१ ऑगस्ट दिनविशेष | 1 August Dinvishesh | 1 August day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, July 31, 2024

१ ऑगस्ट दिनविशेष | 1 August Dinvishesh | 1 August day special in Marathi

१ ऑगस्ट दिनविशेष

1 August Dinvishesh

1 August day special in Marathi

१ ऑगस्ट दिनविशेष | 1 August Dinvishesh | 1 August day special in Marathi

            १ ऑगस्ट दिनविशेष ( 1 August Dinvishesh | 1 August day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण १ ऑगस्ट दिनविशेष ( 1 August Dinvishesh | 1 August day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

१ ऑगस्ट दिनविशेष

1 August Dinvishesh

1 August day special in Marathi


जागतिक वेब दिवस [World Wide Web Day]

[ई.पू.१०]=> रोमन सम्राट क्लॉडियस यांचा जन्म.

[११३७]=> फ्रान्सचा राजा लुई (सहावा) यांचे निधन.

[१७४४]=> लॅमार्क फ्रेंच शास्त्रज्ञ जीन बाप्टिस्टे यांचा जन्म.

[१७७४]=> जोसेफ प्रिस्टले, कार्ल शील या शास्त्रज्ञांनी ऑक्सिजन हे मूलद्रव्य वेगळे केले.

[१८३५]=> कवी व संस्कृतचे प्राध्यापक महादेव मोरेश्वर कुंटे यांचा जन्म.

[१८७६]=> कोलोरॅडो अमेरिकेचे ३८ वे राज्य बनले.

[१८८२]=> भारतरत्‍न, राष्ट्रभाषा हिन्दीचे समर्थक, अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष पुरुषोत्तम दास टंडन यांचा जन्म.

[१८९९]=> जवाहरलाल नेहरू यांच्या पत्‍नी कमला नेहरू यांचा जन्म.

[१९१३]=> चित्रपट अभिनेते दिग्दर्शक भगवान आबाजी पालव ऊर्फ मास्टर भगवान यांचा जन्म.

[१९१४]=> पहिले महायुद्ध – जर्मनीने रशिया विरुद्ध युद्ध पुकारले.

[१९१५]=> कथाकार कादंबरीकार श्री. ज. जोशी यांचा जन्म.

[१९२०]=> असहकार चळवळ प्रारंभ


[१९२०]=> लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे मुंबई येथे निधन.

[१९२०]=> लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा वाटेगाव सांगली येथे जन्म.

[१९२४]=> वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू सर फ्रँक वॉरेल यांचा जन्म.

[१९३२]=> हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री मीना कुमारी यांचा जन्म.

[१९४४]=> पोलंडची राजधानी वॉर्सॉमधे नाझींविरुद्ध सशस्त्र उठाव झाला.

[१९४८]=> मार्वल स्टुडिओ चे संस्थापक एव्ही अराद यांचा जन्म.

[१९५२]=> क्रिकेटपटू यजुर्वेंद्र सिंग यांचा जन्म.

[१९५५]=> क्रिकेटपटू समालोचक अरुण लाल यांचा जन्म.

[१९६०]=> इस्लामाबाद पाकिस्तानची राजधानी झाली.

[१९६९]=> इंग्लिश क्रिकेटपटू ग्रॅहॅम थॉर्प यांचा जन्म.

[१९८१]=> अमेरिकेत एम.टी.व्ही. चे प्रसारण सुरु झाले.

[१९९४]=> भारतातील रेल्वे प्रवाशांसाठी विमा योजना लागू झाली.

[१९९६]=> कन्नड चित्रपटसृष्टीतील अभिनेते निर्माते डॉ. राजकुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.

[१९९९]=> बंगाली साहित्यिक निरादसी चौधरी यांचे निधन.

[२००१]=> सोलापूर विद्यापीठाची स्थापना झाली.

[२००५]=> सौदी अरेबियाचा राजा फहाद यांचे निधन.

[२००८]=> अकरा पर्वतारोहणांचा के२ या जगातील दुसरया उंच शिखरावर मृत्यू झाला.

[२००८]=> क्रिकेटपटू अशोक मंकड यांचे निधन.

[२००८]=> मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते हरकिशनसिंग सुरजित यांचे निधन.



            तुम्हाला १ ऑगस्ट दिनविशेष | 1 August Dinvishesh | 1 August day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad