१० जुलै दिनविशेष | 10 July Dinvishesh | 10 July day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, July 9, 2024

१० जुलै दिनविशेष | 10 July Dinvishesh | 10 July day special in Marathi

१० जुलै दिनविशेष

10 July Dinvishesh

10 July day special in Marathi

१० जुलै दिनविशेष | 10 July Dinvishesh | 10 July day special in Marathi

            १० जुलै दिनविशेष ( 10 July Dinvishesh | 10 July day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण १० जुलै दिनविशेष ( 10 July Dinvishesh | 10 July day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

१० जुलै दिनविशेष

10 July Dinvishesh

10 July day special in Marathi


@ जागतिक ऊर्जा स्वातंत्र्य दिन [Global Energy Independence Day]

[१५५९]=> फ्रान्सचा राजा हेन्‍री (दुसरा) यांचे निधन.

[१८००]=> फोर्ट विल्यम कॉलेज ची स्थापना.

[१८९०]=> वायोमिंग अमेरिकेचे ४४ वे राज्य बनले.

[१९०३]=> साहित्यिक रा. भि. जोशी यांचा जन्म.

[१९१३]=> कवयित्री पद्मा गोळे यांचा जन्म.

[१९१३]=> कॅलिफोर्नियातील डेथ व्हॅलीमध्ये तापमान १३४ अंश फूट (५७ अंश सेल्सिअस) पर्यंत वाढले, जे पृथ्वीवरील सर्वात उच्च तापमानाचे रेकॉर्ड आहे.

[१९१४]=> सुपरमॅन हिरो चे सहनिर्माते जो शस्टर यांचा जन्म.

[१९२१]=> स्माईली चे निर्माते हार्वे बॉल यांचा जन्म.

[१९२३]=> मुसोलिनी यांनी इटलीतील सर्व राजकीय पक्षांवर बंदी घातली.

[१९२३]=> साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कथालेखक जी. ए. कुलकर्णी यांचा जन्म.

[१९२५]=> अवतार मेहेरबाबा यांनी मौनव्रताची सुरुवात केली सलग ४४ वर्षे हे व्रत मृत्यूपर्यंत पाळले.

[१९२५]=> तास या सोवियेत संघाच्या वृत्तसंस्थेची स्थापना झाली.

[१९३४]=> पद्मभूषण विजेते जामखेड मॉडेल चे जनक डॉ. रजनीकांत आरोळे यांचा सुपे अहमदनगर येथे जन्म.

[१९४०]=> अर्थशास्त्रज्ञ आणि इंग्लंडच्या हाऊस ऑफ लॉर्डस चे सभासद लॉर्ड मेघनाद देसाई यांचा जन्म.

[१९४०]=> बॅटल ऑफ ब्रिटन या नावाने ओळखले जाणारे हवाईयुद्ध सुरू झाले.

[१९४३]=> अमेरिकन टेनिस खेळाडू आर्थर अ‍ॅश यांचा जन्म.

[१९४५]=> इंग्लिश टेनिस खेळाडू व्हर्जिनिया वेड यांचा जन्म.

[१९४७]=> मुहम्मद अली जिना पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल झाले.

[१९४९]=> क्रिकेटपटू समालोचक सुनील गावसकर यांचा जन्म.

[१९५०]=> पतियाळा घराण्याच्या शास्त्रीय गायिका बेगम परवीन सुलताना यांचा जन्म.

[१९६२]=> टेलस्टार-१ हा पहिला अमेरिकन दळणवळण उपग्रह प्रक्षेपित केला.

[१९६९]=> इतिहासकार डॉ. पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर यांचे निधन.

[१९७०]=> आईसलँडचे पंतप्रधान ब्यार्नी बेनेडिक्ट्सन यांचे निधन.


[१९७१]=> भोजपुरी भाषेचे शेक्सपिअर भिखारी ठाकूर यांचे निधन.

[१९७३]=> पाकिस्तानच्या संसदेने बांगलादेशला मान्यता दिली.

[१९७३]=> बहामाज देशाला युनायटेड किंग्डमपासुन स्वातंत्र्य मिळाले.

[१९७८]=> मुंबई येथे महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाची स्थापना झाली.

[१९७८]=> मॉरिटानियात लष्करी उठाव झाला.

[१९८९]=> साम्यवादी विचारवंत साहित्यिक प्रभाकर ऊर्ध्वरेषे यांचे निधन.

[१९९२]=> आर्वी येथील विक्रम इनसॅट भू-केंद्र राष्ट्राला अर्पण केले.

[१९९२]=> मादकद्रव्यांच्या तस्करीबद्दल पनामाचे माजी राष्ट्राध्यक्ष मॅन्युएल नोरिएगा यांना ३० वर्षांच्या 
तुरुंगवासाची शिक्षा झाली.

[१९९२]=> संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या इन्सॅट-२ए या उपग्रहाचे फ्रेंच गयानातील कोउरू येथून प्रक्षेपण झाले.

[१९९५]=> गरिबांचे डॉक्टर म्हणून प्रसिद्ध डॉ. रामकृष्ण विष्णू केळकर यांचे निधन.

[१९९५]=> म्यानमारमधील लोकशाही चळवळीच्या प्रणेत्या आंग सान सू क्यी यांची ६ वर्षांच्या नजरकैदेतून बिनशर्त मुक्तता करण्यात आली.

[२०००]=> नायजेरियात एका फुटलेल्या तेलवाहिनीत स्फोट होऊन गळणारे तेल गोळा करण्यासाठी 
आलेले २५० जण जळुन ठार झाले.

[२०००]=> भारतीय पत्रकार आणि राजकारणी वक्कम मजीद यांचे निधन.

[२०००]=> मनुभाई मेहता पुरस्कार शास्त्रज्ञ वि. ग. भिडे यांना जाहीर.

[२००५]=> पार्श्वगायक जयवंत कुलकर्णी यांचे निधन.

[२०१३]=> भारतीय लेखक आणि शैक्षणिक गोकुलानंद महापात्रा यांचे निधन.

[२०१४]=> भारतीय अभिनेत्री, नृत्यांगना आणि नृत्यदिग्दर्शक जोहरा सेहगल यांचे निधन.

हे पण पहा :- सामासिक शब्द

            तुम्हाला १० जुलै दिनविशेष | 10 July Dinvishesh | 10 July day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad