२९ जुलै दिनविशेष | 29 July Dinvishesh | 29 July day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, July 28, 2024

२९ जुलै दिनविशेष | 29 July Dinvishesh | 29 July day special in Marathi

२९ जुलै दिनविशेष

29 July Dinvishesh

29 July day special in Marathi

२९ जुलै दिनविशेष | 29 July Dinvishesh | 29 July day special in Marathi

            २९ जुलै दिनविशेष ( 29 July Dinvishesh | 29 July day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण २९ जुलै दिनविशेष ( 29 July Dinvishesh | 29 July day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

२९ जुलै दिनविशेष

29 July Dinvishesh

29 July day special in Marathi


@ आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन [International Tiger Day]
[ई.पु.२३८]=> रोमन सम्राट बाल्बिनस यांचे निधन.

[११०८]=> फ्रान्सचा राजा फिलिप (पहिला) यांचे निधन.

[१७८१]=> जर्मन गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ योहान कीज यांचे निधन.

[१८५२]=> पुणे महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर कँडी यांच्या हस्ते विश्रामबाग वाड्यात स्त्रीशिक्षणाचे भारतीय उद्‌गाते म्हणून जोतिबा फुले यांचा सन्मान करण्यात आला.

[१८७६]=> फादर आयगेन, डॉ. महेंद्र सरकार यांनी इंडियन असोसिएशन फॉर कल्टिव्हेशन ऑफ सायन्सची स्थापना केली.

[१८८३]=> इटलीचा हुकूमशहा बेनिटो मुसोलिनी यांचा जन्म.

[१८९०]=> डच चित्रकार व्हिन्सेंटव्हॅन गॉग यांचे निधन.

[१८९१]=> पं. ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे निधन.

[१८९१]=> बंगाली समाजसुधारक ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे निधन.

[१८९८]=> नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ इसिदोरआयझॅक राबी यांचा जन्म.

[१९००]=> इटलीचा राजा उंबेर्तो पहिला यांचे निधन.

[१९०४]=> जे. आर. डी. टाटा उर्फ जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा यांचा जन्म. भातीय उद्योजग तसेच ते भारताचे पहिले वैमानिक आणि भारतीय विमान वाहतुकीचे जनक होते.

[१९२०]=> जगातील पहिली हवाई टपाल सेवा अमेरिकेतील न्यूयॉर्क ते सॅन फ्रान्सिस्को या शहरांदरम्यान सुरू झाली.

[१९२१]=> अॅडॉल्फ हिटलर नॅशनल सोशलिस्ट जर्मन वर्कर्स पार्टीचे नेते बनले.

[१९२२]=> लेखक आणि शिवशाहीर ब. मो. पुरंदरे यांचा जन्म.

[१९२५]=> व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांचा जन्म.

[१९३७]=> नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ डॅनियेल मॅकफॅडेन यांचा जन्म.

[१९४६]=> टाटा एअरलाइन्सचे एअर इंडिया असे नामकरण झाले.

[१९४८]=> १२ वर्षांच्या काळखंडानंतर लंडन येथे १४व्या ऑलिम्पिक स्पर्धा झाल्या.

[१९५३]=> भजन गायक अनुप जलोटा यांचा जन्म.

[१९५७]=> इंटरनॅशनल अ‍ॅटॉमिक एनर्जी एजन्सीची स्थापना झाली.

[१९५९]=> हिंदी चित्रपट अभिनेता संजय दत्त यांचा जन्म.

[१९८१]=> स्पॅनिश f१ रेस कार ड्रायव्हर फर्नांडो अलोन्सो यांचा जन्म.

[१९८५]=> मल्याळम लेखक टी. एस. पिल्ले यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

[१९८७]=> भारत-श्रीलंका शांतता करारावर सह्या करण्यात आल्या.

[१९८७]=> भारतीय लेखक, कवी आणि नाटककार बिभूतीभूशन मुखोपाध्याय यांचे निधन.

[१९९४]=> नोबेल पारितोषिक विजेती ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ डोरोथीक्रोफूट हॉजकिन यांचे निधन.

[१९९६]=> स्वातंत्र्यसेनानी अरुणा असफ अली यांचे निधन.

[१९९७]=> हरनाम घोष कोलकाता, स्मृतिचिन्ह पुरस्कार दिलीप पुरुषोत्तम चित्रे या मराठी 
साहित्यिकास प्रथमच मिळाला.

[२००२]=> गायक व संगीतकार सुधीर फडके ऊर्फ बाबूजी यांचे निधन.

[२००३]=> हिंदी चित्रपट विनोदी अभिनेता बद्रुद्दीन जमालुद्दीन काझी उर्फ जॉनी वॉकर यांचे निधन.

[२००६]=> मराठी संत साहित्यातील विद्वान डॉ. निर्मलकुमार फडकुले यांचे निधन.

[२००९]=> जयपूरच्या राजमाता महाराणी गायत्रीदेवी यांचे निधन.

[२०१३]=> भारतीय क्रिकेटरपटू मुनीर हुसेन यांचे निधन.

हे पण पहा :- शब्दयोगी अव्यय


            तुम्हाला २९ जुलै दिनविशेष | 29 July Dinvishesh | 29 July day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad