२७ जुलै दिनविशेष
27 July Dinvishesh
27 July day special in Marathi
२७ जुलै दिनविशेष ( 27 July Dinvishesh | 27 July day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण २७ जुलै दिनविशेष ( 27 July Dinvishesh | 27 July day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
२७ जुलै दिनविशेष
27 July Dinvishesh
27 July day special in Marathi
@ ए.पी.जे अब्दुल कलाम यांची पुण्यतिथी [A.P.J Abdul Kalam's Death Anniversary]
[१६६७]=> स्विस गणितज्ञ योहान बर्नोली यांचा जन्म.
[१७६१]=> माधवराव बल्लाळ भट ऊर्फ थोरले माधवराव हे मराठा साम्राज्यातील ४थे पेशवे बनले.
[१८४४]=> इंग्लिश भौतिक रसायनशास्त्रज्ञ जॉन डाल्टन यांचे निधन.
[१८६६]=> आयर्लंडच्या व्हॅलेन्शिया द्वीपापासून कॅनडातील ट्रिनिटी बेपर्यंत समुद्राखालील तार घालण्याचे काम पूर्ण. युरोप अमेरिकेच्या दरम्यान तारसंदेश पाठवणे शक्य झाले.
[१८९०]=> डच चित्रकार व्हिन्सेंट व्हॅन गॉगने स्वत:वर गोळी झाडून घेतली. दोन दिवसांनी त्याचे निधन झाले.
[१८९५]=> किराणा घराण्याचे प्रवर्तक, रूद्र वीणाचे मधुर वादन उस्ताद बंदे अली खाँ बीनकार यांचे निधन.
[१८९९]=> ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू पर्सी हॉर्नी ब्रूक यांचा जन्म.
[१९११]=> आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संख्याशास्त्रज्ञ डॉ. पां. वा. सुखात्मे यांचा जन्म.
[१९१५]=> ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू जॅक आयव्हरसन यांचा जन्म.
[१९२१]=> टोरँटो विद्यापीठातील सर फ्रेड्रिक बँटिंग आणि चार्ल्स बेस्ट इन्सुलिन शुद्ध स्वरूपात विभक्त करण्यात यश मिळवले.
[१९४०]=> अॅनिमेट शॉर्ट फिल्म ए जंगली हेअर मधून बग्स बनी हे पात्र प्रकाशित झाले.
[१९४९]=> पहिल्या प्रवासी जेट विमान, डी हॅविललँड कॉमेटचे पहिले उड्डाण.
[१९५४]=> भारतीय वकील आणि राजकारणी जी.एस. बाली यांचा जन्म.
[१९५५]=> ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू अॅलन बॉर्डर यांचा जन्म.
[१९५५]=> दोस्त राष्ट्रांनी ऑस्ट्रियातुन आपले सैन्य काढुन घेतले.
[१९६३]=> पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू नवेद अंजुम यांचा जन्म.
[१९६७]=> भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, आणि पटकथालेखक राहुल बोस यांचा जन्म.
[१९७५]=> गांधीवादी नेते, खासदार, भारतीय राज्यघटनेचे मराठीत भाषांतर केले मामासाहेब देवगिरीकर यांचे निधन.
[१९८०]=> शाह ऑफ इराण मोहम्मद रझा पेहलवी यांचे निधन.
[१९८३]=> कोलंबो येथील वेलिकाडा तुरुंगात सिंहली कैद्यांनी १८ तामिळ राजकीय कैद्यांची हत्या केली.
[१९८३]=> भारतीय फुटबॉल खेळाडू सॉकर वेल्हो यांचा जन्म.
[१९९२]=> हिन्दी चित्रपट अभिनेते अमजद खान यांचे निधन.
[१९९७]=> द्रमुकचे अध्यक्ष एम. करुणा निधी यांची सलग सातव्यांदा पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाली. हा एक विक्रम आहे.
[१९९७]=> हिंदुत्त्ववादी कार्यकर्ते बळवंत लक्ष्मण वष्ट यांचे निधन.
[१९९९]=> द्रवखनिज तेलवायूचा (LPG) वाहनांसाठी इंधन म्हणून वापर करण्याचा प्रस्ताव पेट्रोलियम मंत्रालयाने मंजूर केला.
[२००१]=> सार्वजनिक ठिकाणे, शासकीय इमारती, या ठिकाणी सिगारेट, तंबाखू, गुटखा सेवन या वस्तूंची सार्वजनिक ठिकाणी जाहिरात करण्यावर बंदी घालण्याचा महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा निर्णय.
[२००२]=> भारताचे १०वे उपराष्ट्रपती कृष्णकांत यांचे निधन.
[२००७]=> स्फोटके व शस्त्रास्त्र तज्ञ वामन दत्तात्रय पटवर्धन यांचे निधन.
[२०१२]=> लंडन येथे ३०व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.
[२०१५]=> भारताचे ११ वे राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे निधन.
हे पण पहा :- गटात न बसणारा शब्द
तुम्हाला २७ जुलै दिनविशेष | 27 July Dinvishesh | 27 July day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
तुम्हाला २७ जुलै दिनविशेष | 27 July Dinvishesh | 27 July day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box