२६ जुलै दिनविशेष
26 July Dinvishesh
26 July day special in Marathi
२६ जुलै दिनविशेष ( 26 July Dinvishesh | 26 July day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण २६ जुलै दिनविशेष ( 26 July Dinvishesh | 26 July day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
२६ जुलै दिनविशेष
26 July Dinvishesh
26 July day special in Marathi
@ कारगिल विजय दिवस [Kargil Victory Day]
[ई.पु.८११]=> बायझेन्टाईन सम्राट निसेफोरस यांचे निधन.
[१०९४]=> फ्लाइट सिम्युलेटर चे शोधक एडविन अल्बर्ट लिंक यांचा जन्म.
[१३८०]=> जपानी सम्राट कोम्यो यांचे निधन.
[१५०९]=> सम्राट कृष्णदेवराय यांनी विजयनगर साम्राज्याच्या पुनरुत्पादन सुरूवात केली.
[१७४५]=> इंग्लंडमध्ये गिल्डफोर्ड येथे महिलांचा पहिला क्रिकेट सामना.
[१७८८]=> न्यूयॉर्क अमेरिकेचे ११वे राज्य बनले.
[१८४३]=> टेक्सासच्या प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष सॅम ह्युस्टन यांचे निधन.
[१८४७]=> लायबेरिया स्वतंत्र.
[१८५६]=> नोबेल पारितोषिक विजेते आयरिश लेखक आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे (LSE) सहसंस्थापक जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचा जन्म.
[१८६५]=> भारतीय कवी आणि संगीतकार रजनीकांत सेन यांचा जन्म.
[१८६७]=> ग्रीसचा राजा ओट्टो यांचे निधन.
[१८७५]=> मानसशास्त्रज्ञ व मानसोपचारतज्ञ कार्ल युंग यांचा जन्म.
[१८९१]=> फ्रान्सने ताहिती बेटे ताब्यात घेतली.
[१८९१]=> बंगालमधील प्राच्यविद्या संशोधक, एशियाटिक सोसायटीचे पहिले अध्यक्ष राजेन्द्रलाल मित्रा यांचे निधन.
[१८९३]=> ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक पं. कृष्णराव शंकर पंडित यांचा जन्म.
[१८९४]=> इंग्लिश लेखक अल्डस हक्सले यांचा जन्म.
[१८९४]=> कवी समाजसेवक वासुदेव गोविंद मायदेव यांचा जन्म.
[१९०२]=> कोल्हापूर संस्थानात आरक्षणाची तरतूद.
[१९२७]=> भारतीय क्रिकेट खेळाडू जी. एस. रामचंद यांचा जन्म.
[१९२८]=> भारतीय-पाकिस्तानी लेखक आणि कवी इब्न-ए-सफ़ी यांचा जन्म.
[१९३९]=> ऑस्ट्रेलियाचे २५वे पंतप्रधान जॉन हॉवर्ड यांचा जन्म.
[१९४२]=> स्लोव्हेकियाचे पंतप्रधान व्लादिमिर मेसियर यांचा जन्म.
[१९४९]=> थायलंडचे पंतप्रधान थाकसिन शिनावात्रा यांचा जन्म.
[१९५२]=> अर्जेन्टिनाचे अध्यक्ष जॉन पेरोन यांची पत्नी एव्हा पेरोन यांचे निधन.
[१९५३]=> फिदेल कॅस्ट्रो यांच्या मोंकडा बैरक्स वरील अयशस्वी हल्ल्यामुळे क्युबन रिव्होल्यूशनची सुरुवात झाली, हीच चळवळ 26 जुलै ची क्रांती म्हणून ओळखली जाते.
[१९५४]=> अमेरिकन लॉन टेनिसपटू व्हिटास गेरुलायटिस यांचा जन्म.
[१९५५]=> पाकिस्तानचे ११वे राष्ट्राध्यक्ष अासिफ अली झरदारी यांचा जन्म.
[१९५६]=> जागतिक बॅंकेने आस्वान धरण बांधण्यासाठी अर्थसाहाय्य करण्यास नकार दिल्यावर ईजिप्तचे राष्ट्राध्यक्ष गमाल नासर यांनी सुएझ कालव्याचे राष्ट्रीयीकरण केले.
[१९६३]=> सिनकॉमया पहिल्या भूस्थिर उपग्रहाचे प्रक्षेपण.
[१९६५]=> मालदीवला युनायटेड किंग्डम आणि इंग्लंड पासून स्वातंत्र्य.
[१९७१]=> बांगलादेशी क्रिकेटपटू खलिद महमूद यांचा जन्म.
[१९८६]=> अभिनेत्री मॉडेल मुग्धा गोडसे यांचा जन्म.
[१९९४]=> सनईवादक उस्ताद बिस्मिला खाँ यांना राजीव गांधी सद्भावना पुरस्कार जाहीर.
[१९९८]=> बुद्धिबळातील कामगिरीबद्दल विश्वनाथन आनंद याला प्रतिष्ठेचा चेस ऑस्कर पुरस्कार जाहीर.
[१९९९]=> क्रिकेटच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी माजी कर्णधार पॉली उम्रीगर यांना सी. के. नायडू पुरस्कार जाहीर.
[१९९९]=> भारताचा कारगिल युद्धात विजय झाला.
[२००५]=> मुंबई परिसरात २४ तासांत सुमारे ९९५ मिमी पाऊस, पूर येऊन शेकडो लोक मृत्युमुखी पडले.
[२००८]=> अहमदाबाद, बॉम्बस्फोटांमधे ५६ ठार २०० जखमी झाले.
[२००९]=> मराठी नाट्य चित्रपट संगीतकार भास्कर चंदावरकर यांचे निधन.
[२०१०]=> भारतीय राजकारणी शिवकांत तिवारी यांचे निधन.
[२०१५]=> भारतीय वकील आणि राजकारणी बिजॉय कृष्णा हांडिक यांचे निधन.
हे पण पहा :- आलंकारिक शब्द
तुम्हाला २६ जुलै दिनविशेष | 26 July Dinvishesh | 26 July day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
तुम्हाला २६ जुलै दिनविशेष | 26 July Dinvishesh | 26 July day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box