्मक धातूला 'ज' प्रत्यय जोडून तयार केलेल्या वाक्यांचा यात समावेश होतो.

प्राचीन किंवा पुराण कर्मणी प्रयोग उदाहरणे:-

१) नळे इंद्रासी असे बोलीजेले.
२) द्विजी निषिधापासाव म्हणीजेलो.
३) जो जो कीजे परमार्थ लाहो.
४) त्वा काय कर्म करिजे लघु लेकराने.

प्राचीन किंवा पुराण कर्मणी प्रयोगाचे नियम :-

१) मूळ संस्कृत कर्मणी प्रयोग पासून आलेला असतो. 
२) प्राचीन मराठी काव्यातील समर्पक धातूला 'ज' प्रत्यय असतो.

ड] समापन कर्मणी प्रयोग (Samapan Karmani Prayog) :-

वाक्यातील क्रियापदाचा अर्थ हा कर्मणी प्रयोगातून क्रिया पूर्ण झाल्याचे सुचित करतो तेव्हा त्याला समापन कर्मणी प्रयोग (Samapan Karmani Prayog) असे म्हणतात.

समापन कर्मणी प्रयोग उदाहरणे:-

१) सुयशचा भात खाऊन झाला.
२) त्याचे गाणे गाऊन झाले.
३) राहुलची गोष्ट सांगून झाली.
४) विद्यार्थ्यांचा परिपाठ सांगून झाला.
५) संजयचे पुस्तक वाचून झाले.

समापन कर्मणी प्रयोगाचे नियम :-

१) कर्मणी प्रयोगातून क्रिया पूर्ण झाल्याचे समजते.
२) क्रियापद शक्यतो ऊन किंवा हून व नंतर झाला, झाली, झाले अशा प्रकारचे असते.
३) वाक्य बहुदा भूतकाळी असतात.

इ] नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी प्रयोग (Navin Karmani Kinva Karmkartari Prayog) :-

हा प्रयोग इंग्रजीतून मराठीत आल्यामुळे त्याचे स्वरूप नवीन असल्याने त्याला नवीन कर्मणी प्रयोग ( Navin Karmani Kinva Karmkartari Prayog) असे म्हणतात.

नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी प्रयोग उदाहरणे:-

१) हरीण शिकाऱ्याकडून मारले गेले.
२) रावण रामाकडून मारला गेला.
३) लाडू सुयश कडून खाल्ला गेला.
४) राजा शत्रूसैनिकाकडून पकडला गेला.
५) सामना खेळाडूंकडून जिंकला गेला.

नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी प्रयोगाचे नियम :-

१) वाक्याची रचना इंग्रजीतील प्यासिव्ह व्हाईस प्रमाणे असते.
२) कर्त्याला बहुदा 'कडून' प्रत्यय लागलेला असतो.
३) कर्म सुरुवातीस दिलेले असते.


३]भावे प्रयोग (Bhave Prayog)

वाक्यातील क्रियापदाचे रूप जेव्हा कर्ता व कर्म यांच्या लिंग, वचनानुसार बदलत नाही तर ते तृतीय पुरुषी, नपुसकलिंगी, एकवचनी असते तेव्हा त्या प्रयोगाला भावे प्रयोग (Bhave Prayog) असे म्हणतात.

भावे प्रयोग उदाहरणे:-

१) राजेशने बैलाला पकडले.
२) रियाने बैलाला पकडले.
३) मुलांनी बैलाला पकडले
४) त्यांनी बैलाला पकडले.
५) राजेशने गाईला पकडले.
६) रियाने गाईला पकडले.
७) मुलांनी गाईला पकडले.
८) त्यांनी गाईला पकडले.

भावे प्रयोगाचे नियम :-

१) कर्ता व कर्म यांच्या लिंग व वचन मध्ये बदल केले तरी क्रियापद बदलत नाही.
२) क्रियापदाचे रूप नेहमी तृतीय पुरुषी, नपुसकलिंगी, एकवचनी असते.

भावे प्रयोगाचे प्रकार

अ क्रभावेचे उपप्रकार
सकर्मक भावे प्रयोग
अकर्मक भावे प्रयोग
भाव कर्तरी प्रयोग

भावे प्रयोगाचे प्रकार :-

सकर्मक भावे प्रयोग (Sakarmak Bhave Prayog) :-

भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्म दिलेला असल्याने त्या प्रयोगाला सकर्मक ( कर्मासहित ) भावे प्रयोग असे म्हणतात.

सकर्मक भावे प्रयोग उदाहरणे:-

१) शिकाऱ्याने वाघास मारले.
२) बापाने मुलास मारले.
३) शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मारले.
४) आईने मुलीला मारले.
५) सैनिकांनी दहशतवाद्यास मारले.

सकर्मक भावे प्रयोगाचे नियम :-

१) कर्ता व कर्म यांना प्रत्यय लागलेला असतो.
२) क्रियापद तृतीय पुरुषी, नपुसकलिंगी, एकवचनी, एकारांत असतो.
४) कर्ता व क्रियापद यांच्यात लिंग, वचनानुसार बदल केला तरी क्रियापदाच्या रूपात बदल होत नाही.


अकर्मक भावे प्रयोग (Akarmak Bhave Prayog):-

भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्म दिलेला नसतानाही वाक्याचा अर्थ पूर्ण होत असेल तर त्याला अकर्मक भावे प्रयोग असे म्हणतात.

अकर्मक भावे प्रयोग उदाहरणे:-

१) त्यांनी जावे.
२) परमेश्वरांनी यावे.
३) मुलांनी बसावे.
४) पावसाने आज पडावे.
५) राधिकाने उद्या खेळावे.

अकर्मक भावे प्रयोगाचे नियम :-

१) वाक्यातील क्रियापद शक्यार्थ किंवा विंध्यर्थी असते.
२) कर्त्याला प्रत्यय असतो.
३) वाक्यात कर्म नसतो.

भावकर्तृरी किंवा अकृर्तृक भावे प्रयोग :-

जेव्हा अकर्मक वाक्यात क्रियापदांना करताच नसतो किंवा वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्त्याची गरज नसते तेव्हा अशा प्रयोगांना भावकर्तृरी किंवा अकृर्तृक भावे प्रयोग असे म्हणतात

भावकर्तृरी किंवा अकृर्तृक भावे प्रयोग उदाहरणे:-

१) आज उजाडले.
२) आज खूप उकडते.
३) दिवसभर सारखे गरगरते.
४) आज सारखे मळमळते.
५) रात्रीपासून सारखे गडगडते.

भावकर्तृरी किंवा अकृर्तृक भावे प्रयोगचे नियम :-

१) वाक्यात कर्ता नसतो.
२) क्रियापदाचा भावच वाक्याचा कर्ता दर्शवितो.


प्रयोग संकर किंवा मिश्र प्रयोग

कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग व भावे प्रयोग हे तीन वेगवेगळे प्रयोग असून काही वेळा वाक्यात यांपैकी दोन किंवा तिन्ही प्रयोग एकाच वेळी येतात तेव्हा अशा मिश्र प्रयोगास प्रयोग संकर किंवा मिश्र प्रयोग असे म्हणतात.

मिश्र किंवा संकर प्रयोग प्रकार

अ क्रमिश्र / संकर प्रयोग
कर्तृ-कर्म संकर प्रयोग
कर्म-भाव संकर प्रयोग
कर्तृ-भावकर्तरी प्रयोग
कर्तृ-भाव संकर प्रयोग

प्रयोग संकरचे प्रकार

कर्तृ-कर्म संकर :-

वाक्यात कर्तरी व कर्मणी या दोन्ही प्रयोगांची जाणीव होत असेल तेव्हा त्याला कर्तृ-कर्म संकर असे म्हणतात.

कर्तृ-कर्म संकर प्रयोग उदाहरणे:-

१) तू गोष्ट सांगितलीस.
२) सुयशने गोष्ट सांगितली.
३) तू गोष्ट सांगितल्यास.
४) तू कैरी खाल्लीस.
५) तुम्ही कैरी खाल्लीत.
६) तू कैऱ्या खाल्यास.
७) तुम्ही कैऱ्या खाल्ल्यात.

कर्तृ-कर्म संकर प्रयोगाचे नियम :-

१) वाक्यात करता तू किंवा तुम्ही असतो.
२) क्रियापदाला प्रत्यय असतो.
३) कर्माला प्रत्यय नसतो.

कर्म-भाव संकर :-

वाक्यात कर्मणी व भावे या दोन प्रयोगांचे अस्तित्व जाणवते तेव्हा त्याला कर्म-भाव संकर असे म्हणतात.

कर्म-भाव प्रयोग उदाहरणे:-

१) रामाने मुलाला शाळेत घातला.
२) रामाने मुलाला शाळेत घातले.
३) वडिलांनी मुलाला विदेशात पाठविले.
४) वडिलांनी मुलीला विदेशात पाठविले.

कर्म-भाव प्रयोगाचे नियम :-

१) कर्ता व कर्म दोघांना प्रत्यय असतो.
२) कर्मणी व भावे प्रयोगाची छटा असते.
३) क्रियापदाची रचना कर्मानुसार करता येते.

हे पण पहा :- सिद्ध शब्द

कर्तृ-भाव संकर :-

वाक्यात कर्तरी व भावे प्रयोग या दोन्ही प्रयोगांचे अस्तित्व जाणवते तेव्हा त्याला कर्तृ- भाव संकर असे म्हणतात.

कर्तु-भाव संकर प्रयोग उदाहरणे:-

१) तू घरी जायचे होतेस.
२) सुयशने घरी जायचे होते.
३) तू तिला मारलेस.
४) सिताने तिला मारले.
५) तू त्याला वाचविलेस.
६) तुम्ही त्याला वाचविले.
७) तुम्ही घरी जायचे होते.
८) तिने घरी जायचे होते.
९) त्याने घरी जायचे होते.

कर्तु-भाव संकर प्रयोगाचे नियम :-

१) कर्तरी प्रयोगाची छटा असते.
२) कर्माला प्रत्यय असतो.
३) कर्ता बदलल्यास क्रियापद बदलते.
४) कर्ता व कर्माला प्रत्यय असल्याने भावे प्रयोगाची छटा असते.

कर्तृ-कर्म-भाव संकर :-

वाक्यातील कर्तरी कर्मणी व भावे प्रयोग या तीनही प्रयोगाचे मिश्रण झालेले दिसते तेव्हा त्याला कर्तृ-कर्म-भाव संकर असे म्हणतात.

भावे प्रयोग उदाहरणे:-

१) तू मला वाह्या दिल्यास.
२) तुम्ही मला वह्या दिल्यात.
३) तू मला वही दिलीस.
४) तू मला वह्या दिल्यास.

            तुम्हाला मराठी प्रयोग व त्याचे प्रकार | Prayog V Tyache Prakar ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad