२४ जुलै दिनविशेष | 24 July Dinvishesh | 24 July day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, July 23, 2024

२४ जुलै दिनविशेष | 24 July Dinvishesh | 24 July day special in Marathi

२४ जुलै दिनविशेष

24 July Dinvishesh

24 July day special in Marathi

२४ जुलै दिनविशेष | 24 July Dinvishesh | 24 July day special in Marathi

            २४ जुलै दिनविशेष ( 24 July Dinvishesh | 24 July day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण २४ जुलै दिनविशेष ( 24 July Dinvishesh | 24 July day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

२४ जुलै दिनविशेष

24 July Dinvishesh

24 July day special in Marathi


@ राष्ट्रीय औष्णिक अभियंता दिन [National Thermal Engineer Day]

[११२९]=> जपानी सम्राट शिराकावा यांचे निधन.

[१५६७]=> स्कॉटलंडची राणी मेरी पदच्युत झाल्यामुळे १ वर्षाचा जेम्स (सहावा) स्कॉटलंडच्या राजेपदी विराजमान झाला.

[१७०४]=> ब्रिटनने जिब्राल्टरचा ताबा घेतला.

[१७८६]=> फ्रेंच गणितज्ञ संशोधक जोसेफ निकोलेट यांचा जन्म.

[१८२३]=> चिलीमध्येे गुलामगिरीची प्रथा समाप्त झाली.

[१८५१]=> जर्मन गणितज्ञ फ्रेडरिक शॉटकी यांचा जन्म.

[१९११]=> बासरीवादक संगीतकार अमलज्योती तथा पन्नालाल घोष यांचा जन्म.

[१९११]=> हायराम बिंगहॅम – ३रे यांनी पेरूतील माचुपिच्चू हे प्राचीन इंका संस्कृतीचे शहर शोधले.

[१९११]=> हैदराबाद मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसेनानी गोविंदभाई श्रॉफ यांचा जन्म.

[१९२८]=> गुजरातचे माजी मुख्यमंत्री, राज्यसभा सदस्य केशुभाई पटेल यांचा जन्म.

[१९३१]=> पिटसबर्ग, पेनसिल्व्हानिया येथील एका वृद्धाश्रमास आग लागुन ४८ लोक मृत्यूमुखी पडले.

[१९३७]=> भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक मनोज कुमार यांचा जन्म.

[१९४३]=> दुसरे महायुद्ध – ऑपरेशन गोमोरा – दोस्त राष्ट्रांनी जर्मनीतील हॅम्बर्ग शहरावर तुफानी बॉम्बहल्ले सुरू केले.

[१९४५]=> विप्रो या जगप्रसिद्ध कंपनीचे चेअरमन अझीम प्रेमजी यांचा जन्म.

[१९४७]=> पाकिस्तानी फलंदाज जहीर अब्बास यांचा जन्म.

[१९६९]=> अमेरिकन अभिनेत्री, गायिका आणि नर्तिका जेनिफर लोपेझ यांचा जन्म.

[१९६९]=> चंद्र मोहिमेनंतर अपोलो ११हे अंतराळयान पृथ्वीवर सुखरूप परतले.

[१९७०]=> भारतीय उद्योगपती पीटर दि नरोन्हा यांचे निधन.

[१९७४]=> नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश पदार्थवैज्ञानिक सर जेम्स चॅडविक यांचे निधन.


[१९७४]=> वॉटरगेट प्रकरण – अमेरिकेच्या सर्वोच्‍च न्यायालयाने निकाल दिला की राष्ट्राध्यक्ष रिर्चड निक्सनने स्वत:विरुद्धचा पुरावा अवैधरीत्या दडवून ठेवला होता.

[१९८०]=> इंग्लिश विनोदी अभिनेता आणि गायक पीटर सेलर्स यांचे निधन.

[१९८०]=> बंगाली हिंदी चित्रपट अभिनेते उत्तम कुमार यांचे निधन.

[१९९०]=> इराकने कुवेतच्या सीमेजवळ सैन्याची जमवाजमव करण्यास सुरूवात केली.

[१९९१]=> अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी आर्थिक सुधारणांचा पाया घालणारा अर्थसंकल्प संसदेत सादर केला.

[१९९७]=> बंगाली लेखिका महाश्वेतादेवी यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.

[१९९७]=> माजी हंगामी पंतप्रधान गुलझारीलाल नंदा आणि स्वातंत्र्यसैनिक अरुणा असफ अली यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान.

[१९९८]=> परकीय चलन नियमन कायद्याच्या (FERA) जागी परकीय चलन व्यवस्थापन कायदा (FEMA) जारी करण्यात आला.

[२०००]=> विप्रो आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत चेन्नईची विजयालक्ष्मी सुब्रह्यण्यम भारताची पहिला महिला ग्रँडमास्टर बनली.

[२००१]=> टोकियो येथे झालेल्या जागतिक जलतरण स्पर्धेत शिखा टंडनने फ्रीस्टाइल प्रकारात १०० मी. अंतर ५९.९६ सेकंदांत पार केले.

[२००५]=> लान्स आर्मस्ट्राँगने टूर-डी-फ्रान्स ही सायकल शर्यत सलग सातव्यांदा जिंकली.

[२०१२]=> सीटी स्कॅन चे शोधक रॉबर्ट लिडले यांचे निधन.


            तुम्हाला २४ जुलै दिनविशेष | 24 July Dinvishesh | 24 July day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad