१३ जुलै दिनविशेष | 13 July Dinvishesh | 13 July day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, July 12, 2024

१३ जुलै दिनविशेष | 13 July Dinvishesh | 13 July day special in Marathi

१३ जुलै दिनविशेष

13 July Dinvishesh

13 July day special in Marathi

१३ जुलै दिनविशेष | 13 July Dinvishesh | 13 July day special in Marathi

            १३ जुलै दिनविशेष ( 13 July Dinvishesh | 13 July day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण १३ जुलै दिनविशेष ( 13 July Dinvishesh | 13 July day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

१३ जुलै दिनविशेष

13 July Dinvishesh

13 July day special in Marathi


@ बाजी प्रभू देशपांडे यांची पुण्यतिथी. [Death anniversary of Baji Prabhu Deshpande]

[१६६०]=> पावनखिंड लढवून बाजीप्रभू देशपांडे यांनी स्वराज्यासाठी आपल्याल प्राणाचे बलिदान दिले.

[१६६०]=> पावनखिंडीतील लढाई.

[१७९३]=> फ्रेंच क्रांतिकारी ज्याँपॉल मरात यांचे निधन.

[१८३७]=> राणी व्हिक्टोरिया बकिंगहॅम पॅलेस मध्ये राहायला गेली. तेव्हापासून ते इंग्लंडच्या राजाचे/राणीचे अधिकृत निवासस्थान बनले.

[१८६३]=> सक्तीच्या सैन्यभरती विरोधात न्यूयॉर्क शहरात दंगा झाला.

[१८९२]=> जयपूर-अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका केसरबाई केरकर यांचा जन्म.

[१९०८]=> ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये स्त्रियांना भाग घेण्यास परवानगी.

[१९२९]=> जतिंद्रनाथ दास यांनी लाहोर तुरुंगात आपले आमरण उपोषण सुरू केले. या उपोषणातच त्यांचा मृत्यू झाला.

[१९४२]=> अमेरिकन अभिनेता हॅरिसन फोर्ड यांचा जन्म.

[१९४४]=> रुबिक क्यूब चे निर्माते एरो रुबिक यांचा जन्म.

[१९५३]=> वेस्ट इंडीजचा क्रिकेट खेळाडू लॅरी गोम्स यांचा जन्म.


[१९५५]=> २८ वर्षीय रुथ एलिसला प्रियकराचा खून केल्याबद्दल फाशी दिली. ग्रेट ब्रिटनमधली स्त्रीकैद्याची अखेरची फाशी ठरली.

[१९६४]=> भारतीय क्रिकेट खेळाडू उत्पल चॅटर्जी यांचा जन्म.

[१९६९]=> तत्त्वज्ञ, विचारवंत, योगी, स्वातंत्र्य सैनिक आणि लेखक महर्षी न्यायरत्‍न धुंडिराजशास्त्री विनोद यांचे निधन.

[१९७७]=> रोहित्रावर वीज पडल्यामुळे न्यूयॉर्क शहरातील वीजपुरवठा २४ तास खंडित झाला.

[१९८०]=> बोत्स्वानाचे पहिले राष्ट्राध्यक्ष सेरेत्से खामा यांचे निधन.

[१९८३]=> श्रीलंकेत वांशिक हत्याकांड. ३,००० तामिळ व्यक्तींची हत्या. ४,००,००० हून अधिक तामिळींचे पलायन.

[१९९०]=> क्रीडा समीक्षक व समालोचक अर्देशिर फुर्दोरजी सोहराबजी ऊर्फ बॉबी तल्यारखान यांचे निधन.

[१९९४]=> धृपद गायक, संगीतकार शिक्षक पं.के. जी. गिंडे यांचे निधन.

[२०००]=> साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या कवयित्री व लेखिका इंदिरा संत यांचे निधन.

[२००९]=> हिंदी मराठी चित्रपट अभिनेते निळू फुले यांचे निधन.

[२०१०]=> सुप्रसिद्ध सॅक्सोफोन वादक मनोहारी सिंग यांचे निधन.

[२०११]=> मुंबई शहरात बॉम्बस्फोटांत २६ जण ठार, तर १३० जण जखमी.

हे पण पहा :- सामान्य रूप

            तुम्हाला १३ जुलै दिनविशेष | 13 July Dinvishesh | 13 July day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad