१२ जुलै दिनविशेष | 12 July Dinvishesh | 12 July day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, July 11, 2024

१२ जुलै दिनविशेष | 12 July Dinvishesh | 12 July day special in Marathi

१२ जुलै दिनविशेष

12 July Dinvishesh

12 July day special in Marathi

१२ जुलै दिनविशेष | 12 July Dinvishesh | 12 July day special in Marathi

            १२ जुलै दिनविशेष ( 12 July Dinvishesh | 12 July day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण १२ जुलै दिनविशेष ( 12 July Dinvishesh | 12 July day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

१२ जुलै दिनविशेष

12 July Dinvishesh

12 July day special in Marathi


@ आंतरराष्ट्रीय मलाला दिवस [International Malala Day]

[ई .पू. १००]=> रोमन सम्राट ज्यूलियस सीझर यांचा जन्म.

[१६७४]=> शिवाजी महाराजांनी इंग्रजांशी मित्रत्त्वाचा तह केला.

[१७९९]=> रणजित सिंग यांनी लाहोर ताब्यात घेतले आणि पंजाबचे सम्राट झाले.

[१८१७]=> अमेरिकन लेखक व विचारवंत हेन्‍री थोरो यांचा जन्म.

[१८५२]=> अर्जेन्टीनाचे राष्ट्राध्यक्ष हिपोलितो य्रिगोयेन यांचा जन्म.

[१८५४]=> संशोधक इस्टमन कोडॅक कंपनीचे संस्थापक जॉर्ज इस्टमन यांचा जन्म.

[१८६३]=> इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचा जन्म.

[१८६४]=> अमेरिकन वनस्पतीतज्ञ, शिक्षणतज्ञ, संशोधक आणि शास्त्रज्ञ जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांचा जन्म.

[१८६४]=> इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचा जन्म.

[१९०९]=> प्रथितयश दिग्दर्शक बिमल रॉय यांचा जन्म.

[१९१०]=> रॉल्स-रॉयस लिमिटेड चे सहसंस्थापक चार्ल्स रोलस् यांचे निधन.

[१९१३]=> इंग्रजी लेखक मनोहर माळगावकर यांचा जन्म.

[१९२०]=> पनामा कालव्याचे औपचारिक उद्‍घाटन झाले.

[१९२०]=> सर्वोच्च न्यायालयाचे १६ वे सरन्यायाधीश यशवंतविष्णू चंद्रचूड यांचा जन्म.

[१९३५]=> प्रभातचा चन्द्रसेना हा मराठी चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला.

[१९४७]=> भारतीय क्रिकेट खेळाडू पूचिया कृष्णमूर्ती यांचा जन्म.

[१९४९]=> आयर्लंड चे पहिले राष्ट्राध्यक्ष डग्लस हाइड यांचे निधन.


[१९६१]=> पानशेत, खडकवासला ही धरणे फुटल्यामुळे पुण्यातील पुरात २,००० लोक मृत्यूमुखी, १,००,००० लोक 
विस्थापित झाले.

[१९६१]=> भारतीय अभिनेते, गायक आणि निर्माते शिव राजकुमार यांचा जन्म.

[१९६२]=> लंडनमधील मार्क्वी क्लबमधे द रोलिंग स्टोन्स चा पहिला कार्यक्रम झाला.

[१९६५]=> क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांचा जन्म.

[१९७९]=> किरिबातीला इंग्लंडपासुन स्वातंत्र्य मिळाले.

[१९८२]=> राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेची (NABARD) स्थापना झाली.

[१९८५]=> पी. एन. भगवती भारताचे १७ वे सरन्यायाधीश झाले.

[१९९४]=> हिंदी मराठी चित्रपटसृष्टीतील पटकथाकार वसंत साठे यांचे निधन.

[१९९५]=> अभिनेते दिलीपकुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.

[१९९८]=> १६ व्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत यजमान फ्रान्सने गतविजेत्या ब्राझिलचा ३-० असा पराभव करुन विश्वकरंडक जिंकला.

[१९९९]=> महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार सुनील गावसकर यांना प्रदान.

[१९९९]=> हिन्दी चित्रपट अभिनेता राजेंद्र कुमार यांचे निधन.

[२०००]=> मराठी कवयित्री इंदिरा संत यांचे निधन.

[२००१]=> कृषीशास्त्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना टिळक पुरस्कार प्रदान.

[२०१२]=> मुष्टीयोद्धा आणि अभिनेता दारासिंग यांचे निधन.

[२०१३]=> चित्रपट अभिनेता प्राणकृष्ण सिकंद ऊर्फ प्राण यांचे निधन.

[२०१३]=> बोस कॉर्पोरेशन चे स्थापक अमर बोस यांचे निधन.


            तुम्हाला १२ जुलै दिनविशेष | 12 July Dinvishesh | 12 July day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad