३ जुलै दिनविशेष | 3 July Dinvishesh | 3 July day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, July 2, 2024

३ जुलै दिनविशेष | 3 July Dinvishesh | 3 July day special in Marathi

३ जुलै दिनविशेष

3 July Dinvishesh

3 July day special in Marathi

३ जुलै दिनविशेष | 3 July Dinvishesh | 3 July day special in Marathi

            ३ जुलै दिनविशेष ( 3 July Dinvishesh | 3 July day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण ३ जुलै दिनविशेष ( 3 July Dinvishesh | 3 July day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

३ जुलै दिनविशेष

3 July Dinvishesh

3 July day special in Marathi


@ आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस [International Plastic Bag Free Day]

[१३५०]=> संत नामदेव यांनी समाधी घेतली.

[१६०८]=> सॅम्यूअल बी. चॅम्पलेन यांनी कॅनडातील क्‍वेबेक शहराची स्थापना केली.

[१६८३]=> इंग्लिश कवी एडवर्ड यंग यांचे जन्म.

[१८३८]=> पत्रकार, प्रार्थना समाजाचे एक संस्थापक मामा परमानंद यांचा जन्म.

[१८५०]=> ईस्ट इंडिया कंपनीच्या अध्यक्षांनी भारतातून आणलेला कोहिनूर हिरा इंग्लंडच्या राणीच्या स्वाधीन केला.

[१८५२]=> महात्मा फुले यांनी दलित मुलांसाठी पहिली शाळा काढली.

[१८५५]=> भारतात कायदे शिक्षणाचा प्रारंभ झाला.

[१८८४]=> डाऊ जोन्स (DJIA) हा निर्देशांक सुरू झाला.

[१८८६]=> आधुनिक विद्याविभूषित तत्त्वज्ञ व संत, फर्ग्युसन व विलींग्डन महाविद्यालयातील तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक रामचंद्र दत्तात्रय तथा गुरूदेव रानडे यांचा जन्म.

[१८८६]=> जर्मनीच्या कार्ल बेन्झ यांनी जगातील पहिली मोटारगाडी बनवली.

[१८९०]=> ओहायो हे अमेरिकेचे ४३ वे राज्य बनले.

[१९०९]=> कायदेपंडित, स्वातंत्र्यसैनिक, मुंबई उच्‍च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश व सर्वोच्‍च न्यायालयात सामाजिक समस्यांसाठी लढा देणारे झुंजार कायदेतज्ञ बॅरिस्टर व्ही. एम. तथा भाऊसाहेब तारकुंडे यांचा जन्म.

[१९१२]=> मराठी रंगभूमीवरील लोकप्रिय गायक व नट श्रीपाद गोविंद नेवरेकर यांचा जन्म.

[१९१४]=> इतिहासकार, नाटककार, कलादिग्दर्शक, वेशभूषाकार आणि नेपथ्यकार दत्तात्रय गणेश गोडसे यांचा जन्म.

[१९१८]=> भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते व्ही. रंगारा राव यांचा जन्म.

[१९२४]=> तामीळवंशीय राजकारणी, सिंगापूरच्या प्रजासत्ताकाचे ६वे राष्ट्राध्यक्ष सेल्लप्पन रामनाथन यांचा जन्म.


[१९२४]=> भारतीय क्रिकेटपटू अर्जुन नायडू यांचा जन्म.

[१९२६]=> लेखिका स्वातंत्र्य सैनिक सुनीता देशपांडे यांचा जन्म.

[१९२८]=> लंडनमध्ये प्रथमतः रंगीत दूरचित्रवाणी कार्यक्रमांचे प्रक्षेपण झाले.

[१९३३]=> अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष हिपोलितो य्रिगोयेन यांचे निधन.

[१९३५]=> सिट्रोएन कंपनीचे संस्थापक आंद्रे सीट्रोएन यांचे निधन.

[१९३८]=> मॅलार्ड हे वाफेचे इंजिन ताशी २०२ किमी वेगाने धावले. वाफेच्या इंजिनाचा विक्रम अजूनही अबाधित आहे.

[१९५१]=> न्यूझीलंडचा क्रिकेट खेळाडू सररिचर्ड हॅडली यांचा जन्म.

[१९५२]=> भारतीय कॅनेडियन लेखक रोहिनटन मिस्त्री यांचा जन्म.

[१९५२]=> भारतीय गायक अमित कुमार यांचा जन्म.

[१९६९]=> द रोलिंग स्टोन्सचे संस्थापक, गिटार, हार्मोनिका आणि पियानो वादक ब्रायन जोन्स यांचे निधन.

[१९७१]=> विकीलीक्स चे संस्थापक ज्युलियन असांज यांचा जन्म.

[१९७६]=> झिम्बाब्वेचे क्रिकेटपटू हेन्‍री ओलोंगा यांचा जन्म.

[१९८०]=> भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंग यांचा जन्म.

[१९८७]=> युवसेना जिल्हाअधिकारी जळगाव माननीय प्रितेश ठाकूर यांचा जन्म.

[१९९६]=> हिंदी चित्रपट अभिनेता कुलभूषण पंडित तथा राजकुमार यांचे निधन.

[१९९८]=> कवी प्रदीप यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.

[२०००]=> विक्रांत या विमानवाहू युद्धनौकेचे मुंबईच्या समुद्रात सागरी संग्रहालयात रूपांतर करण्यास मान्यता.

[२००१]=> सुधीर फडके यांना राज्य सरकारचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर.

[२००६]=> एक्स. पी. १४ हा लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून गेला.


            तुम्हाला ३ जुलै दिनविशेष | 3 July Dinvishesh | 3 July day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad