१६ जुलै दिनविशेष | 16 July Dinvishesh | 16 July day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, July 15, 2024

१६ जुलै दिनविशेष | 16 July Dinvishesh | 16 July day special in Marathi

१६ जुलै दिनविशेष

16 July Dinvishesh

16 July day special in Marathi

१६ जुलै दिनविशेष | 16 July Dinvishesh | 16 July day special in Marathi

            १६ जुलै दिनविशेष ( 16 July Dinvishesh | 16 July day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण १६ जुलै दिनविशेष ( 16 July Dinvishesh | 16 July day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

१६ जुलै दिनविशेष

16 July Dinvishesh

16 July day special in Marathi


@ हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा संमत झाला. [The Hindu Widow Remarriage Act was passed.]

[ई.पु. ६२२]=> प्रेषित मुहम्मद पैगंबर यांनी मदिनेहून प्रयाण केले. इस्लामिक हिजरी कॅलेंडरची या दिवसापासून सुरुवात झाली.

[१३४२]=> हंगेरीचा राजा चार्ल्स (पहिला) यांचे निधन.

[१६६१]=> स्वीडिश बँकेने युरोपमधील पहिल्या नोटा जारी केल्या.

[१७७३]=> ब्रिटिश चित्रकार व रॉयल अ‍ॅकॅडमीचे पहिले अध्यक्ष सर जोशुआ रेनॉल्ड्स यांचा जन्म.

[१८५६]=> हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा संमत झाला.

[१८८२]=> अब्राहम लिंकन यांची पत्नी मेरीटॉड लिंकन यांचे निधन.

[१९०९]=> स्वातंत्र्यसेनानी. भारतरत्न (मरणोत्तर) अरुणा आसीफ अली यांचा जन्म.

[१९१३]=> ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी शांतानंद सरस्वती यांचा जन्म.

[१९१४]=> मराठी साहित्यिक वा. कृ. चोरघडे यांचा जन्म.

[१९१७]=> नाटककार व लेखक जगदीश चंद्र माथूर यांचा जन्म.

[१९२३]=> भूदल प्रमुख के. व्ही. कृष्णराव यांचा जन्म.

[१९२६]=> नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन जीवशास्त्रज्ञ इर्विन रोझ यांचा जन्म.

[१९३५]=> ओक्लाहोमा मध्ये जगातील पहिले पार्किंग मीटर बसवण्यात आले.

[१९३९]=> भारतीय अभिनेते आणि निर्माते शृंगी नागराज यांचा जन्म.


[१९४३]=> लेखक आणि इंग्रजीचे प्राध्यापक प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे यांचा जन्म.

[१९४५]=> अमेरिकेच्या पहिल्या अणुबॉम्बची चाचणी.

[१९६५]=> ईटली व फ्रान्सला जोडणार्‍या माँट ब्लँक बोगद्याचे उद्‍घाटन झाले.

[१९६८]=> भारतीय हॉकी पटू धनराज पिल्ले यांचा जन्म.

[१९६८]=> विकिपीडिया चे सहसंस्थापक लैरी सेन्जर यांचा जन्म.

[१९६९]=> चंद्रावर पहिला मानव उतरवणाऱ्या अपोलो-११ अंतराळयानाचे फ्लोरिडा येथून प्रक्षेपण.

[१९७३]=> दक्षिण अफ्रिकेचा क्रिकेटपटू शॉन पोलॉक यांचा जन्म.

[१९८४]=> हिंदी चित्रपट अभिनेत्री कतरिना कैफ यांचा जन्म.

[१९८६]=> इतिहासकार वासुदेव सीताराम बेंद्रे तथा वा. सी. बेन्द्रे यांचे निधन.

[१९९२]=> भारताचे ९वे राष्ट्रपती म्हणून डॉ. शंकरदयाळ शर्मा यांची निवड झाली.

[१९९३]=> रामपूर साहसवान घराण्याचे ख्यालगायक उ. निसार हुसेन खाँ यांचे निधन.

[१९९४]=> नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ जुलियन श्वाइंगर यांचे निधन.

[१९९८]=> गुजरातमध्ये शाळेतील प्रवेशाच्या वेळी पाल्याच्या नावानंतर आईलाही नाव लावण्याच्या अधिकाराचा निर्णय.

हे पण पहा :- सर्वनाम


            तुम्हाला १६ जुलै दिनविशेष | 16 July Dinvishesh | 16 July day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad