२१ जुलै दिनविशेष | 21 July Dinvishesh | 21 July day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, July 20, 2024

२१ जुलै दिनविशेष | 21 July Dinvishesh | 21 July day special in Marathi

२१ जुलै दिनविशेष

21 July Dinvishesh

21 July day special in Marathi

२१ जुलै दिनविशेष | 21 July Dinvishesh | 21 July day special in Marathi

            २१ जुलै दिनविशेष ( 21 July Dinvishesh | 21 July day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण २१ जुलै दिनविशेष ( 21 July Dinvishesh | 21 July day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

२१ जुलै दिनविशेष

21 July Dinvishesh

21 July day special in Marathi


[इ.पू.३५६]=> जगातील सात आश्चर्यांपैकी एक एफिसस आर्टेमिसचे मंदिर नष्ट झाले.

[१८३१]=> बेल्जिअमचा पहिला राजा लिओपॉल्ड याचा शपथविधी झाला.

[१८५३]=> ज्योतिषगणिताचे अभ्यासक, ग्रंथलेखक शंकर बाळकृष्ण दीक्षित यांचा जन्म.

[१८९९]=> नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन लेखक अर्नेस्ट हेमिंग्वे यांचा जन्म.

[१९१०]=> स्वातंत्र्यसैनिक, रोजगार हमी योजनेचे जनक वि. स. पागे यांचा जन्म.

[१९११]=> भारतीय लेखक, कवी आणि विद्वान उमाशंकर जोशी यांचा जन्म.

[१९२०]=> गीतकार आनंद बक्षी यांचा जन्म.

[१९३०]=> भारतीय संस्कृतीचे अभ्यासक संशोधक डॉ. रा. चिं. ढेरे यांचा जन्म.

[१९३४]=> क्रिकेट कप्तान आणि निवड समितीचे अध्यक्ष चंदू बोर्डे यांचा जन्म.

[१९४४]=> २० जुलै १९४४ रोजी अ‍ॅडॉल्फ हिटलरची हत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या क्लाऊस व्हॉन 
स्टाऊफेनबर्गला फाशी.

[१९४५]=> दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू बॅरी रिचर्ड्स यांचा जन्म.

[१९४७]=> सलामीचे फलंदाज आणि राज्यसभा सदस्य चेतन चौहान यांचा जन्म.

[१९६०]=> पंजाबी गायक अमरसिंग चमकीला यांचा जन्म.

[१९६०]=> सिरीमाओ बंदरनायके या श्रीलंकेच्या ६ व्या पंतप्रधान बनल्या. त्या जगातील पहिल्या 
महिला पंतप्रधान आहेत.


[१९७२]=> भूतानचे राजे जिग्मेदोरजी वांगचूक यांचे निधन.

[१९७६]=> आयर्लंडमधील ब्रिटिश राजदूताची हत्या.

[१९८३]=> अंटार्क्टिका वरील व्होस्टॉक येथे उणे ८९.२ सेल्सियस या पृथ्वीवरील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद केली गेली.

[१९९४]=> मराठी बखर वाङ्‌मयाचे अभ्यासक डॉ. र. वि. हेरवाडकर यांचे निधन.

[१९९५]=> संगीतकार मेंडोलिन वादक सज्जाद हुसेन यांचे निधन.

[१९९७]=> साहित्यिक राजा राजवाडे यांचे निधन.

[१९९८]=> अमेरिकन अंतराळवीर ऍलन शेपर्ड यांचे निधन.

[२००१]=> दाक्षिणात्य अभिनेते शिवाजी गणेशन यांचे निधन.

[२००२]=> जगभर दूरसंचार सेवा पुरवणाऱ्या वर्ल्ड कॉम या अमेरिकन कंपनीने दिवाळखोरी घोषित केली.

[२००२]=> मराठी चित्रकार गोपाळराव बळवंतराव कांबळे यांचे निधन.

[२००९]=> किराणा घराण्याच्या शास्त्रीय गायिका गंगूबाई हनगळ यांचे निधन.

[२०१३]=> भारतीय मार्शल आर्टिस्ट लूरेम्बॅम ब्रजेशोतोरी देवी यांचे निधन.


            तुम्हाला २१ जुलै दिनविशेष | 21 July Dinvishesh | 21 July day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad