२० जुलै दिनविशेष | 20 July Dinvishesh | 20 July day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, July 19, 2024

२० जुलै दिनविशेष | 20 July Dinvishesh | 20 July day special in Marathi

२० जुलै दिनविशेष

20 July Dinvishesh

20 July day special in Marathi

२० जुलै दिनविशेष | 20 July Dinvishesh | 20 July day special in Marathi

            २० जुलै दिनविशेष ( 20 July Dinvishesh | 20 July day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण २० जुलै दिनविशेष ( 20 July Dinvishesh | 20 July day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

२० जुलै दिनविशेष

20 July Dinvishesh

20 July day special in Marathi

@ आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस [International Chess Day]

@ राष्ट्रीय चंद्र दिवस [National Moon Day]

[ई.पू.३५६]=> मॅसेडोनियाचा राजा अलेक्झांडर द ग्रेट यांचा जन्म.

[१४०२]=> तैमूरलंगने तुर्कस्तानमधील अंकारा शहर जिंकले.

[१८०७]=> निकेफोरे नीएपस यांना जगातील पहिल्या इंजिनसाठी पेटंट दिले गेले.

[१८२२]=> जनुकांची संकल्पना मांडणारा जर्मन जीवशास्त्रज्ञ ग्रेगोर मेंडेल यांचा जन्म.

[१८२८]=> मुंबापूर वर्तमान हे मराठी वृत्तपत्र मुंबईत सुरू झाले.

[१८३६]=> ज्वरमापीचा शोध लावणारे डॉक्टर सर थॉमस क्लिफोर्ड ऑलबट यांचा जन्म.

[१८७१]=> ब्रिटिश कोलंबिया हा प्रांत कॅनडात विलीन झाला.

[१८८९]=> बीबीसी चे सहसंस्थापक जॉन रीथ यांचा जन्म.

[१९०३]=> फोर्ड मोटर कंपनीतून पहिली मोटारगाडी बाहेर पडली.

[१९०८]=> बडोद्याचे महाराज सर सयाजीराव गायकवाड (तिसरे) यांच्या पुढाकाराने बँक ऑफ बडोदा ची स्थापना झाली.

[१९११]=> भारतीय क्रिकेट खेळाडू बाका जिलानी यांचा जन्म.

[१९१९]=> माउंट एव्हरेस्टवर सर्वप्रथम चढाई करणारे न्यूझीलंडचे गिर्यारोहक सर एडमंड हिलरी 
यांचा जन्म.


[१९२१]=> बनारस घराण्याचे नामवंत तबलावादक पंडित सामताप्रसाद यांचा जन्म.

[१९२२]=> रशियन गणितज्ञ आंद्रे मार्कोव्ह यांचे निधन.

[१९२४]=> बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना.

[१९२६]=> मेथॉडिस्ट चर्चने स्त्रियांना धर्मगुरू होण्याची परवानगी दिली.

[१९२९]=> हिन्दी चित्रपट अभिनेता राजेंद्रकुमार यांचा जन्म.

[१९३७]=> रेडिओचे संशोधक गुग्लिएल्मो मार्कोनी यांचे निधन.

[१९४३]=> कादंबरीकार, साहित्य समीक्षक आणि तत्त्वचिंतक वामन मल्हार जोशी यांचे निधन.

[१९४४]=> दुसरे महायुद्ध – क्लाऊस व्हॉन स्टाऊफेनबर्गने केलेल्या प्राणघातक हल्ल्यातुन अ‍ॅडॉल्फ हिटलर बचावला.

[१९४९]=> इस्त्रायल व सीरीयाने शांतता करार केल्यामुळे १९ महिने सुरू असलेले युद्ध संपले.

[१९५१]=> जॉर्डनचा राजा अब्दुल्ला (पहिला) यांचे निधन.

[१९५२]=> फिनलंडची राजधानी हेलसिंकी येथे १५ व्या ऑलिम्पिक खेळांना सुरूवात झाली.

[१९६०]=> सिरिमावो भंडारनायके श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी.

[१९६५]=> क्रांतिकारक बटुकेश्वर दत्त यांचे निधन.

[१९६९]=> नील आर्मस्ट्राँग हा चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव ठरला.

[१९७२]=> अभिनेत्री गीता दत्त यांचे निधन.

[१९७३]=> अमेरिकन अभिनेता आणि मार्शल आर्ट तज्ज्ञ ब्रूस ली यांचे निधन.

[१९७३]=> केनियाचे अर्थमंत्री ज्युलियस कियानो यांनी जाहीर केले की देशातील आशियाई लोकांचे उद्योग-धंदे वर्षअखेरीस सक्तीने बंद करण्यात येतील.

[१९७६]=> भारतीय क्रिकेट खेळाडू देबाशिष मोहंती यांचा जन्म.

[१९७६]=> मंगळावर प्रथमच व्हायकिंग-१ हे मानवरहित अंतराळयान उतरले.

[१९८९]=> म्यानमारच्या सरकारने ऑँग सान सू कीला नजरकैदेत टाकले.

[१९९५]=> शास्त्रीय गायक शंकरराव बोडस यांचे निधन.

[२०००]=> अभिनेते दिलीपकुमार यांना राजीव गांधी राष्ट्रीय सद्‌भावना पुरस्कार जाहीर.

[२०१३]=> भारतीय राजकारणी खुर्शिद आलम खान यांचे निधन.

[२०१५]=> पाच दशकांनंतर अमेरिका आणि क्युबा यांच्यामध्ये राजनयिक संबंध पुन्हा सुरू झाले.


            तुम्हाला २० जुलै दिनविशेष | 20 July Dinvishesh | 20 July day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad