३१ जुलै दिनविशेष | 31 July Dinvishesh | 31 July day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, July 30, 2024

३१ जुलै दिनविशेष | 31 July Dinvishesh | 31 July day special in Marathi

३१ जुलै दिनविशेष

31 July Dinvishesh

31 July day special in Marathi

३१ जुलै दिनविशेष | 31 July Dinvishesh | 31 July day special in Marathi

            ३१ जुलै दिनविशेष ( 31 July Dinvishesh | 31 July day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण ३१ जुलै दिनविशेष ( 31 July Dinvishesh | 31 July day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

३१ जुलै दिनविशेष

31 July Dinvishesh

31 July day special in Marathi


@ शहीद उधम सिंह यांचा शहीद दिन [Martyrdom Day of Shaheed Udham Singh]

[१४९८]=> पश्चिम गोलार्धात तिसरा प्रवास करताना ख्रिस्तोफर कोलंबस हे त्रिनिदाद बेटांचा शोध लावणारे पहिले युपोपीय ठरले.

[१६५७]=> मुघलांनी विजापूरचा कल्याणी किल्ला जिंकला.

[१६५८]=> औरंगजेब मुघल सम्राट बनला.

[१७०४]=> स्विस गणिती गॅब्रिअल क्रॅमर यांचा जन्म.

[१७५०]=> पोर्तुगालचा राजा जॉन (पाचवा) यांचे निधन.

[१८००]=> जर्मन रसायनशास्त्रज्ञ फ्रेडरिक वोहलर यांचा जन्म.

[१८०५]=> भारतीय सैनिक धीरान चिन्नमलाई यांचे निधन.

[१८५६]=> न्यूझीलंडची राजधानी ख्राइस्ट चर्चची स्थापना.

[१८६५]=> आधुनिक मुंबईचे शिल्पकार जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेटे यांचे निधन.

[१८७२]=> संतसाहित्याचे अभ्यासक, चरित्रकार लक्ष्मणरामचंद्र पांगारकर यांचा जन्म.

[१८७५]=> अमेरिकेचे १७वे राष्ट्राध्यक्ष अँड्रयू जॉन्सन यांचे निधन.

[१८८०]=> हिन्दी साहित्यिक मुन्शी प्रेमचंद यांचा जन्म.

[१८८६]=> अमेरिकन अ‍ॅनिमेशन चित्रपट निर्माते फ्रेड क्विम्बे यांचा जन्म.

[१९०२]=> व्यंगचित्रकार आणि लेखक केशवा तथा के. शंकर पिल्ले यांचा जन्म.

[१९०७]=> प्राच्यविद्या पंडित, गणितज्ञ, विचारवंत व इतिहासकार दामोदर धर्मानंद कोसंबी यांचा जन्म.

[१९१२]=> नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ मिल्टन फ्रिडमन यांचा जन्म.

[१९१८]=> संस्कृत पंडित डॉ. श्रीधर भास्कर तथा दादासाहेब वर्णेकर यांचा जन्म.

[१९१९]=> भारतीय क्रिकेटपटू हेमू अधिकारी यांचा जन्म.

[१९३७]=> के. नारायण काळे यांनी दिग्दर्शित केलेला वहाँ हा प्रभातचा चित्रपट मुंबईतील मिनर्व्हा टॉकीजमधे प्रदर्शित झाला.


[१९४०]=> भारतीय कार्यकर्ते उधम सिंग यांचे निधन.

[१९४१]=> गुजरातचे माजी मुख्यमंत्री अमरसिंग चौधरी यांचा जन्म.

[१९४७]=> हिंदी चित्रपट अभिनेत्री मुमताज यांचा जन्म.

[१९५४]=> इटालियन गिर्यारोहकांनी के-२ (माउंट गॉडविन ऑस्टिन) हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे शिखर प्रथमच सर केले.

[१९५४]=> भारतीय अभिनेते आणि दिग्दर्शक मनिवंनान यांचा जन्म.

[१९५६]=> कसोटी सामन्यातील एका डावात सर्व १० गडी बाद करण्याचा विक्रम करणारा जिम लेकर हा पहिला गोलंदाज बनला.

[१९६४]=> रेंजर ७ अंतराळ यानाने चंद्राचे पहिले स्पष्ठ छायाचित्रे काढले.

[१९६५]=> हॅरी पॉटर च्या लेखिका जे. के. रोलिंग यांचा जन्म.

[१९६८]=> चित्रकार, संस्कृत पंडित पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर यांचे निधन.

[१९८०]=> पार्श्वगायक मोहंमद रफी यांचे निधन.

[१९९२]=> आहारतज्ज्ञ श्रेया आढाव यांचा जन्म.

[१९९२]=> जॉर्जियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

[१९९२]=> सतार वादक पं. रविशंकर यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्रदान.

[२०००]=> वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. रघुनाथ माशेलकर आणि 
प्रगत तंत्रज्ञान केंद्राचे डॉ. डी. डी. भवाळकर यांना एच. के फिरोदिया पुरस्कार प्रदान.

[२००१]=> दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांना राजर्षी शाहू महाराज समता पुरस्कार प्रदान.

[२००६]=> फिदेल कॅस्ट्रो यांनी आपल्या भावाला, राऊल यांच्याकडे सत्ता हस्तगत केली.

[२०१२]=> मायकेल फेल्प्स यांनी ऑलिम्पिकमध्ये जिंकलेल्या सर्वाधिक पदक जीकाण्याचा विक्रम मोडला.

[२०१४]=> भारतीय पत्रकार आणि लेखक नबरुण भट्टाचार्य यांचे निधन.

हे पण पहा :- अव्ययीभाव समास


            तुम्हाला ३१ जुलै दिनविशेष | 31 July Dinvishesh | 31 July day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad