३० जुलै दिनविशेष | 30 July Dinvishesh | 30 July day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, July 29, 2024

३० जुलै दिनविशेष | 30 July Dinvishesh | 30 July day special in Marathi

३० जुलै दिनविशेष

30 July Dinvishesh

30 July day special in Marathi

३० जुलै दिनविशेष | 30 July Dinvishesh | 30 July day special in Marathi

            ३० जुलै दिनविशेष ( 30 July Dinvishesh | 30 July day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण ३० जुलै दिनविशेष ( 30 July Dinvishesh | 30 July day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

३० जुलै दिनविशेष

30 July Dinvishesh

30 July day special in Marathi


@ आंतरराष्ट्रीय मैत्री दिवस [International Friendship Day]

[ई.पु.७६२]=> खलिफा अल मन्सूरने बगदाद शहराची स्थापना केली.

[१६२२]=> संत तुलसीदास यांनी देहत्याग केले.

[१६२९]=> इटलीतील नेपल्स शहरात झालेल्या भूकंपात सुमारे १०,००० जण मृत्यूमुखी पडले.

[१७१८]=> पेनसिल्व्हेनियाचे स्थापक विल्यम पेन यांचे निधन.

[१८१८]=> इंग्लिश लेखिका एमिली ब्राँट यांचा जन्म.

[१८५५]=> जर्मन उद्योगपती जॉर्ज विलहेम फॉन सिमेन्स यांचा जन्म.

[१८६३]=> फोर्ड मोटार कंपनीचे संस्थापक हेन्री फोर्ड यांचा जन्म.

[१८९८]=> जर्मनीचे पहिले चान्सलर ऑटोफोन बिस्मार्क यांचे निधन.

[१८९८]=> विल्यम केलॉग यांनी कॉर्नफ्लेक्स विकसित केले.

[१९३०]=> पहिला फुटबॉल विश्वचषक उरुग्वेने जिंकला.

[१९३०]=> बार्सिलोना फुटबॉल क्लब चे स्थापक जोन गॅम्पर यांचे निधन.

[१९४७]=> ऑस्ट्रियन अमेरिकन शरीरसौष्ठवपटू अभिनेते आणि कॅलिफोर्नियाचे ३८वे राज्यपाल अर्नोल्ड श्वार्झनेगर यांचा जन्म.

[१९४७]=> ऑस्ट्रेलियाचे ६वे पंतप्रधान जोसेफ कूक यांचे निधन.

[१९५१]=> भारतीय-इंग्रजी चित्रकार आणि मूर्तिकार गॅरी यहूदा यांचा जन्म.

[१९६०]=> कर्नाटक सिंह स्वातंत्र्यसैनिक गंगाधर बाळकृष्ण देशपांडे यांचे निधन.

[१९६२]=> ट्रान्स कॅनडा हायवे हा सुमारे ८,०३० किमी लांबीचा जगातील सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग सुरू झाला.


[१९६२]=> भारतीय दहशतवादी यकब मेमन यांचा जन्म.

[१९७१]=> अपोलो १५ चंद्रावर उतरले.

[१९७३]=> पार्श्वगायक सोनू निगम यांचा जन्म.

[१९८०]=> इंग्लिश क्रिकेट खेळाडू जेम्स अँडरसन यांचा जन्म.

[१९८३]=> शास्त्रीय नाट्यसंगीत गायक वसंतराव देशपांडे यांचे निधन.

[१९९४]=> मराठी ग्रामीण साहित्यिक, चित्रपट कथालेखक, महामंडळाचे संस्थापक सचिव शंकर पाटील यांचे निधन.

[१९९५]=> अर्थतज्ञ, इंडियन स्कूल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी चे संस्थापक डॉ. विनायक महादेव तथा वि. म. दांडेकर यांचे निधन.

[१९९७]=> गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना राजीव गांधी राष्ट्रीय सद्‍भावना पुरस्कार जाहीर.

[१९९७]=> व्हिएतनामचा राजा बाओडाई यांचे निधन.

[२०००]=> कोणत्याही प्रवासी वाहनातून एखादा प्रवासी अपघाताने खाली पडून त्याचा मृत्यू झाल्यास त्याबद्दल त्या वाहनचालकाला जबाबदार धरता येणार नाही, असा सर्वोच्‍च न्यायालयाचा निकाल.

[२०००]=> चंदन तस्कर वीरप्पनने अभिनेते डॉ. राजकुमार यांचे अपहरण केले.

[२००१]=> जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.

[२००७]=> इटालियन चित्रपट दिग्दर्शक मिकेलांजेलो अँतोनियोनी यांचे निधन.

[२००७]=> स्विडिश चित्रपट दिग्दर्शक इंगमार बर्गमन यांचे निधन.

[२०११]=> संगीत समीक्षक डॉ. अशोक रानडे यांचे निधन.

[२०१२]=> दिल्लीतील पावर ग्रिड खराब झाल्यामुळे उत्तर भारतील 30 कोटी पेक्षा जास्त लोकांची वीज खंडित झाली.

[२०१३]=> भारतीय-इंग्रजी लेखक, कवी आणि नाटककार बेंजामिन वॉकर यांचे निधन.

[२०१४]=> पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर दरड कोसळून ५० ठार.


            तुम्हाला ३० जुलै दिनविशेष | 30 July Dinvishesh | 30 July day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad