२२ जुलै दिनविशेष | 22 July Dinvishesh | 22 July day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, July 21, 2024

२२ जुलै दिनविशेष | 22 July Dinvishesh | 22 July day special in Marathi

२२ जुलै दिनविशेष

22 July Dinvishesh

22 July day special in Marathi

२२ जुलै दिनविशेष | 22 July Dinvishesh | 22 July day special in Marathi

            २२ जुलै दिनविशेष ( 22 July Dinvishesh | 22 July day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण २२ जुलै दिनविशेष ( 22 July Dinvishesh | 22 July day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

२२ जुलै दिनविशेष

22 July Dinvishesh

22 July day special in Marathi

@ राष्ट्रीय ध्वज दिन [National Flag Day]

[१५४०]=> हंगेरीचा राजा जॉन झापोल्या यांचे निधन.

[१८२६]=> इटालियन खगोलशास्त्रज्ञ ज्युसेप्पे पियाझी यांचे निधन.

[१८८७]=> जर्मन भौतिकशास्त्रज्ञ गुस्तावलुडविग हर्ट्झ यांचा जन्म.

[१८९८]=> शास्त्रीय गायक पं. विनायकराव पटवर्धन यांचा जन्म.

[१९०८]=> देशाचे दुर्दैव हा जहाल अग्रलेख लिहिल्याबद्दल लोकमान्य टिळकांना ६वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा.

[१९१५]=> भारतीय-पाकिस्तानी राजकारणी आणि राजनयिक शैस्ता सुहरावर्दी इकामुल्ला यांचा जन्म.

[१९१८]=> पहिल्या महायुद्धातील भारतीय पायलट इंदरलाल रॉय यांचे निधन.

[१९२३]=> हिंदी चित्रपट पार्श्वगायक मुकेश चंदमाथूर तथा मुकेश यांचा जन्म.

[१९२५]=> पत्रकार, महाराष्ट्र टाइम्सचे संपादक लेखक गोविंद तळवलकर यांचा जन्म.

[१९३१]=> फ़र्ग्युसन महाविद्यालयाच्या ग्रंथालयात वासुदेव बळवंत गोगटे यांनी सर जॉन हॉटसन या मुंबई प्रांताच्या राज्यपालावर गोळया झाडल्या. हॉटसन वाचला.

[१९३३]=> विली पोस्ट या वैमानिकाने ७ दिवस १८ तास ४९ मिनिटे या विक्रमी वेळेत विमानातून पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली.


[१९३७]=> मध्यमगती गोलंदाज वसंत रांजणे यांचा जन्म.

[१९४२]=> वॉर्सा मधुन ज्यूंना हद्दपार करणे सुरू झाले.

[१९४४]=> पोलंडमधे कम्युनिस्ट राजवटीची सुरुवात झाली.

[१९४६]=> इर्गुनया दहशतवादी संघटनेने जेरुसलेम मधील ब्रिटिश मुख्यालयावर बॉम्ब हल्ला केला. त्यात ९० ठार.

[१९४७]=> राष्ट्रीय ध्वजाचा स्वीकार.

[१९७०]=> महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्म.

[१९७७]=> चीनचे नेते डेंग क्सियाओ पिंग पुन्हा सत्तेवर आले.

[१९८४]=> साहित्यिक आणि प्रकाशक गजानन लक्ष्मण तथा ग. ल. ठोकळ यांचे निधन.

[१९९२]=> अमेरिकन गायक व अभिनेत्री सेलेना गोमेझ यांचा जन्म.

[१९९३]=> वेषभूषाकार भानू अथैय्या यांना अमेरिकेतील अ‍ॅकेडमी ऑफ मोशन पिक्‍चर आर्ट अँड सायन्स या संघटनेचे सदस्यत्त्व देण्यात आले.

[१९९५]=> इंग्लिश क्रिकेटपटू हेरॉल्ड लारवूड यांचे निधन.

[२००१]=> जागतिक जलतरण स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा जलतरणपटू इयान थॉर्प याने ४०० मीटर फ्रीस्टाइल शर्यत ३ मि. ४०.१७ सेकंदांत जिंकली.


            तुम्हाला २२ जुलै दिनविशेष | 22 July Dinvishesh | 22 July day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad