१७ जुलै दिनविशेष | 17 July Dinvishesh | 17 July day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, July 16, 2024

१७ जुलै दिनविशेष | 17 July Dinvishesh | 17 July day special in Marathi

१७ जुलै दिनविशेष

17 July Dinvishesh

17 July day special in Marathi

१७ जुलै दिनविशेष | 17 July Dinvishesh | 17 July day special in Marathi

            १७ जुलै दिनविशेष ( 17 July Dinvishesh | 17 July day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण १७ जुलै दिनविशेष ( 17 July Dinvishesh | 17 July day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

१७ जुलै दिनविशेष

17 July Dinvishesh

17 July day special in Marathi

@ जागतिक न्याय दिन [World Justice Day]

[१७९०]=> स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि तत्त्ववेत्ता अ‍ॅडम स्मिथ यांचे निधन.

[१८०२]=> मोडी लिपीतून पहिल्यांदाच मुद्रण करण्यात आले.

[१८१९]=> अ‍ॅडॅम्स-ओनिस करारानुसार फ्लोरिडा हे राज्य अमेरिकेने स्पेनकडुन ५ दशलक्ष डॉलर 
देऊन विकत घेतले.

[१८४१]=> सुप्रसिद्ध पंच या विनोदी साप्ताहिकाचा पहिला अंक प्रकाशित.

[१८८९]=> अमेरिकन लेखक अर्लस्टॅनले गार्डनर यांचा जन्म.

[१९१७]=> किंग जॉर्ज (पाचवा) यांनी फतवा काढून जाहीर केले की त्यांच्या वंशातील पुरुष मंडळी विंडसर हे आडनाव लावतील.

[१९१७]=> भारतीय अभिनेते, गायक आणि पटकथालेखक बिजोन भट्टाचार्य यांचा जन्म.

[१९१८]=> ग्वाटेमालाचा राष्ट्राध्यक्ष कार्लोसमनुएल अराना ओसोरिया यांचा जन्म.

[१९१९]=> संगीतकार स्नेहल भाटकर यांचा जन्म.

[१९२३]=> कूपर कार कंपनी चे सहसंस्थापक जॉन कूपर यांचा जन्म.

[१९३०]=> दलित साहित्यिक बाबूराव बागूल यांचा जन्म.

[१९४७]=> मुंबईते रेवस जलवाहतूक करणाऱ्या रामदास या फेरीबोटीला जलसमाधी मिळून सुमारे ७०० लोक मृत्युमुखी.


[१९५४]=> जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मेर्केल यांचा जन्म.

[१९५५]=> वॉल्ट डिस्ने यांनी कॅलिफोर्निया येथे डिस्नेलँड सुरू केले.

[१९७५]=> अमेरिकेचे अपोलो रशियाचे सोयुझ ही दोन अंतराळयाने एकमेकांस जोडली गेली.

[१९७६]=> कॅनडातील मॉन्ट्रिअल येथे २१ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात.

[१९९२]=> अभिनेत्री शांता हुबळीकर यांचे निधन.

[१९९२]=> बंगाली हिंदी चित्रपटातील अभिनेत्री आणि गायिका कानन देवी यांचे निधन.

[१९९३]=> तेलुगू भाषेतील तेलुगू थल्ली हा पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांना प्रदान.

[१९९४]=> विश्वकप फूटबॉलच्या अंतिम सामन्यात ब्राझिलने इटालीला पेनल्टी शूटआऊटमधे हरवले.

[२०००]=> अभिनेत्री नृत्यांगना वैजयंतीमाला बाली यांना भरतनाट्य शिखरमणी पुरस्कार जाहीर.

[२००४]=> तामिळनाडुतील कुंभकोणम गावात एका शाळेला लागलेल्या आगीत ९० विद्यार्थी मृत्यूमुखी पडले.

[२००५]=> युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान सर एडवर्ड हीथ यांचे निधन.

[२०१२]=> भारतीय-इंग्रजी राजकारणी मार्शा सिंह यांचे निधन.

[२०१२]=> समाजवादी नेत्या आणि ६ व्या लोकसभेच्या सदस्य मृणाल गोरे यांचे निधन.


            तुम्हाला १७ जुलै दिनविशेष | 17 July Dinvishesh | 17 July day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad